Submitted by देवनिनाद on 4 August, 2009 - 02:29
`प्रेमातील काही नकारात्मक चारोळ्या'
तू होकार दिलास
आयुष्य वाढल्यासारखं वाटलं
नकार दिलास
तेव्हा ते संपल्यासारखं वाटलं
तू माझी आहेस
असा होता समज
तू माझी होशील
हा मात्र गैरसमज
दूर जायचं होतं
तर जवळ का आलीस
हसवायचं नव्हतं
तर रडवून का गेलीस
प्रेम करून जग विसरणार होतीस
पण मलाच विसरलीस
खरं प्रेम सोडून
खोट्याकडे फिरकलीस
पाहीलं, जवळ आलो
मी प्रेमात अडकलो
रुसलीस, दुर गेलीस
मी व्यसनात बुडालो
युध्दात आणि प्रेमात
सगळं क्षम्य असतं
मग युध्द डोळस
आणि प्रेम आंधळ का असतं
- देवनिनाद
गुलमोहर:
शेअर करा
अच्छा है... गिरीश
अच्छा है...:-)
गिरीश
छान!
छान!
चांगलय !
चांगलय !
छान !! -हरीश
छान !!
-हरीश
मस्तच!
मस्तच!
युध्दात आणि प्रेमात सगळं
युध्दात आणि प्रेमात
सगळं क्षम्य असतं
मग युध्द डोळस
आणि प्रेम आंधळ का असतं
छान आहे