साधी सरळ दोघांची गोष्ट ....

Submitted by Kally on 25 February, 2015 - 02:36

ते दोघा पुन्हा नव्याने भेटले एका सोशियल नेटवर्किंग साइट वर. नव्याने ओळख झाली. एकमेकांच्या आवडी निवडी कळू लागल्या, एकमेकांच्या रुसव्याची आणि हसण्याची कारण कळू लागली. त्याला तिच्या कविता फार आवडायचा आणि ती त्याचासाठी कविता करायची. तिला जुनी गाणी आवडायची आणि तो तिला ती गाणी ऐकवायचा. दोघे ही सतत एकमेकांना कॉंप्लिमेंट करत प्रोटेक्ट करत असायचे ह्या मैत्रीत ईतरांना वेगळेपण जाणवायचे पण त्या दोघांना त्याची काहीच परवा न्हवती, ते फक्त आपले नाते फुलवत होते.
एक दिवस ती त्याला ना कळवता मुंबईला आली आणि दुसर्याच दिवशी सकाळी पुन्हा पुण्याला परतणार होती. संध्याकाळचे पाऊने सात झाले होते. एका हातात ब्याग आणि दुसर्या हाताने मोबाइल कानावर धरत ती लगबगीने वाट चालत होती. कपाळावर आठ्या, चेहेर्यावर कसली तरी चिंता या सरयात समोरून येत आसणार्या गाडीकडे तीच लक्षच गेले नाही. गाडी तिला धडक मारणारच होती तेवढ्यात कुणीतरी अचानक तिचा हात धरून तिला बाजूला ओढले. क्षणभर काय झाले हे तिला कळलेच नाही. दुसर्याच क्षणी स्वात:ला सावरत त्या व्यक्तीच्या हातातून आपला हात सोडवत, नज़र वर करून ती त्याला सॉरी म्हणतच होती तेवढ्यात तो व्यक्ति राग आणि काळजीच्या स्वरात म्हणाला “ लक्ष कुठे होत हो तुमचे,, आत्ता अपघात झाला असता.” अजून त्या दोघांनी एकमेकांकडे नीट पाहिले ही न्हवते पण जेव्हा पाहिले तेव्हा दोघांचा ही तोंडी एकच प्रश्न होता. “ तू इथे कशी / कसा??” दुसर्याच क्षणी दोघ ही त्या प्रश्नावर हसले,,
तो : मी इथेच रहातो ना बावळट..
ती : मार खाशील हा,,,
तो : बर,,, पण तू अचानक पुन्हा मुंबईत कशी?
ती : मी रेडीओ माझा मध्ये इंटरव्यू साठी आले होते, RJ च्या जॉबसाठी.
तो : वा,, छान.. तसा ही हा जॉब तुला साजेसा आहे,, किती बोलतेस तू..!!!
ती : हा,, हा,, बॅड जोक..
तो : पण आत्ता कसला विचार करत चालली होतीस,, गाडी तोडली असतीस ना त्या बिचार्याची..
ती: :@ पुन्हा,,, कसले वाईट जोक करतोस रे.. काही गाडी वगैरे नाही तोडली असती मी ….
तो : बर सांगशील का आता..
ती : अरे,, आम्ही जेव्हा ही मुंबईत येतो तेव्हा वस्तीला काकू कडे थांबतो कारण इथे आमच इतर कोणी नातेवाईक रहात नाही,, पण या वेळी मी घाई घाईत न कळवताच आले ना.. आणि bad luck म्हणजे काकुच्या घराला कुलुप आहे. शेजारी म्हणाले ती काही दिवसांसाठी पनवेल ला तिच्या बहिणीकडे गेली आहे. So the problem is…..
तो : कळले,, than… माझ्या घरी चल आई आहे आणि शोना, गोल्या ही तुला भेटून खुश होतील.
ती : नाही रे,, कस शक्य आहे.. मी तुझ्या घरी नाही थांबू शकत,, तुझी आई काय म्हणेल.
तो : काही ही म्हणणार नाही,, trust me माझी आई खूप चांगली आहे आणि खुल्या विचारांची आहे. So you don’t worry.
ती : kk,, but,, मला,, अरे..
तो: पण बिन चा विचार करू नकोस,, नाही तरी तुझ्या कडे इतर कुठला safe पर्याय आहे का.
ती : …… ठीक आहे
त्या रस्त्याचा जवळ्च एका चाळीत तो रहात होता. बैठ घर होत फार मोठ नाही, एका खोलीच. संध्याकाळचे साडेसात वाजले होते. त्याची आई स्वयंपाक करत होती. तेवढ्यात त्याने दारा बाहेरुंच “ ए आई ग ” अशी हाक मारत घरात प्रवेश केला. आणि ती संकोच करत हळुवार पणे त्याच्या मागून घरात आली. घरात एका बाजूला लहानशी खात होती, दार असलेल्या भिंतीला लागूनच एक गोदरेजचे कपाट होते. एकीकडे नहानीघर आणि स्वयंपाकघर होते आणि जवळच एक स्टडी टेबल होते त्याचा आवाज अऐकून आईचे दाराकडे लक्ष गेले.
आई : अरे आज लवकर कसा आलास, आणि ही कोण.
तो : अग आई ही माझी मैत्रिण आहे शोना आणि गोल्या ही ओळखतात हिला, आधी जेव्हा मुंबईमधे रहायची तेव्हा शोना गोल्या ची शिकवणी हीच घ्यायची पण गेली तीन चार वर्ष झाली आता ही पुण्याला रहाते. ईथे काही कामासाठी आली होती पण … (पुढे त्याने सर्व problem आई ला सांगितला) मग आजची रात्र राहु शकते ना ही आपल्याकडे ….
आई ; हो,, का नाही. एकटी पोर एवढ्या रात्री कुठे जाणार,, पण तिला तू दारातच का उभ केलयस,, अग आत ये बैस,, अज्जीबात संकोच करू नकोस.
त्याच्या आईचा बोलण्याने ती जरा स्थिरावली होती, तिच्या मनावरच दडपण नाहीसे झाले होते.
तो : चल आई मी येतो आता.. आणि ए बडबड machine माझ्या आईला च्छळू नकोस …
ती : (चिढून,, डोळे मोठे आणि नाक फुगवत ती त्याला पहाते आणि मग नझरेनेच त्याला विचारते की कुठे चाललायस)
तो : ( हाताने dumbbells उचलण्याची action करून दाखवत सांगतो की gym ला जातोय )
ती : (face वर cute smile देत आणि मान हलवत सांगते की कळले)
आई : जेवणाला वेळ आहे ग अजुन तुझ्यासाठी चहा करते, सोबत काही खातेस का?
ती : नाही, नको काकू राहुद्या.. चहा चालेल पण इतर काही नको.
ती fresh होऊन चहा घेते आणि सहज, घरात चहूबाजुला एक नज़र फिरवते. घरात एका कडेला असलेल्या टेबलावर काही वह्या पुस्तके पेन वगैरे आणि एक फोटो फ्रेम दिसते जी पाहुन ती हलकेच हसते. फ्रेम मधे तिने त्याला दिलेला त्याचाच फोटो पण त्यावर तिने आपली कविता अतिशय कल्पकतेने लिहून पाठवली होती. तिने दिलेल gift त्याने एवढ छान सांभाळून ठेवले आहे हे पाहुन तिला बर वाटते.. चहा पिऊन झाल्यावर ती मदत म्हणुन भाजी चिरू लागली कारण तिला त्याच्या आईची चाललेली घाई गडबड दिसत होती.. तिला भाजी चिरताना पाहून आई म्हणाल्या,,
आई : अग राहुदे तू बस मी करेन,, सकाळपासून तुझ्या धावपळीत दमली असशिल
ती : अस काही नाही काकू,, आणि तस ही मी तुम्हाला मदत म्हणुन हे करत नाहीये तर स्वत:साठी करते आहे,,,,,, अहो भूक लागलीये ना मला
आई : (हलकेच कटाक्श्य देत स्मित हसते) बर,,
ती ; काकू शोना आणि गोल्या कुठे आहेत,, ते ही मोठे झाले असतील ना किती वर्ष झाली त्यांना पाहिले नाही..
आई : अग आत्ताच tusion ला गेलेत,, 9 वाजता येतील,,
ती : आछा,, tusion लांब आहे का,,?
आई : फार नाही,, आणि तस ही दोघ एकच class मधे आहेत तर मला काही काळजी नाही..
ती : हो,, ते एक बर आहे..
आई : तुझ्या घरी कोण कोण असते,,?
ती : माझ्या घरी,, आई, बाबा, मी आणि माझा लहान भाऊ गौतम आम्ही त्याला गोट्या म्हणतो
आई : म्हणजे तू मोठी तर,,
ती : हो,,,
आई : छान..
ती : तुमची प्रकृती आधीच्या मानाने आता बरी आहे ना,, लास्ट टाइम डॉक्टरकडे जाण्याचा कंटाळा करत होता तुम्ही.. का?
आई : हो अग,, पण तुला कस माहित
ती : माहित आहे मला,, तुम्ही आजारी होता तेव्हा मी इथेच होते ना,, आणि आता ही अधून मधून आमचे बोलणे होते तेव्हा कळते..
आई : हो का,, छान
ती : पण तुम्ही गेल्या महिन्यात जात का न्हवता डॉक्टरकडे
आई : अग ईतकी वर्ष त्या मेल्याची औषध खावून खावून कंटाळा आलाय,, म्हणुन नाही जावेसे वाटले
ती : अच्छा,, पण मधेच औषध बंद केली तर तुमचा आजार जो आता बरा होत आलाय तो पुन्हा बळावेल ना ..
आई : कळते ग मला,, आणि मूल कुठली ऐकत आहेत माझ,, मी कितीही नाही म्हटले तरी दर वेळेस न्हेतातच की
ती : Happy ह्म्म्म.. काळजी वाटते ना त्यांना तुमची मग,,
आई : हो खूप प्रेम आहे माझा मुलांचे माझ्यावर... पण तुम्ही का गेलात पुण्याला
ती : आजीसाठी,, ती गावी एकटीच रहायची आणि तेव्हा ती खूप आजारी होती.. बाबांना म्हणाली की मी आहे तोवर माझ्याजवळच रहा सर्वजण
आई : मग,, आजी गेल्यावर यायचे ना परत...
ती : काकू,, आजी आहे अजून.. हयात
आई : अग बाई... सॉरी हा मला वाटले की...
ती : नाही नाही ईट्स ओक.. होत अस
आई : ह्म्म तस तिथेही शिक्षण चांगलेच आहे म्हणा.. पण तिथे रुळायला खूप कठीण झाल असेल ना..
ती : हो.. रुळलो आता... पण मुंबईची बात ही कुछ और है,,, है ना .. मला तर या लोकल ट्रेन्सच कुतुहल वाटत,, अस वाटते की इथल्या गर्दीचा आपण ही एक भाग असाव.. इथल्या fast life ची पण एक वेगळीच मजा असते ना.. इथे ओळख नसली तरी पुढचा स्टेशनला येणार्या व्यक्तीसाठी जागा राखून ठेवतात, एकमेकांची विचारपूस करतात,, डबे, पाणी share करतात, कॉंप्लिमेंट करतात like a friend,, आणि माझ्यासारख्या लोकल मधे कधीतरी प्रवास करणारयाणा जेव्हा आपल्या station वर उतरायची वेळ येते आणि समोरचा गर्दीला पाहून गोंधळायला होत तेव्हा मदत ही करतात, मग वाटत की नाही,, स्वत:हून हरवुन जाण्यासारख्या या गर्दीत आपल्याला जागा नाही,,,, (क्षणभर शांत होते) upsss मी तुम्हाला boar करायला लागली ना,, sorry sorry… तरी तो मला सांगून गेला होता ना …
आई : अग नाही,, उलट बरच वाटले मला तुझ बोलन ऐकून,, फार छान बोलतेस तू,, तुझ्या बोलण्यावरुन वाटते की तुला या शहराची अजुन ही फार ओढ आहे … आणि आजचा प्रवासात बरीच दगदग ही झालेली दिसते आहे..
ती : ह्म्म ओढ तर आहेच,, वयाचा अर्धा भाग याच शहरात जगले आहे, माझी जन्मभूमी आहे ही. कितीही दूर राहिले तरी मुंबईकर म्हणुन एक वेगळाच अभिमान मनात बाळगुन आहे … हा पण ही वेगळी गोष्ट आहे की ईथले राहणीमान माझा अंगी अजुन आले नाहीये. पण माझी ही सवय ना,,,फार वाईट आहे,, एकदा मी बोलायला लागली ना की थांबतच नाही..
आई : त्यात वाईट असे काही नाही,, रोज मी एकटी असते ना वेळ संपतच नाही ग,, आणि एकटीला घर खायला उठत .. आज घरात कुणी तरी आहे अस वाटतय,, बघ वेळ कशी निघून गेली कळलच नाही आणि आपला स्वयंपाक ही झाला..
ती : ह्म्म्म,,

तेव्हढ्यात बाहेरुन वादाचे आवाज येऊ लागले.. शोना आणि गोल्या काहीतरी बडबडत घरात येत होते.. पण तिला पाहून क्षणभर ओळखण्याचा प्रयत्न करत राहिले आणि जशी ओळख पटली तसे “ ओह्ह ताई,, तू इथे wow..!,,, खूप दिवस आहेस ना,, ? आम्हाला विसरली न्हवतीस ना ?? तुला आमच घर कस माहित झाल? तू आता काय करतेस ? असे एका मागून एक दोघांचेही प्रश्न संपतच न्हवते..
ती : अरे हो हो किती प्रश्न विचारल आधी श्वास तर घ्या.
शोना : ओह सॉरी तुला बघून इतक मस्त वाटले ना की तुला बोलूच देत नाही आहोत हे लक्षातच नाही आले

गोल्या : (नाटक्या स्वरात) सारी सारी …
ती : ह्म्म,, ते कळल मला आणि तुमचा प्रश्नाची उत्तर ना.. so मला तुमच्या घरी तुमचा दादा घेऊन आला,, मी तुम्हाला कधी विसरेन का?? मी इथे इंटरव्यू साठी आले होते,, एन लास्ट मी उद्या परत जाणार..
गोल्या : काय ग ताई तू पण,, शेवटचा उत्तरात सार्या excitement ची वाट लावलीस
शोना : हा,, बघ ना.. उद्याच का जाणार तू..
ती : अग राणी जावा लागणार ना.. घरी माझी आई पण तर माझी वाट बघत असणार ना …
शोना : ह्म्म,,ok पण मग आज रात्री आपण पुन्हा सर्व लुडो खेळूया
गोल्या : हा … ए ताई आठवते तुला त्यावेळी किती मजा करायचो आपण.. आणि आम्हा तिघांमुळे तू किवा जया ताई दोघांपैकी एकीला खेळायलाच नाही भेटायचे..
ती : ह्म्म चांगले आठवते आणि हे ही आठवते की तू आणि गोट्या किती चीटिंग करायचात ते .. अरे हा पण जया कुठे असते आता,, माझ्याकडे तिचा नवीन नंबर ही नाहीये..
शोना : जया ताई आता नाशिक ला असते तिची तिथे बदली झाली ना..
ती : अच्छा,,, मला सांगितले ही नाही तिने.. भेटुदे एकदा मग बघते तिला
आई : ए पोरांनो,, जा आता हात पाय दुऊन या..
आईचे शब्द ऐकू आले तसे दोघही तोंड खराब करत फ्रेश व्हायला गेले. 9 वाजून गेले होते थोड्या वेळाने तो ही आला. एकमेकाना पाहून त्या दोघांचा ही ओठावर क्यूट स्माइल आली.
गोल्या : ए दादा I love u man.. आज तुने मेरा दिल जीत लिया Wink
तो : ओह्ह,, गाढवा खूप डाइलोग्स मारायला लागलयस तू.
आई : सगळे आले ना,, मग चला जेवायला वाढते. उद्या रविवार आहे म्हटल्यावर आज रात्री तुमची धमाल असणार पण मला लवकर आटपून घेउद्या.. समजले..
(तो फ्रेश होऊन येतो आणि सारे जेवून घेतात. सगळ आवरून अंथरूणावर जाण्याची तयारी असते. तो आणि गोल्या वर पलंगावर आणि आई ती आणि शोना खाली. पण गोल्या होता कुठे जागेवर तो माळ्यावर काही तरी शोधाशोध करत होता थोड्या वेळाने तो लुडोचा जुना गेम शोधुन घेउन आला. शोना पण खुश झाली
ती : गोल्या तू तर खरच लुडो घेउन आलास अरे मोठा झालास ना आता मग.
गोल्या : तर काय झाल,, लुडो खेळायला वय कशाला बघायच.
ती : ह्म्म तस बरोबर आहे तुझ पण अरे आपण तिघच आहोत ना
शोना : दादा आहे ना,,, ए दादा plz खेळ ना आमचा बरोबर
तो : ok चल मी पण खेळतो
गोल्या : आश्चर्य,, आश्चर्य..
तो : ए खेळू की नको ,, नाही तर मी जातो झोपायला
गोल्या : नको नको,, सॉरी सॉरी
ती : शोना आठवते तुला लहान पाणी तुझा पिंक सोंगट्यासाठी कशी रडायचीस
शोना : मी नाही रडायची,,,,,,,
ती : हो का,, गोल्या मग ती रडवी कोण होती रे..
तो : गोल्या पण तुम्हाला हा लुडोचा खेळ अचानक कसा आठवला,, आधी तर कधी खेळताना नाही पाहिले
गोल्या: हो, तू नाहीच पाहिले कारण आम्ही ताईचा घरी खेळायचो,, आठवते आई आजारी होती,, तेव्हा संध्याकाळी तुला आमची मदत व्हावी आणि आईची काळजी ही घेता यावी म्हणून ताई आमची शिकवणी दुपारी घ्यायची आणि आम्ही आईची काळजी करत उदास असायचो म्हणून ताई आमचे मन रमवण्यासाठी शिकवणी नंतर आमच्या सोबत लुडो खेळायची.. ताई तेव्हा आम्हाला नाही कळायचे पण आता कळते की तू तस मुद्दाम केले होतेस..
तिच्या नकळत तो तिचाकडे पहातो,, कौतुकाने..
ती : बस आता खेळूया का आपण..
रात्री साडे अकरापाऊने बारा पर्यंत डाव रंगला. आई तर औषध घेउन केव्हाच झोपी गेली होती. खेळ संपल्यावर सर्व आपापल्या जागी झोपायला जातात. ती ही शोना शेजारी जाऊन जोपायची तयारी करत असते.
तो : थांब ना थोडा वेळ,, आल्यापासून आपण निट बोललोच नाही आहोत ना..
ती : ह्म्म,, बोल..
तो : कॉफी घेवूया??
ती : आता??? काकू जाग्या होतील ना..
तो : नाही ग,, सकाळपासून घरची काम करून दमते बिचारी आणि रात्री औषध घेतल्यावर गाढ झोप लागते तिला,,,
ती : बर,, मी करते कॉफी..
तो : ह्म,,
ती कॉफी बनवायला निघते, तिचा पायातील रुणझुनत्या पैंजणाच्या नादाने ओढला जाऊन तो ही स्टडी टेबल जवळच्या खुर्चीवर येउन बसतो … किचन चा त्या लहानशा खिडकी बाहेरुन येणार्या चंद्राचा प्रकाशाने तिचा चेहेर्यावर एक सोनेरी छटा आली होती, तिचा कॉफीमग सोबत आणि वारयाचा तिचा केसांसोबत जो चाळा चालला होता तो, पाहण्यात तो ही दंग झाला असताना त्याचा मनात विचार आले ..

तुझा पावलां भोवती,
पैंजण न्हवे जणू चांदण्याच घुटमळत आहे,,
जाणन्या का हा चंद्र,
तुला औंझळभर खिडकी बाहेरुन न्याहाळत आहे ...

ती कॉफीचा कप त्याचा समोर धरून उभी असते,,
ती : अरे कुठे हरवला आहेस बोलायच म्हणालास ना ,,
तो : कुठे नाही चांदणे पहात होतो..
ती : अच्छा.. ह्म,, खरच रात्री चांदण्यांनी भरलेल आभाळ किती सुंदर वाटते ना..
तो : हो.. पण नेहमी नाही पहाता येत हे आभाळ, हे चांदण..
ती : मुंबईच्या गर्दीला आभाळ पहाण्याचा वेळ तरी कुठे भेटत असेल..
तो : ते ही आहेच म्हणा.. पण त्याची ओढ कायम असते ना..
ती : ह्म..
तो : इथे रहायला होतीस तेव्हा आपल्यात शोना गोल्याचा अभ्यासा व्यतीरक्त कधी बोलणे झालेच नाही ना..
ती : हो..
तो : आणि आता चॅट वर किती बोलतेस तू बाप रे …
ती : हो का,, बर आता बोलणारच नाही कधी..
तो : हाहा,, तस नाही ग चेष्टा केली,, पण खरच आता तुझ्याशी बोललो नाही तर दिवस पुर्ण होतच नाही माझा … पण आज का गप्प आहेस
ती : सहजच
तो : गोल्या म्हणाला तस तू मुद्दाम त्यांची शिकवणी संध्याकाळचा ऐवजी दुपारी केली होती ..
ती : हो,, कारण मला वाटले होते की दुपारी तर काकू आराम करू शकतच होत्या पण संध्याकाळी तुला सार घर आवराव लागायचे स्वयंपाक ही करावा लागायचा त्यात यांचा शाळेचा अभ्यास ही.. म्हणून मी शिकवणीची वेळ बदलली होती म्हणजे दुपारी ही काकूंना आराम आणि मी यांचा शिकवणी सोबत शाळेचा अभ्यास ही घेऊ शकत होती शिवाय अभ्यास झाला असल्यामुळे शोना ही संध्याकाळी तुला मदत करू शकत होती ना.
तो : माझा घराचा हा एवढा बारकाइने विचार कसा केलास तू,,
ती : मला तेव्हा जे करावस वाटले ते केले..
तो : मला अजून ही आठवते,,, तेव्हा आईचा आजारपणाचा जो खर्च झाला आणि जे कर्ज झाले होते त्यामुळे मी तुला दोन महिने शोना, गोल्याचा शिकवणीची फी ही देऊ शकलो न्हवतो, ते दोन महिने सतत माझ मन मला खात होत.. कधी कुणाचा एक रुपया ही मी इकडचा तिकडे केला न्हवता त्यमुळे तुला कसे सांगाव तेच कळत न्हवते की अजून काही महिने फी द्यायला उशिर होईल .. रोज शोन्या गोल्याला विचारायचो की तू फी बद्दल विचारलेस का किंवा ओरडलीस का वगैरे पण ते नेहमी नाहीच असे सांगायचे. नंतर मी जेव्हा तुला फी आणि झालेल्या उशीराचे स्पष्टिकरण देण्यासाठी आलो तेव्हा ही तू स्पष्टीकरणाची गरज नाही असे म्हणून आईची विचारपूस kelis आणि सर्व प्रॉब्लेम्स मिटले असतील तरच पैसे दे अस म्हणाली होतीस..
ती : त्यात काय एवढ. विश्वास असतोच ना, त्या पैशाने ना मी जग विकत घेउ शकत होते ना तू.. शेवटी आपल्या दोघांची आर्थिक परीस्थिती सारखीच होती ..
तो : हो,, तेच तर,, आपली आर्थिक परीस्थिती सारखीच होती.. आणि आपण दोघही आयुष्याशी आपआपल्या परीने झगडत होतो, आयुष्याचा चढ उतार पार करत होतो.. तुला ही पैश्याची गरज होतीच ना.. आणि तेव्हा तर आपल्यात मैत्री ही न्हवती मग व्यवहारीपणे का नाही वागलीस..
ती : होती ना,, मला ही पैश्याची गरज होती पण तुझ्या एवढी न्हवती.. मग व्यवहारी कसे वागू शकत होते मी … तू जेव्हा फी द्यायला आलेलास ना तेव्हा तुझ्या डोळ्यात मला नेहमी जो प्रामाणिकपणा दिसायचा त्यासोबत एक अपराधी भाव ही आधीच दिसला होता .. ज्याची काहीच गरज न्हवती .. किती साधा, सच्चा होतास तू.. अजून ही आहेस..
तो : ज माझ्या डोळ्यातले भाव कळण्या इतके निरखून कधी पाहिले होतेस तू माझा डोळ्यात ..
ती : अम्म्म,, दे.. कप ठेवून येते ….
तो : (कप तिचा हातात देत) ह्म.. विषय बदलायची कला कुणी शिकावी तर ती तुझ्याकडून …
ती : (स्माइल देत..) अस काही नाहीये रे.. उद्या सकाळी घरी जायचे आहे ना.. लवकर उठाव लागेल
तो : बर,, मग झोप तू..
ती : हो तू ही झोप आता पुरे झाली प्रश्नमंजुषा …
तो : ह्म्म्म..
=============================
ती झोपते पण तो बराच वेळ जागा असतो.. खेळताना क्षणा क्षणाला बदलणारे तीच्या चेहेर्यावरचा छटा आठवत.. तिचा निरागस चेहेरा न्याहाळत. तिचा मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत.
सकाळी ती उठून आपल्या जाण्याची तयारी करत असते Sunday म्हणून तो, शोना आणि गोल्या अजुन झोपलेलेच होते आई पण जरा उशीराच उठल्या होत्या. चहा साठी म्हणून आई दूध आणायला बाहेर डेरीवर गेल्या होत्या. केस विंचरत ती आरश्यात पाहत असताना तिची नजर आरश्यात दिसणार्या त्याचा प्रतिबिंबाकडे जाते. नकळतच ती त्याला पहाण्यात हरवून जाते जणू मनात काहीतरी स्वत:शीच बोलत असते त्याच ते लहान बाळा सारख गाळतच हसू ठेवून निजळेल भोळ रूप डोळ्यात साठवत असते. थोड्या वेळानंतर अचानक तो डोळे उघडून पहिला कटाक्ष तीच्यावर टाकतो, जणू काही तो जागाच होता आणि स्वत:वर रोखून धरलेल्या तीच्या नझरेला बंद डोळ्यानी पाहत होता. त्याला असा अचानक जाग झालेल पाहून ती गोंधळते आणि लगेच मागे फिरत त्याच्यापासून आपली नज़र चोरू लागते काही क्षण असेच निघून जातात. थोड्या वेळाने आई दूध घेउन येते आईला पाहून तोही अंथरूणातून उठतो.
आई : बर झाल आज उठलास लवकर,,
तो : हो आई हिला सोडायला जायचे आहे ना स्टेशनला,, म्हणून उठलो. तुझ पण काही काम आहे का?
आई : माझ कसले काम,, मी पण याच कारणाने उठवणार होती तुला.
ती : मला सोडायला यायची काय गरज आहे,, कशाला उगाच तुझा Sunday खराब करतो आहेस.. मी जाईन अरे, don’t you worry..
तो : पण मी सोबत आलो तर काही problem आहे का तुला ? (पुन्हा तीच हृदयाला भिडणारी नज़र)
ती : ना.. नाही,, (ती क्षणभर संभ्रमात पडते )
चहा वगैरे झाला, तो ही तयार होता, शोना आणि गोल्या जागे होते पण अंथरुणातच आणि त्यात ही तिला नको जावूस अशी गळ घालत होते पण तिने त्यांना समजावीले आणि सार्यांचा निरोप घेतला. ती घरा बाहेर पडली तशी ते दोघही उठले, आई ही दाराजवळ आली. दराबाहेरून तिने क्षणभर घरात एक नज़र फिरवली .
आई : काय ग काही राहिले का..?

काय केलेस तू असे जे मी हरविले स्वताला,,
त्या क्षणात एका मी गमाविले माझ्या मनाला..
लोटला काळ मोठा अजून ही ना कुणा सापडले आहे,,
तुझी होत असताना मी ना माझी राहिले आहे

ती स्वत:शीच पुटपुटली “ कदाचित हो,, पण काय ते कळत नाही ” आणि चालू लागली. रिक्षा स्टॅंड येई पर्यन्त दोघही शांत होते. त्याने रिक्षा थांबवली, रिक्षात ही कुणी काही बोलले नाही पण एकमेकांना चोरून पहाण्याचा आणि एकमेकांपासून स्वत:ची नज़र चोरण्याचा वेगळाच खेळ खेळत होते. स्टेशन आले. रिक्शाचे पैसे देऊन दोघही चालू लागले. ती स्त्रियांचा रांगेत टिकिट काउंटर कडे गेली. रविवार असून ही बरीच गर्दी होती स्टेशन ला फेरीवाले, दुकानदार यांसारख्या हातावर पोट घेउन चालणार्यांसाठी सर्व दिवस सारखेच असतात नाही का? तो ती गर्दी न्याहळात बाहेरच थांबला होता. ती टिकिट घेऊन आली आणि मग ते दोघ प्लॅटफॉर्मकडे वळले, दादर चढताना धावणार्या लोकांची गर्दी पाहून ती पुरती बिथरली मागे वळून जेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले तेव्हा तिची अवस्था अचूक टिपून आपला हात पुढे केला.. मान वर करून एक नज़र तिने त्याच्याकडे पाहिले त्याच्या नझरेत एक हमी दिसली तिला की “ मी आहे, घाबरू नकोस ” ती आपला हात त्याचा हातात देत होती तेवढ्यात तिचा मनात काय आले जे पुन्हा हात मागे घेत ती सरळ चालू लागली,,

दिला होतास हात तू मला आधार देण्यासाठी,,
पण मीच तो हात धरण्याचे टाळले होते..
ठावूक होते मला, ही सोबत आहे काही क्षणांची,,
सोडताना तो हात माझेच काळीज तुटणार होते …

आता गोंधळण्याची वेळ त्याची होती,, “ का वागली ती अशी??” पाठमोर्या तिच्या आकृतीकडे पाहात तो विचार करत होता.. “ माझा हात धरण्या इतपत ही मला आपले नाही मनात का ती..?”

अवघड होत आहे तुला समजणे,,
ना जमे तुझ्या मनाचे भाव उमजणे..
एकच कळते मला, तुझ्यात रमणे,
तुझे असणे,, तुझेच होवुनी उरणे..
==================================
गाडी यायला अजून अवकाश होता. पण तरीही त्या दोघांमधली शांतता तुटली न्हवती. काही वेळाने तिच्या ट्रेनची अनाउन्स्मेंट झाली . ती ऐकताच तिचा डोळ्यात पाणी तरळले. तिने क्षणभर मागे वळून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहेर्यावर ही उदासिनता दिसत होती.

गहिवरून आले शब्दांना आज,,
बांध नयनांचा ही तुटला होता..
भावनांचा उद्रेक रोखण्यासाठी,,
काळजाने अबोला धरला होता …

ट्रेन त्यांच्या समोर येउन थांबली.

ती : ,,, चल निघते मी,, काळजी घे स्वत:ची आणि घरचांची ही..
त्याने पापण्या मिटून आणि मान हलवत हुंकार केला,, नेहमीसारखाच..
ती ट्रेनच्या दारातून आत जात असताना त्याने बाहेरून तिच्यासाठी जागा अडवली, आणि तो दूर जाउ लागला. ती येत असताना पाहून,,
प्रवासी स्त्री : हेलो,, ईथे समोर बसा
ती : अहो पण कुणी बसणार आहे ना ईथे
प्रवासी श्री : नाही,,(बाहेर त्याच्याकडे बोट दाखवत) त्यांनी तुमचासाठी ही जागा ठेवायला सांगितली होती
ती : ओह्ह,, आणि हे सामान..
प्रवासी स्त्री : ते ही त्यांनीच तुमचासाठी ठेवले आहे.
तिथे एक चिट्टी आणि त्यावर एक गुलाबी कळी होती, ती लगेच ती चिट्टी उचलून वाचू लागते.

चिट्टीत तो :
कालची संध्याकाळ कशी निघून गेली कळलेच नाही. तसा फार जास्त वेळ नाही होतो आपण एकत्र पण ते क्षण का संपले याचीच मला खंत वाटते आहे. तू माझ्या आईला नीट ओळखत ही न्हवतीस पण तिला तुझा लळा लावलास, शोणाची तर तू बेस्ट फ्रेंड होतीसच आता त्यांचा अजूनच जवळ आली आहेस. तू घरा बाहेर पडताच जेव्हा मागे वळून मी दारा आत पाहिले तेव्हा माझे घर मला आगदी रिकामी वाटले ग. तुझ जाण नाही आवडत आहे मला. स्टेशन वर तुला सोडायला तर आलोय पण अजून ही तुझ्यातच हरवलेलो आहे. माझ्या घरातील प्रत्तेक वस्तूला झालेला तुझा स्पर्श मला रोज तुझी आठवण करून देईल. मला तुला नाही जावु द्यायचे आहे पण कोणत्या नात्याने, कोणत्या हक्काने तुला अडवू हाच प्रश्न पडला आहे....
तुच एकदा म्हणाली होतीस ना की प्रेम आणि मैत्री या दोघांना जोडणार्या आपल्या गुलाबी नात्याच प्रतिक आहे ही गुलाबी कळी,, आज तीच तुला देत आहे. आपल्या या अनामिक नात्याची निशाणी म्हणून या गुलाबी कळीला आयुष्यभर तुझ्या उराशी बाळगुन ठेवशील का,,? या आयुष्याचा प्रवासात तुझा हात माझ्या हातात देऊन माझ्या सोबत चलशील का,,? जाणतेस ना तू की मनातले भाव ओठांवर आणायला नाही जमत मला, माझ्या अबोल्यात लपलेल्या भावना तू समजून घेशील का,,? बरेच प्रश्न झाले ना,, पण आता वेळ कमी आहे आणि मला माझ्या फक्त एका प्रश्नच उत्तर हवे आहे,,, तू माझी होशील का....?

****

तिचा डोळ्यांचा बांध ओलांडून अश्रू गालांवर उतरले होते,, पण ओठावर हसू ही होते. ती तशीच ट्रेन बाहेर धावली, तो तिथेच उभा होता नज़र जुकवून. तिची हाक ऐकू येताच त्याने समोर पाहिले आणि दोन्ही हातानी तिला आपल्या कवेत घेतले.. क्षणभर त्या दोघांना प्लॅटफॉर्म वरचा त्या गर्दीचा विसर पडल होता, पण ती अजूनही रडत होती, फार रडत होती, ट्रेनचा हॉर्न वाजला तसे ते दोघेही भानावर आले

ती : एवढ मोठ पत्र लिहू शकतोस, पण एवढस नाही म्हणू शकत की मी तुझ्यावर प्रेम करतो ..
तो : (हसतो,,) मी तुझ्यावर खुप खुप खुप प्रेम करतो,, नाही राहू शकत तुझ्या शिवाय.. माझ सार आयुष्य मला तुझ्या सोबत तुझ्या बावळट अर्थहिन प्रश्नांची उत्तर देत जगायचे आहे.
ट्रेनचा दुसरा हॉर्न वाजला,,
ती : मला नाही जायचे आहे, तुला सोडून,,
तो : अग आत्ता गेली नाहीस तर मी कसा येणार तुझ्या घरी,, तुला कायमचे माझा जवळ ठेवण्यासाठी, तुझ्या आई बाबांची परवानगी घ्यावी लागेल ना मला..
ती : ह्म्म,,
तो : चल डोळे पूस,, आणि,,,जा.. पुन्हा येण्यासाठी,, माझी होण्यासाठी..

ती ट्रेन मधे बसते आणि ट्रेन चालू लागते, दूर दूर दूर,,, नाहीशी होते. पण आता ते दोघ दूर राहिले न्हवते कायमचे एक झाले होते.

तो काव्य आणि मी कादंबरी,,
शब्दात नाही सांगता येणार आमचे नाते,
या नात्यात मैलोनचा दुरावा आहे,
पण जेव्हा भेट होते तेव्हा नसतात रुसवे फुगवे,
एका नझरेत ना मागितलेल्या माफिला क्षमा मिळते
आणि ओठांवरचे हसू खुलते …..
गालावर खळी आणि डोळ्यात पाणी दोघे ही एकत्रच येतात,
अवघ्या चार क्षणांची ती भेट एका कानात निघून जाते,
तरीही आयुष्यातले अप्रतिम सुख देऊन जाते …
आणि शेवटी,,,,,,,
नझरेतली आपुलकी अश्रू बनून वाहते …..

हॅपी एंडिंग..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

खरंच साधी सरळ आणि गोड कथा आहे. मधेच ब्रेक लागल्यासारखी थांबली पण.. संपादनात जाऊन क्रमशः लिहा कृपया.
पुढचा भाग लवकर येऊ द्या.

कालच वाचलेली, छान लिहिलेय .. लिहा अजून.. शुद्धलेखन आणि एकंदरीतच लिखाण लिहून लिहूनच सुधारते .. पुलेशु Happy

व्वा !!! पुन्हा एकदा मस्त…… छान असंच लिहित राहा..... गोष्ट वाचून मधुमेह होणार बहुतेक इतकी गोड आहे…