Submitted by जयदीप. on 25 February, 2015 - 10:39
तुला भेटण्याची पुन्हा वेळ आली
अपेक्षेप्रमाणे उपेक्षा मिळाली
तुझे पाय रोवून आहेस तेथे
असावा चिखल, जात आहेस खाली
तुला दूर नेणार अपमान नव्हता
अनुल्लेख केला तुझा, सोय झाली!
तुझे पत्र पाहून आनंद झाला
रिकामेच होते, कळाली खुशाली!
बरे की उघडलेस तू तोंड लवकर
तिला वाटलेलास तोवर मवाली
तुझा पंख तुटका.. निकामी नसावा
तुझे पीस पकडून मुंगी उडाली
जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली धन्यवाद
आवडली
धन्यवाद
तुझा पंख तुटका.. निकामी
तुझा पंख तुटका.. निकामी नसावा
तुझे पीस पकडून मुंगी उडाली<<< वा
खुशाली आणि मुंगी अधिक आवडले
खुशाली आणि मुंगी अधिक आवडले