Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 11 January, 2015 - 11:54
तुझे भक्त गाती
संकीर्तनी नाचती
नकळे कसे काय
झपाटूनी जाती
तो नाद तो आवेग
भक्तिभाव पाहूनी
मी ही जातो कधी
गर्दीत त्या मिसळूनी
नाचतो अन गातो
हात ही उंचावूनी
रितेपण माझे जाते
रिते रितेच राहुनी
गमते मजला मग
व्यर्थ सारी करणी
थांबतो मी येतो
बाजूस नाईलाजानी
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विक्रांत प्रभाकर, छान आहे
विक्रांत प्रभाकर,
छान आहे
धन्यवाद विनायक ,पुन्हा एकदा
धन्यवाद विनायक ,पुन्हा एकदा
सुंदर ..एका लयीत म्हणावी अशी
सुंदर ..एका लयीत म्हणावी अशी वाटली
रितेपण माझे जाते
रिते रितेच राहुनी >>> छानचं !
thanks vini
thanks vini