इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया आणि प्रवासी विमा

Submitted by अश्विनी डोंगरे on 6 February, 2015 - 01:53

नमस्कार,

मला १ महिन्यासाठी अमेरिकेस जायचे आहे, त्यासाठी IDP काढायचे आहे. तर काय प्रक्रिया आहे? (पुणे)
RTO Pune साईटवर जो फॉर्म आहे, तोच भरुन नेला तर चालेल का?

शिवाय प्रवासी विमा कोणता घ्यावा यावरही सल्ला हवा आहे. मार्चमधे जाणार आहे. अजून काही वेळ हातात आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही अमेरिकेच्या ज्या राज्यात जाणार आहात तिथे चौकशी करून बघा. काही राज्यांमधे भारतीय लायसन्स थोड्या काळासाठी चालते. IDP ची गरज लागणार नाही कदाचित.
काढावे लागलेच तर मुख्य अट आहे की पासपोर्ट आणि लायसन्सवर एकच पत्ता असावा लागतो. स्टँप्ड व्हिसा लागेल. फॉर्म भरून घेउन जावा. तिथे काउंटरवर तुम्हाला अजून काही प्रोसेस असेल तर सांगितलच (बहुतेक वरच्या साहेबांकडे जाउन सही घेउन यावी लागते). सगळी कागदपत्र बरोबर असतील तर एका दिवसात मिळून जाइल.

धन्यवाद मनीष!
काही राज्यांमधे भारतीय लायसन्स थोड्या काळासाठी चालते. IDP ची गरज लागणार नाही कदाचित.>> हे माहित नव्हते. मी टेक्सास ला जाणार आहे.

If your license is not in english (or may be Spanish) you must need IDP. Most states will NOT need IDP and you should be able to drive on Indian permit.
Totally agree with Manisha about address condition. Car Rental conpany as well knows about thesr rules. ( Sorry for English)

एकच महिन्यासाठी असेल तर आणि आधी रस्त्याच्या उजवीकडून कुठे गाडी चालवली नसेल तर ड्रायव्हिंग आणि पर्यायाने आयडीपीच्या भानगडीत न पडलेल बर. ओळखपत्र म्हणून आयडीपी चा उपयोग होतो पण पासपोर्ट/इंग्लिश भाषेतील भारतीय लायसन्स पण उपयोगी पडेल. आयडीपीची गरज नाही.

हल्ली मेडिकल बरोबर प्रवासी इंश्युरंस बरेच वेळा मिळतो. ज्या कंपनीत मेडिकल केला असेल तिथे आधी चौकशी करणे बरे पडेल.

सीमंतीनी,
आधी अमेरिकेत गाडी चालवली आहे ( काही वर्षे झाली :-)), सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली नसल्यामुळे गाडी असलेली बरी पडेल. ओळखपत्र म्हणुन आयडीपी काढत नाहिये. Happy

सर्व सुचना-माहिती देणार्‍यांचे आभार.

अमेरिकेत आपल्याला आयडीपीची काहीही गरज नसते. तुम्हाला आधी अमेरिकेत जाऊन एवढं माहीत नाही?
टेक्सासमध्ये ९० दिवस कुठल्याही देशाच्या लायसन्सवर गाडी चालवता येते.

अहो, IDP म्हणजे तुमच्या भारतीय (इंग्रजी) लायसन्सचे इतर अनेक जागतिक भाषांत केलेले भाषांतर. त्याचा नंबरदेखिल वेगळा नसतो. ड्रायविंग लायसन्सचान नंबर त्याला देतात आणि तोही त्याच RTO मधूनच.
.
थोडक्यात काय तर तुम्ही जर इंग्रजी भाषी देशात जाणार असाल तर IDP ची काहीही आवश्यकता नाही. तुमचे लायसन्स पुरे (तात्पुरत्या काळाकरीता). अधिक काळाकरीता तेथिल स्थानिक लायसन्स काढावेच लागेल.

अश्विनी, टेक्सास च्या डीएमव्ही साईट वरून क्लिअर माहिती मिळेल. तेथे चेक कर.

ऑफिस च्या कामासाठी जाणार असशील तर ऑफिस तर्फे कार इन्शुरन्स मिळतो का ते बघ. नाहीतर कॅलिफोर्नियात AAA वाले आधी गाडी चालवली असेल तर short term insurance देतात. मी एक वर्षांकरता काढला होता - तो कोणत्याही स्पेसिफिक गाडीकरिता नसतो. दीडशे डॉ ला होता तेव्हा. कदाचित इतर राज्यांतही देत असतील. तुझ्याकडे थेट कॉण्टॅक्ट नसेल तर माझ्या एजंटला विचारू शकतो मी.

फारएण्ड, धन्यवाद. चौकशी करते.

चिमिचांगा, आधी अमेरिकेत दीर्घ काळासाठी होतो, तेव्हा स्थानिक परवाना काढला होता, जो आता संपला आहे.
<<एवढे माहिती नाही?>> नाही म्हणूनच तर धागा काढला ना!

DMV साईट वर ही माहिती मिळाली-
Foreign Drivers in the United States
The U.S. does not require an international driving permit to drive in the country; however, you may need to show one in order to rent a car.

मी मागे १०/११ वर्षांपूर्वी आयडीपी काढून आणलं होतं, पण रेंटल कंपन्या (मी होतो त्या राज्यात) भारतीय लायसन्सच घ्यायच्या. त्यामुळे तसा त्याचा काही उपयोग झाला नाही.

एकच महिन्यासाठी असेल तर आणि आधी रस्त्याच्या उजवीकडून कुठे गाडी चालवली नसेल तर ड्रायव्हिंग आणि पर्यायाने आयडीपीच्या भानगडीत न पडलेल बर >>>>>> त्या विचारतायत काय...आपण सांगतोय काय ????!!! Happy

>> त्या विचारतायत काय...आपण सांगतोय काय ????!!!

त्यांनीं विचारून त्यांनां सल्ला मिळाला कधी आणि तुम्ही त्यावर प्रतिसाद देताय कधी????!!! Happy

टेक्सस मध्ये कार चालवायला इंडियन ड्रायविंग लायसेन्स 90 दिवस वापरता येते
इंटरनॅशनल परमिट ची काहीही आवश्यकता नाही. बिनधास्त या. ☺

इन्शुरन्स कार जिथून रेन्ट कराल तेच लोक देतील.