मृत्युच्या पलीकडे

Submitted by मी मी on 27 February, 2013 - 14:40

आपण कोण आहोत? इथे का आलोत? मनुष्य जन्मच का? मृत्युच्या पलीकडे काय असेल??असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत..........यापेक्षाही कित्त्येक गूढ असणारे प्रश्न मनात काहूर घालत असतात.....आपल्या आपल्या परीने प्रत्येकजण तर्क वितर्क लावतात....मी सुद्धा कधीच यातून सुटले नाही...उलट जेव्हा पासून समज आली असेल तेव्हा पासूनच माझी ओढ या विषयाकडे वाढत गेली... असे अनेक प्रश्न मनात निर्माण होत गेलेत अजूनही होतात, मग काही वाचनातून...काही ऐकीव तर काही आजूबाजूला घडणाऱ्या घटनातून निघणारे संदर्भ जोडून तोडून काही उत्तर मिळतात का हे शोधण्याचा प्रयत्न सतत चालू असतो.....अजूनही...

मन म्हणजे काय? कुठे असतं? आत्मा म्हणतात तेच का हे 'मन'....मनुष्य प्राणी सगळी सारखीच तर मग सगळ्यांचे स्वभाव, वागणे, आवड-निवड,विचार, वृत्ती,प्रकृती सारखीच का नाही...प्रत्येकाला वेगेळे बनवण्याचे कारण काय? या मागचा उद्देश काय....संपूर्ण मानव जातीचा एकच उद्देश आहे कि प्रत्येकजण वेगळा गणला जातो...शारीरिक संपदा सारखीच आहे मग मानसिक स्थिती भिन्न का? मानव एकमेव जर बुद्धीजीवी प्राणी आहे तरीही तो आजपर्यंत त्याचंं खर सुख कशात हा शोध का लावू शकला नाही...अजूनही मानव हा दुख का भोगतो.......कि मग तो दुखच भोगायला इथे आला आहे....मानव शरीर हि एक शिक्षा तर नाही....मन किंवा आत्मा नावाच्या खऱ्या अस्तित्वाला या शरीरात बंदिस्त करून इथे शिक्षा भोगण्यास पाठवलेले तर नसावे........खर 'जगणं' यापेक्षा वेगळे तर नसावे? खर जग कदाचित यापेक्षा भिन्न तर नसावे??...... किंवा आपण या एकाच जन्मात अनेक आयुष्य जगत आहोत आणि हे आपल्याला कळत सुद्धा नाहीये ......योगायोगाने का होईना हे आपल्याला कळले तर .....

मोक्ष म्हणजे नेमके काय?...कुठे वसत असेल हे मोक्ष नावच 'विश्व' ....तोच खरा आपला मुकाम असेल तर....आपण इथे का आहोत?.....तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग कुठला? मृत्यू हाच एकमेव मार्ग कि मग कुठेतरी या निसर्गात वातावरणाच्या पलीकडे जाण्यासाठी मार्ग आहे पण साधारण माणसाला या उघड्या डोळ्याने दिसत नाही...पुराणातल्या कथांना प्रमाण मानले तर त्याच मार्गाने देव येऊन वर्षानुवर्ष तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींना पूर्वी ताकद तर देत नवते...

हुषशश........

जवळ जवळ चार वर्षांपूर्वी एक गूढ कादंबरी वाचनात आली.....खरतर सहसा मी डोक्यात भुंगा घालणाऱ्या काल्पनिक गोष्टी लिहिलेल्या पुस्तकांपासून जरा दूर राहण्याचा प्रयत्न करत असते....पण योगायोगानेच पुस्तक हाथात आले आणि त्याच योगाने त्याचे वाचन देखील सुरु झाले...

पुस्तकाला एक विषय हवा म्हणून 'कल्पना विलास' असेल कदाचित किंवा मला बऱ्याच वर्षात सतत त्रास देणारे काही प्रश्न लेखकाला देखील पडत असणार...(पडत असणार का?).... कारण काय माहिती नाही पण फक्त विरंगुळा म्हणून हे पुस्तक वाचले पण विसरू शकले नाही...

पुस्तकाची कहाणी काहीशी अशी होती (पुस्तक वाचून जरा वेळ गेलाय...थोडं कमी अधिक गृहीत घेणे)

दोन मूलं आणि प्रेमळ नवरा असणाऱ्या संसारात अतिशय सुखी असणारी एक स्त्री एका संध्याकाळी मुलांच्या हट्टाखातर त्यांच्यासाठी केक घेण्यासाठी बाहेर पडते...हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दुकानात जात असतांना आणि रस्ता ओलांडून जात असतांना अचानक समोरून येणाऱ्या ट्रक ला आपण आदळणार म्हणून घाबरते-किंचाळते..कानावर हाथ ठेवून डोळे मिटून घेते...रस्त्यावर होणारा गोंगाट तेव्हा तिला स्पष्ट ऐकायला येत असतो...काही क्षण असेच जातात.......आणि अचानक सगळं शांत झाल्याच जाणवत....ती डोळे उघडते....

आणि ती जे काही बघते ते सगळे तिला वाटत असतं त्या पलीकडचे....ती तिथेच त्याच जागेवर उभी असते..मात्र...सगळं नॉर्मल असतं....गाड्या त्यांच्या मार्गाने जात असतात...तिच्या भोवताल आजू-बाजूला आत्ताच ऐकू येत होता तो गोंगाट नसतो...खरतर कुणीच नसतं.....मलाच भास झालाय असा समज करून ती स्वतःच गालात हसते अन पुढे चालू लागते........

तिला जायचे होते त्याच दिशेने अन त्याच वाटेने ती चालत असते पण आता ती बघत असते ते सगळंच नवं असतं...ते हाकेच्या अंतरावरच दुकान आता दूर दूर पर्यंत दिसत नसतं .....रस्तेच्या कडेला असणाऱ्या रोजच्या परिचयाच्या गोष्टी तिथे नसतातच......सगळंच नवं असतं.....ती गांगरते,घाबरते आणि परत सपाट्याने घराच्या दिशेने चालू लागते ....ठराविक अंतर चालूनही पराचयाच अस काहीच तिथे नाही.....तीच घर; घराच्या जागेवर नाही....शोध शोध शोधते....मनात काहूर हेलकावे घेतंच असतं 'माझ घर कुठे आहे...माझी ती दोन निरागस मुल केकची वाट बघत असतील...माझा नवरा..' हाच विचार करत असतांना घेरी येऊन शुध्द हरपून पडते....

जाग येते तेव्हा ती कुणाच्या तरी घरी आहे हे तिला लक्षात येते......एका तरुण मुलाने तिला त्याच्या घरी आणले असते...त्या मुलाची आई तरुण बहिण आणि तो असे ते तिथे राहत असतात....त्या सर्वांच्या जिव्हाळ्याने ती जरा सावरते ...स्वतःची कहाणी त्यांना सांगते....कुणालाही काही कळत नसतं....पण ती खोत बोलत नाहीये हे मात्र ती लोक ओळखतात....ती तरुण मुलगी आणि तिची मैत्री होते....तो मुलगा सुद्धा तिला तीच घर सापडून देण्यास मदत करत असतो.....

या कहाणीला आणखी एक मोड येतो तेव्हा जेव्हा त्यांच्या घरी येणारे एक परिचित जोडपे तिला वेगळ्या नावाने हाक मारतात..... ओळखत असल्याचा दावा करतात....यांना गैरसमज झाला असावा अस समजून विसरण्याच्या प्रयत्नात असतांनाच परत एकदा बाजारात तिला ओळखणारे परंतु वेगळ्या नावाने जाणणारे भेटतात ....आता येता जाता हे घडत असतं.... स्वतःच्या दुःखाने व्यथित त्या हिला हे सर्व आणखीनच दुखद असल्याच जाणवत असतं....या परिवारावर आणखी ओझ नको म्हणून एक दिवस ती या सर्वांना समजावून वेगळं राहायचं ठरवते....आणि हि 'दुसरी' अशी कोण आहे याचा शोध लावायचं ठरवते याकामात तिला तो तरुण मदतीला सतत तिच्या सोबत असतो.....

माहिती मिळते ती फार वेगळी असते....या 'इथे' तीच नवं वेगळं असतं...तिची ओळख वेगळी असते...इथे ती प्रोफेसर आणि लग्न झालेली परंतु नवऱ्यापासून वेगळी राहत असलेली स्त्री असते.....अजूनही तिला थांग लागत नसतो कि हे आहे काय.....ती अजूनही त्या तिच्या हक्काच्या संसाराच्या शोधात असते.....पण काही महिन्यांनी, वर्षांनी शेवटी थकून हे नवं आयुष्य पत्करायच ठरवते....तिच्या प्रेमात पडलेल्या त्या तरुणाच प्रेम स्वीकार करून नवं आयुष्य सुरु करायचं ठरवते....आणि मनाची संपूर्ण तयारी करून नव्या आयुष्याचा आनंद उपभोगणार असतेच अन परत......तिच्या समोर तिच्या त्या आधीच्या आयुष्याच देखील सत्य आ वासून उभ राहतं..............

मित्रांनो इथे एक सांगाव वाटतंय हि कहाणी मृत्यूनंतरची नाहीये....एकाच जगण्यातली पण 'गूढ' अशी कहाणी....

पाहायला गेलं तर काल्पनिक कहाणी असेल कदाचित....पण मला हलवून गेली.....कारण या एका विशिष्ट विषयावर मला अनेक शंका आहेत...प्रश्न आहेत...त्यासाठी माझे काही विशिष्ट तर्क आहेत....पण कुणाला सांगू कुणाशी बोलू इथे नेमके अडलेले.....आणि माझी हीच चलबिचल या लेखकाला कशी बर कळली असेल....म्हणून वाटलेले आश्चर्य...सगळच्या सगळं मांडावस वाटलं म्हणून तुमच्या पुढ्यात आणून ठेवलं........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस - सगळ्याच मोडांच्या उसळी करता येत नाहीत. काही Mode 'सहनही होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत' या प्रकारचेपण असतात... Happy

हे जग खर आहे का ??????
की फक्त आपल्यालाच वाटते की हे जग खर आहे...? जसे व्हिडीओ गेम मधल्या कॅरेक्टर ला वाटत असत Wink

.या बाजुने सुध्दा विचार करा.............मग कळेल मृत्यु नंतर काय होते Happy

मयी,

तुम्ही 'वेकिंग लाईफ' (Waking Life) नावाचा सिनेमा पाहिला आहे का? तुमची गोष्ट त्या सिनेमातल्या सुरुवातीच्या कथानकासारखी वाटतीये! इथे फक्त बाईच्या जागी एक तरूण मुलगा एका गुढारम्य दुनियेत अडकतो आणि त्याला जीवन आणि म्रॄत्यू ह्यातला फरक समजेनासा होतो.

या कहाणीला आणखी एक मोड येतो तेव्हा जेव्हा<<

मोड आलाच आहे तर उसळ करा आता कहाणीची.>>> अशक्य हसले...

वर्तमान मध्ये जगणार्‍यांना असे प्रश्न पडत नाहित.

याचा अर्थ वर्तमान मध्ये जगणार्‍यांना इतरांची टिंगल करायला हरकत नाही असे दिसते. कदाचित त्यांची बुद्धि, शक्ति केवळ वर्तमानात जगण्यापुरती मर्यादित असते. इतर गोष्टींचा विचार सुचतच नाही, काही कुतुहलच नाही. म्हणून ज्यांना असे कुतुहल असते त्यांची टिंगल करणे एव्हढेच येते.

वर्तमान मध्ये जगणार्‍यांना असे प्रश्न पडत नाहित.>>>>>>>>>चुकून वर्तमानात म्हणाल्या असतील त्या त्यांना मशिनरी लाइफ़ जगणाऱ्यांना अस म्हणायचं होतं तसंही आज धाव धाव धावणार्यांना कसले प्रश्न पडतात तसे प्रश्न पडणाऱ्यांना जरा बुद्धी आणि भावना दोन्ही असाव्या लागतात आणि ते वापरायला वेळही काढावा लागतो.

असो नको त्या प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा आपण आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधूया Happy

रमा अभय … धन्यवाद

आनंदा अगदी अगदी मला पण असंच काहीसं वाटतं. म्हणजे अनेक फुगे एकमेकांच्या शेजारी आहेत पण एका फुग्याच्या आतल्या लोकांना दुसर्या फुग्याच्या आतले जग माहिती नाही. आपापल्या फुग्यात आपल्याला हवे असलेले सर्व काही अवैलेबल आहे. कुणी कुणाला इंटरफ़ेअर करायचे नाही. असे काही हे आकाश, नद्या, समुद्र एक सूर्य एक चंद्र अनेक तारे हे आपल्या हिस्स्यांची संपदा …आपल्या परिसरात वातावरणात आपण काहीही करू शकतो. इतरांच्या परिमितीत घुस्पेठ करणे मात्र सोप्पे नाही

ज्यांना आपण देव मानतो तीच लोकं या वेगळ्या मितीतले आहेत असं मानलं तरी त्याचे तर्क लावता येतात. जसे आपल्या पुराण कथेत अनेक संदर्भ सापडतात बारा वर्षांच्या तपश्चर्येनंतर देव प्रसन्न होतात आणि या सर्व तपश्चर्या हिमालयावर केल्या जातात. हिमालायावरच का ?? पांडवांनी स्वर्गात जाणारा रस्ता शोधला होता ते तिथे जाउन परतही आले….हा रस्ता सुद्धा हिमालायावरच …. देवदेवतांचे येण्याचे मार्ग आकाशातून किंवा उंच पहाडावरल्या गुफादि जागेतून. आमच्या अनेक प्रसिद्ध देवादिकांची मंदिरं सुद्धा अश्याच पहाडींवर… आनंदा म्हणतेय तसा दुसऱ्या मितीत जाणारा छेदबिंदू कुठेतरी तिथे उंचावर लपला असेल का ??

Ho kka

Pages