Submitted by इस्रो on 31 January, 2015 - 23:16
हे असे होईल काही वाटले नव्हते कधी
आरसा बोलेल खोटे वाटले नव्हते कधी
ठरविले वेडा जगाने ना तयाचे दु:ख पण
तू मला वेडा म्ह्णावे वाटले नव्हते कधी
खेद त्यांनी व्यक्त केला- चूक माझी जाह्ली
चूक उमगावी धुरीणा वाटले नव्हते कधी
चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा
मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी
एकटा उरलो असा की शेवटी सोडेल ती
सावलीही साथ माझा वाटले नव्हते कधी
लागलो गझला लिहाया फावल्या वेळेत मी
लोक गुणगुणतील त्याही वाटले नव्हते कधी
-नाहिद नुरुद्दिन नालबंद 'इस्रो'
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०]
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही शेर आवडले
काही शेर आवडले
धन्यवाद वैवकुजी.
धन्यवाद वैवकुजी.
हे असे होईल काही वाटले नव्हते
हे असे होईल काही वाटले नव्हते कधी
आरसा बोलेल खोटे वाटले नव्हते कधी
व्वा. पहिली ओळ फारच छान. अंदाज आरश्याचा ह्या शेराची आठवण झाली.
शुभेच्छा.
हे असे होईल काही वाटले नव्हते
हे असे होईल काही वाटले नव्हते कधी
आरसा बोलेल खोटे वाटले नव्हते कधी<<<
मतल्यात अलामत बिघडल्यामुळे बेसिक तांत्रिक चूक झाली आहे.
चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा
मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी<<< खयाल आवडला.
मतला व त्यानुसार इतर शेर कृपया दुरुस्त कराल का?
हे असे होणार आहे वाटले नव्हते
हे असे होणार आहे वाटले नव्हते कधी <<< असे करता येइल
बेफिकीरजी, वैवकुजी
बेफिकीरजी, वैवकुजी धन्यवाद!
दुरुस्त करुन घेतोय.
वाह......क्या बात
वाह......क्या बात है.....सुपर्ब