सी फेस बंगलो स्कीम साठी नाव सुचवा

Submitted by dreamgirl on 31 January, 2015 - 05:43

एका नामांकीत बिल्डरच्या नवीन बंगलो स्कीम साठी हटके नाव हवं होतं...!
नाव मराठी, इंग्रजी, लॅटीन, स्पॅनिश, फ्रेंच कुठल्याही भाषांमध्ये चालेल फक्त
- फार मोठं नकोय, (शक्यतो एकच शब्द)
- उच्चारायला, लक्षात ठेवायला सोप्पं, कॅची हवं आणि
- समर, अ‍ॅक्वा, सी(समुद्र), हवाई थीम अंतर्गत हवं (आणखी आयडियाज सुचवू शकता)
धन्यवाद !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा : नव्या गृहप्रकल्पांची इंग्रजाळलेली नावे फार डोक्यात जातात!>> फुस फार पटला! पण क्लायंट देव असतो... आले देवाजीच्या मना.. Proud आणि पुन्हा त्यांचं बिग बी क्लायंट असेल तर ते जास्त करून इंग्रजाळलेलेच असतं! Happy
सुचवायचे काम करणारेय सध्या!

ईथे सुचविलेलं नाव निवडण्यात आल्यास त्या सदस्याला काही रॉयल्टी वगैरे देणार का ? किंवा निदान बुकिंग केल्यास काहीतरी सवलत तरी>> Happy हे ही सुचवण्यात येईल क्लायंटला! बुकींगवर सवलत मिळण्याचे चान्सेस अधिक Wink

Oceana
ला पेरेग्रिना आवडलेत!

समुद्र + हवाई थीम ? नेमके कुठे ? तिसर्‍या मुंबैत का ? >> Happy काउ समुद्र किंवा हवाई थीम वर हवं होतं! हवाई यासाठी की जल्लोष/पार्टी/रिलॅक्सेशन/समर इ. दाखवण्यासाठी.

धन्यवाद सर्व मायबोलीकर्स! आवडलेली सर्व नावे पाठवलेत! लवकरच फायनल केलेले नाव (आणि इच्छुकांसाठी माहीती पोस्ट करेन)

योजना सहकारी तत्वावर असेल तर - सागर सहकार
फ्री प्लॉट असेल तर -१. जलतरंग
२ . तटरक्षक
३ . किनारा
४ . नीलकांती
५ . सागरेश्वर हि मराठीतील काही नावे
त्याखेरीज साहिल , शैवाल अशी उर्दू हिंदी नावे आहेतच.
इंग्लिश मधील मला आवडलेले एक -pelagic मग त्यास व्हिला , विहार , कुंज यासारखे समूहाचे नाव जोडता येईल .

बीपिन सीव्हिव आवडलेलं
विक्रमसिंह प्राईया छान नाव आहे.
किंकर मलाही पेलॅजिक आवडलेलं... Happy आणि प्रकल्पासाठी एकदम परफेक्ट होतं.

धन्यवाद लोक्स. आधीच नावे सुपूर्द केल्यामुळे नवे सजेशन्स देऊ शकत नाही. Happy फायनल केलेले नाव व इतर माहीती (जर परवानगी मिळाली तर) इथे नक्की पोस्ट करेन!

Oceana फाइनल झाले तर मला त्वरित बैंक मध्ये जावे लागेल. लोन प्रोसेस करायला Wink
झाले का नाव फाइनल?

Oceana फाइनल झाले तर मला त्वरित बैंक मध्ये जावे लागेल. लोन प्रोसेस करायला डोळा मारा
झाले का नाव फाइनल?>> वत्सला Wink ओशन वरूनच विचार चालू आहे... फायनल झाल्यास अपडेट्स पोस्ट करेनच! नाव सुचवणार्‍या/णारी चे क्रेडीट फेसबूक पेजवर दिले जाईल बहुदा! बाकी प्राईज साठी वै. पण सुचवून ठेवते. अंतिम निर्णय अर्थातच आयोजकांचा Happy

वत्सला नाव फायनल झालं आहे पण अजून ब्रँड एस्टॅब्लिशमेंटचे काम सुरू असल्याने आम्ही मार्केटिंग करू शकत नाही. एकदा प्रकल्प फायनल मोड मध्ये आला आणि प्रसिद्धीची ऑफिशिअल परवानगी मिळाली की नक्की पोस्ट करेन इथेच!

Pages