Two Wheeler क्लास बद्दल

Submitted by सुरजभोसले on 24 November, 2014 - 01:47

माझ्या पुण्यातल्या मित्राला पुण्यातील Two Wheeler क्लास ची (स्वारगेट जवळ) माहित हवी आहे. माझ्या मित्राला (वय ४०) व त्याच्या बायकोला (वय ३८) Two Wheeler शिकायची आहे (त्याला सायकल पण येत नाही) पण Two Wheeler चालवायची भीती वाटते म्हणून आज पर्यंत Two Wheeler घेतली नाही. त्याची भीती कमी कशी करावी. काही Two Wheeler क्लास मध्ये त्याने enquiry केली पण ते Gents ना Two Wheeler शिकवत नाहीत अशी माहिती मिळाली.

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांनीच चांगले प्रतिसाद देले आहेत त्यामुळे मित्राची Two Wheeler ची भीती कमी झाली.
त्याला आता या वयात Two Wheeler शिकायची लाज व भीती वाटत होती. भीत या साठी की त्याच्या भाच्याचा Two Wheeler Accident मध्ये मृत्यू झाला. म्हणून मित्राला Two Wheeler चालवायला भीती वाटत होती. मित्राच्या घरी कोणालाच Two Wheeler येत नाही कारण घरी Two Wheeler नव्हती.
आता माझा मित्र स्वारगेट जवळच्या Driving School मध्ये Scooty शिकतो आहे. पहिल्यांदा मित्र Two Wheeler शिकणार व नवीन प्लेजर घेणार व नंतर त्याची बायको Driving School मध्ये Two Wheeler शिकणार.

अभिनंदन आणि शुभेच्छा.
गाडी येणं (त्यातल्या त्यात टू व्हिलर) हे गरजेचं आहे. मी ऑफिसात पाहिलंय माझ्या . खूप जवळ राहणार्‍या मुली सुद्धा बस आणि कॅब वापरतात. वापरायला हरकत नाही पण त्यात दुपटी तिपटी ने वेळ जातो. जिथे त्या मुली २०व्या मिनिटाला घरी असतील तिथे बस कॅब मुळे त्याना एक तास लागतो. पण कारणं सगळ्यांची एकच, नवरा चालवू देत नाही कारण एकदा पडले होते इ.
हे कारण न पटणेबल आहे निदान मला तरी Sad एकदा पडलं तर असं गिव्हप करून कसं चालेल? मी ही १-२ वेळा आपटले आहे पण गाडी चालवणं सोडलं नाही.

अरे टिव्हीस वेगो मध्ये बॉडी बॅलेन्सिन्ग आहे अस वाचलेलं .
खास लेडीज साठी आणलेल फिचर आहे.
कुणी चालवली आहे का ती गाडी?

अरे टिव्हीस वेगो मध्ये बॉडी बॅलेन्सिन्ग आहे अस वाचलेलं .
>>>
अस काही नसत हो बॉडी बॅलेंसिंग म्हणजे त्यांनी शॉकॉब्जर चांगले लावले असतील जास्तित जास्त...मी चालवली नाहिये पण रस्त्यावर ती गाडी दिसतपण नाहि अजिबात..

नॉन टु व्हीलर गाड्यांबाबत माझी निरिक्षणे:

अ‍ॅक्टीवा : अ‍ॅवरेज्,पीकप सर्व बाबतीत १ नंबर .पण अवाढव्य तीला पाहुनच धडकी भरते,ट्राफिकमध्ये त्रासदायक ३०-४०% लोक्स वापरतात
प्लेझर : मस्त गाडी अ‍ॅवरेज्,पीकप सर्व बाबतीत १ नंबर ३०-४०%लोक्स वापरतात
स्कुटी पेप : टायर छोटे आहेत स्लीप होते २०-३०%लोक्स वापरतात
स्कुटी ईस : पीकअप छान बाकि रस्त्यावर पडली तर पोत्यात भरुन न्यावी लागेल १०-२० %लोक्स वापरतात
वेस्पा : कार्टुन गाडी जाहिरातीमुळे चालणारी २-३%लोक्स वापरतात
डिओ : जुनी एकदम मस्त्,नवी लगेचच खुळखुळा होते ५-१०%लोक्स वापरतात
बाकि पन आहेत्च अ‍ॅक्सेस,वेगो वैगेरे ५-१०% लोक्स वापरतात..

जास्तीत जास्त ३ नच गाड्या चालतात
अ‍ॅक्टीवा,प्लेझर्,स्कुटी पेप...

अस काही नसत हो बॉडी बॅलेंसिंग म्हणजे त्यांनी शॉकॉब्जर चांगले लावले असतील जास्तित जास्त>> नाही हो,
त्यांच पेटंट आहे त्या बाबतीत.
दुचाकीचा धागा आहे माबोवर.
त्यावर कोणीतरी लिहिलय त्याविषयी डिटेल.

सीमा Uhoh सध्या मॅक्सि मम गाड्या २-३ दिसतात त्या म्हण्जे अ‍ॅक्टिव्हा, अ‍ॅक्सेस १२५, आणि टिन एजर्स असतील तर स्कुटी किंवा डिओ.

माझ्या मित्राचा Two Wheeler चा क्लास कालच संपला. Two Wheeler trainer बरोबर असल्याने Two Wheeler थोडी चुकत थोडी बरोबर अशी चालवली तरी चालत होत. आता उद्यापासून त्याला त्याची गाडी आणे पर्यंत मित्राच्या गाडी वर practice करावी लागणार. तरीही त्याला गाडी चालवण्याचा confidence नाही. मी त्याला सांगितले तु जो पर्यंत स्वतः गाडी चालवत नाही तो पर्यंत तुझी भीती कमी होणार नाही. तुमचा काही सल्ला असल्यास कृपया द्या.

आत्ममग्न | 27 November, 2014 - 15:51 नवीन
दुचाकी चालवण्याकरीता शिकवणीची वगैरे गरज नसावी असे माझे मत!
आत्मविश्वास हा खरा शिक्षक!
<<

हे असे कृपया करू नका.

आत्मविश्वास कितीही असला, तरी कवींना कविता 'स्फुरते' तसे आपल्याला रहदारीचे, सुरक्षिततेचे नियम आपोआप मनात स्फुरत नाहीत.

गाडीच्या टेक्निकल बाबी शाळेत जाऊन शिकायला लाज कसली हवी? व्यवस्थीत शिकल्याने किमान रोड सेफ्टी व ट्रॅफिक नियमांचे ज्ञान झाले, तर भारतातली ओव्हरऑल ट्रॅफिक सुधरायला नक्कीच मदत होईल.

मी तर म्हणतो, ज्युनिअर कॉलेजेस मधे सरळ दर वीकांताला टू-व्हिलर शिकण्याचा क्लास ठेवावा मुलांसाठी. व्यवस्थीत कॉलेज ग्राऊंड्सवर योग्य प्रकारे गाडी शिकवावी अन १६ चे पूर्ण झाले की आरटीओजनी तिथेच एक कँप करून यांना लर्निंग लायसन्स इश्यू करावीत.

अन या आधीच्या वयोगटातल्या मुलाच्या हातात कोणतीही गाडी दिसली, तर आधी पालकांना अठवडाभर ट्रॅफिक कण्ट्रोलची सोशल सर्विस सक्तीची करावी. दिवसभर रस्त्यावर भर ट्रॅफिकमधे उन्हातान्हात उभं राहून आपल्या कुलदीपक्/पणतीच्या वयाची मुलं कशी आपला अन लोकांचा जीव धोक्यात घालतात ते यांना पाहू द्यावं व्यवस्थीत.

इब्लिसजी पुर्ण पोस्ट + २
कोणत्याही गाडीच्या बाबतीत शास्त्रशुध्द शिक्षण आणि आरटीओजचे रुल्स नीट पाळण्यासाठी योग्य शिकवणीची गरज असते. स्वतः बरोबर इतर लोकांच्या जिवालाही मग कमी धोका होण्याची शक्यता वाढते.

इब्लिसजी अनुमोदन
ज्युनिअर कॉलेजेस मधे सरळ दर वीकांताला टू-व्हिलर शिकण्याचा क्लास ठेवावा मुलांसाठी. व्यवस्थीत कॉलेज ग्राऊंड्सवर योग्य प्रकारे गाडी शिकवावी अन १६ चे पूर्ण झाले की आरटीओजनी तिथेच एक कँप करून यांना लर्निंग लायसन्स इश्यू करावीत. >> खरचं कॉलेजेस नी असे (Two Wheeler) क्लास ठेवायला पाहिजेत, कारण बरेच जण ट्राफिक रुल न पाळताच गाडी चालवत असतात.
माझा मित्र Two Wheeler शिकायला ज्या क्लास मध्ये जात होता तेथेही ट्राफिक रुल काहीच शिकवले नाहीत, ब्रेक लावून कुठे व कशी गाडी थांबवावी, वेग कसा व किती वाढवावा हेच शिकवलं. मुख्य रस्त्या वरून त्याने एकदाच गाडी चालवली. त्याच्यामुळे मुख्य रस्त्या वरून गाडी चालवायला त्याला भीती वाटते. त्याला सांगितल की कमी गर्दीच्या वेळेला Two Wheeler चालवून practice कर त्याच्याशिवाय तुझी भीती कमी होणार नाही.

मित्र मैत्रीणींनो,

खरंच लाज बाळगु नका , इब्लिस यांचा प्रतिसाद वाचुन हुरुप आला अन क्लास लावला लेडी ट्रेनर शोधुन आणि ३ दिवसात गाडी यायला लागली, आज तर ऑफीस पर्यंत आणली होती. ३ वर्षे गाडी घरीच पडुन होती आणि मी सर्व आशा ही सोडली होती. घरच्यांना ही शाश्वती नव्ह्ती आणी पार्क मधे ही सर्व हसायचे म्हणुन ५० की.मी. लांब (येउन जाउन २ तास ट्रेनने) क्लास लावला जिथे कुणीच ओळखीचं नव्हतं. असं करत ३ दिवसात यायला लागली, तिथे विगो वर प्रॅक्टीस केली होती स्लो स्पीड मधे घरी प्लेजर वर जमणं कठीण झालं होतं तरी रोज अर्धा तास प्रॅक्टीस केली, आता मेन रोडवर ट्रॅफीकमधे कॉन्फीडंटली चालवली तरी पार्क मधे चिंचोळ्या रस्त्यात घाबरायला होतं तरी चालवते (मुख्य म्हणजे मी क्लास ला गेले तेव्हा तिथे अ‍ॅक्टीवा ही चालवली पण घरी येउन प्लेजर चालवायची बोंब होउ लागली पण पाय टेकत टेकत सुरुवात केली , गाडी कुठेही केव्हाही थांबवु शकेन याचा कॉन्फीडंस आला होता) . थोड्या दिवसात तेही क्लीयर होईल. आता मी ही सांगु शकते की सायकल येत नसली तरी टु व्हीलर चालवता येते पण हो कॉन्फीडंट नसाल तर नक्की ट्रेनर कडे जा, लाजु नका, गेला नाहीत तर मात्र कधी यायची नाही.

विरार ला कुणाला जाणं जमत असेल तर मी ट्रेनरचा नं देउ शकेन, माझे तीन दिवसांचे २५००/- घेतले, अर्ध्या तासाचा एक दिवस असे १५ क्लास जे मी ३ दिवसांत पुर्ण केले, जर या ३ दिवसात ही कुणाला गाडी जमली नाही तर पर क्लास १००/- देउन कालावधी वाढवता येतो.

मागच्या आठवडयात मी मित्राला फोन केला तेंव्हा कळले की त्याने मागच्या महिन्यात Activa 125 घेतली. पहाटे ५.०० वाजता तो ४ ते १० किलोमीटर गाडी वर practice करतो (रोज किंवा एक दिवसाआड). आजून गाडीचा balance नीट जमत नाही असे तो म्हणाला ऑफिस मध्ये आजून तो गाडी नेत नाही. गर्दीत गाडी चालवायची भीती वाटते. मी त्याला सांगितले की practice चा वेळ वाढवत जा म्हणजे ५.०० ऐवजी ६.०० किंवा ६.०० ऐवजी ७.००. तुम्ही काय सल्ला दयाल.

@सुरज भोसले ,काय झालं तुमच्या मित्राचं?? जमते का आता गाडी.?
( च्यायला वयाची तीशी गाठली तरी माझं ट्रक चालवायचं स्वप्न काही पुर्ण होईना)

सिंथेटिक जिनियस
माझा मित्र Two Wheller चालवायला लागला पण आठवड्यात ऐक किंवा दोन वेळाच ऑफिसला नेतो. Two Wheeler चालवताना confidently चालवत नाही. आत्ता पर्यंत (२ वर्षात) फक्त ८०० किलोमीटर गाडी चालवली

@ सुरजभोसले ,तुमच्या मित्राला काहीतरी फोबिया वगैरे असावा असे वाटते,त्याने मानोपसचार तज्ञाची मदत घ्यावी असे सुचवतो.

सिंथेटिक जिनियस
तुम्ही म्हणता तसं मलाही जाणवलं कि गाडी चालवण्या पेक्षा काहीतरी कारण काढून ते टाळण्याकडे त्याचा कल असतो. काही वर्षा पूर्वी गाडी चालवायची हा विचार जरी मनात आला तरी त्याला घाम फुटायचा अस तो म्हणाला. गाडी चालवायला लागल्या पासून हि भीती खूप कमी झाली होती.