दोहा, कतार वास्तव्याविषयी

Submitted by चिखलु on 29 January, 2015 - 12:44

दोहा, कतार मध्ये मला नोकरीची संधी आहे. मी, बायको आणि माझी ३ महिन्यांची मुलगी असं माझं कुटुंब आहे. दोहा राहण्यासाठी चांगले आहे का? करमणुकीची काय साधने आहेत? घरभाडे साधारण किती आहे? ३ जणांच्या कुटुंबासाठी साधारण किती मासिक खर्च होईल? सार्वजनिक वाहतुक व्यवस्था कशी आहे? सामाजिक बंधने आहेत का?
http://www.numbeo.com/cost-of-living/compare_cities.jsp?country1=United+States&country2=Qatar&city1=Dallas%2C+TX&city2=Doha थोडीफार माहिती मिळाली आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोहा राहण्यासाठी चांगले आहे का? >>>>

चांगले आणि वाईटच्या व्याख्या सापेक्ष असतात. पण बाकी आखाती देशापेक्षा बरे आहे.

करमणुकीची काय साधने आहेत? चित्रपटगृह. महाराष्ट्र मंडळ, शाॅपिंग माॅल्स, बागा.

घरभाडे साधारण किती आहे?५ते६हजार रियाल

३ जणांच्या कुटुंबासाठी साधारण किती मासिक खर्च होईल? १५०० ते २५०० रियाल + घरभाडे

सार्वजनिक वाहतुक व्यवस्था कशी आहे? जास्त नाही. स्वताची कार घेणे उत्तम

सामाजिक बंधने आहेत का? नाही

साधारण काय पॅकॅज मिळालय ते कळवणार का? त्यानुसार नीट सांगू शकीन. घरभाडी खरच जास्त आहेत. त्यामुळे जर कंपनी घर किंवा एचारे देणार असेल तर फारच उत्तम. नाहितर एक मोठी रक्कम निव्वळ घरभाड्यासाठी जाईल.

दोहा राहण्यासाठी चांगले आहे. आणि कसलिही बंधने नाहित. स्त्रिया ड्राईव करतात. नो बुरखा.

धन्यवाद अतरंगी, स्वप्नांची राणी , डीविनिता
फोन न दिल्यास चालेल
साधारण १५००० मासिक ऑफर आहे. अजुन अंतिम बोलणी, करार नाही झाला.

अतरंगी: तुमचाही फोन क्र द्या, मी कॉल करेल

माझा थोडा गोंधळ झालाय. हे १५००० डॉलर्स की कतारी रियाल?

अतरंगी यांची माहिती कधीची आहे ते माहित नाही. पण मी सध्या दोह्यात राहतेय. १५०००$ असतील तर simply grab it!!

15000 QR Basic + 9500 as a rent + Free Medical for Family + Schooling अशीही ऑफर असेल तर चालण्यासारखी आहे.

पण घरभाडे जर मिळणार नसेल तर माझे स्पष्ट मत आहे की ही ऑफर स्विकारू नये, १५००० रियाल असतील तर.

सध्या दोह्यात घरांचा प्रश्ण बिकट आहे. आणि मी नुकतेच घर बदललेय त्यामुळे ताजी महिती देऊ शकेन. २बीएच्के फ्लॅट अनफर्निश्ड कमितकमी ६५०० कतारी रियाल आणि या किमतीत जिथे मिळतो त्या बिल्डींगची हालत यथातथा असते. याशिवाय सुमारे ६०० रियाल पाणी आणि वीजेसाठी जातात.

चांगल्या रहण्याजोग्या ठीकाणी ७५०० अनफर्निश्ड तर ८५००-१२००० असा फुल्लीफर्निश्ड चा दर आहे. मी जिथे राहतेय तिथे ९५०० कतारी रियाल देतेय २ बीएचके साठी.

माझाही नंबर देऊ का?

धन्यवाद स्वप्नांची राणी.
१५००० कतारी रियाल
तुम्हाला संपर्कातुन इमेल लिहितो

I stay in Doha-Qatar since 2007. In west bay area where I live, rents are QR-16000/-PM for 3BHK , You may contact me for further info.

औंध, बाणेर मधे १० ते १५ हजारात २ बीएचके भाड्याने मिळतो.

पण प्रभात रोडला २ बीएचके साठी २० ते २५ हजार भाडे आहे.

इथले प्रतिसाद वाचले, माझ्या नवर्‍याला सध्या कतार दोहा मध्ये १५००० कतारी रियाल हीच ऑफर मिळतेय, वरती लिंक दिली आहे त्या वेबसाईट www.qatarliving.com वर ५०००ते ६५०० अश्या रेंज मध्ये फुल्ली फर्निश्ड स्टुडिओ आणि १ बीएच्के फ्लॅट्स आहेत, माझा मुलगा पावणे ३ वर्षाचा आहे तर साधारण नर्सरी, प्राईमरी शाळांचा खर्चं किती असतो, बाकी लिविंग कॉस्ट या गोष्टी विचारात घेऊन तिथे राहुन आम्ही सेविंग करु शकतो का? आम्ही ५ वर्षांसाठी जायचा विचार करतोय, कृपया मदत करा.

मुग्धा केदार,

त्यांची कंपनी नक्की कुठे आहे? दोहा मधेच राहणार आहात का ? कि दोहा पासून बाहेर कुठे काम करणार आणि राहणार आहात ?

दोहा शहरातले आणि आजूबाजूचे रेट्स यात खूप फरक आहे.

For e.g.
राज लाफ्फान वगैरे बाजूला काम असेल तर अल खोर ला राहणे सोयीस्कर. तिकडे काम करणार असाल आणि राहायला दोहा मध्ये असाल तर खूप लांब पडेल आणि शिवाय दोहा मध्ये घराचे रेंट पण जास्त आहेत.

कंपनीची साईट किंवा ऑफिस कुठे आहे ते आधी विचारून पहा.

कमी/ जास्त हे सापेक्ष आहे. आपल्याला जे योग्य वाटते ते कोणाला कमी वाटू शकेल आणि आपल्याला जे कमी वाटते ते कोणाला योग्य/ बऱ्यापैकी वाटू शकेल.

खर्चाचा अंदाज आला की पगारातून किती शिल्लक राहते ती कमी कि जास्त हे ज्याचे त्याने ठरवावे.