आयफोन हरवला :(

Submitted by हर्ट on 7 January, 2015 - 06:01

नमस्कार, मी काल घरी परत येताना माझ्याकडे खूप जास्त सामान होते म्हणून जेवण झाल्यावर एक टॅक्सी केली. त्यावेळी २० टक्के बॅटरी शिल्लक होती. मी टॅक्सीमधे बसल्यावर ती कधी संपली मला कळले नाही. मला वाटले की आता आपण घरीच पोचतो आहे तर सगळी बॅटरी संपली तरी चालेल. पण मी खाली घरापाशी उतरलो आणि सामन घेऊन १४ व्या माळ्यावर पोचलो. चार्जर बाहेर काढला आणि खिसे चाचपून बघतो तर मोबाईल खिशात नाही. मग काय धडधड खाली उतरलो आणि तेवढ्या टॅक्सी गेलेली होती. मी नंतर त्रकार नोंदवली. ड्रायवर सापडला पण तो म्ह्णत आहे की त्याला फोन सापडला नाही.

माझा मुख्य प्रश्न आहे की माझा फोन चार्ज नाही. त्यामुळे मी रिंग करु शकत नाही. अपेक्षा होती की ज्याने कुणी घेतला असेल तर फोन चार्गे करेल. पण अजून तोच मजकुर ऐकतो आहे.

मी अ‍ॅपलच्या साईट्वरुन फोन कुठे आहे बघून आहे. पण मला वाटते ती जागा जिथे फोन थांबला ती दर्शवते आहे. कारण तोच वाहनाचा रास्ता होता काल घरी येताना.

मी अजून काय करु शकतो काही सुचते का?

मी आज खूप जेरीस आलो आहे. टोटली ग्लम!!! साडेसाती Sad

धन्स.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे.. Sad
>>>> पण मला वाटते ती जागा जिथे फोन थांबला ती दर्शवते आहे. <<<<
जिथे उतरलात तिथेच पडलाय का बघा, नाहीतर घरात आणलेल्या सामानात ब्यागेत वगैरे आहे का बघा.

हरवलेली वस्तू कुठे सापडेल हे मला वाटते कृष्णमूर्ती पद्धतीने सांगता येते. विचारून बघ.
आशा ठेव रे.. मिळतात अशा वस्तू.

ड्रायवर सापडला पण तो म्ह्णत आहे की त्याला फोन सापडला नाही. >>>>>>
त्याला पोलिसांनी विचारले का तुम्ही विचारले? पोलिसानी विचारले की त्याला आठवेल.

पण मला वाटते ती जागा जिथे फोन थांबला ती दर्शवते आहे. कारण तोच वाहनाचा रास्ता होता काल घरी येताना. >> तुम्हाला वाटते की खरच तीच जागा दाखवत आहे? पोलिसांना कंप्लेंट करा आणि त्यांना त्यांचे काम करु द्या.
अ‍ॅपलला फोन करुन फोनब्लॉक करा.

आणि साडेसातीचे काही नसते. जर इतके वाटत असेल तर बाहेर पडताना काहीच घेउन जात जाउ नका म्हणजे काही हरवणार नाही.

आय क्लाउड्च्या थ्रू फोनवर मेसेज ठेवता येईल कॉलबॅक नंबर देऊन. नपेक्षा गेलेला आहेच तर आएमईआय वरून ब्कॉक कर सरळ.

>>पण मला वाटते ती जागा जिथे फोन थांबला ती दर्शवते आहे. कारण तोच वाहनाचा रास्ता होता काल घरी येताना. <<
शक्यता आहे कि फोन डेड झाला ते लोकेशन असावे. तुझ्या पोस्टवरुन तु "फाइंड आयफोन" केल्याचं वाटतंय. माझ्यामते, हरवलेला फोन चार्ज होण्याची वाट बघण्याशिवाय दुसरा उपाय (पोलिसी खाक्या सोडुन) दिसत नाहि. फाइंड आयफोन जबर्दस्त टुल आहे, चेक करत रहा, फोन सापडेल...

आय क्लाउड्च्या थ्रू फोनवर मेसेज ठेवता येईल कॉलबॅक नंबर देऊन. नपेक्षा गेलेला आहेच तर आएमईआय वरून ब्कॉक कर सरळ.>>

योकु, मी आय-क्लाऊड द्वारे निरोप ठेवला आहे पण अजून तो पोचला नाही कारण फोन चार्ज नाही.

नपेक्षा गेलेला आहेच तर आएमईआय वरून ब्कॉक कर सरळ.>> हे कसे करता येईल सांगाल का प्लीज?

मी अविरत फाईंड फोन अ‍ॅप वापरुन फोन कुठे आहे ते शोधत आहे.

लिंबूटिंबू, खूप शोधाशोध करुन झाली पण काहीच हाताशी येत नाही.

काल रात्री १ वाजता इथे पोलिसात तक्रार नोंदवली. त्यांच्यावर भरवसा आहे. लेट अस होप.

सर्वाअंचे धन्यवाद.

पोलिस काहीच मदत करत नाहीत. अश्या कितीतरी कॉम्प्लेंत पडलेल्या असतात त्यांच्याकडे. फोन ब्लोक करा. मोबाइलचे बिल जपून ठेवले असेल तर त्यावर आएमईआय नंबर मिळेल बॉक्स असेल तर त्यावरही असतो.

पोलिस काहीच मदत करत नाहीत. अश्या कितीतरी कॉम्प्लेंत पडलेल्या असतात त्यांच्याकडे. फोन ब्लोक करा. मोबाइलचे बिल जपून ठेवले असेल तर त्यावर आएमईआय नंबर मिळेल बॉक्स असेल तर त्यावरही असतो.>>>

काल रात्री १ वाजता इथे पोलिसात तक्रार नोंदवली. त्यांच्यावर भरवसा आहे. लेट अस होप.
बी बहुतेक भारतातल्या पोलिंसाबद्दल बोलत नाहिये, ... Wink

कुणी मला सांगेल का की फोन कसा ब्लॉक करतात? धन्यवाद.>>>
बहुतेक ज्या मोबाइल कंपनीचं नेटवर्क वापरतात त्यांना कॉल करुन ईएमआय नंबर सांगुन ब्लॉक करता येउ शकतो, कदाचित ते पोलिस तक्रार केल्याचा पुरावा मेल करायला सांगु शकतात..

धन्स बी, मी फॅन आहे कलामांचा,
आणि मला अहो जाहो न केलेलं आवडेल Happy