Submitted by शब्दमेघ on 27 February, 2008 - 05:19
स्वप्नातिल मूर्त इच्छांना
अस्तित्वातील शिल्प मिळू दे
हे देवा मला लवकर
छानशी बायको मिळु दे
तारुण्याच्या या खळखळत्या प्रवाहाचा
आता सरीतेशी संगम होवू दे
अन् आयुष्याच्या सागरा मधे
माझ्या सोबत यथेच्च बागडणारी
हे देवा मला लवकर
छानशी बायको मिळु दे
जीवनाच्या या वृक्षा वरती
त्या वेलीचे आयुष्य बहरुदे
सुगंधित तिच्या सहवासाने
आयुष्य माझे फुलुदे
हे देवा मला लवकर
छानशी बायको मिळु दे
स्वप्नातिल मूर्त इच्छाना
आस्तित्वातील शिल्प मिळू दे
हे देवा मला लवकर
छानशी बायको मिळु दे !
------------- गणेशा
गुलमोहर:
शेअर करा
शोधा म्हणजे सापडेल
किती हा धावा देवाजवळ तोही बायकोसाठी. खरचं बायको मिळणं दुर्मिळ झाले आहे. गणेशा मिळेल मिळेल लवकरच तुला बायको. असाच लिहित रहा. छान आहे तुझी कविता.
तथास्तु
तथास्तु, नक्कि लवकर छानशी बायको मीळेल. छान आहे कवीता