डॉलरचे दर आणि भारतीय चलन

Submitted by हर्ट on 26 January, 2015 - 00:33

मी इथे सिंगापूर हे उदाहरण घेतो कारण मी इथे नोकरी करतो आहे.

मागिल वर्षी १ सिंगापूर डॉलर = ४९.५० रुपये असे दर होते. आत्ताच्या घटकेला
१ सिंगापूर डॉलर = ४५.५० रुपये असे दर सुरु आहेत.

अर्थशास्त्राची माहिती असणार्‍यांना एक विचारायचे आहे की भारतीय बजेट २८ फेब १५ ला आहे. त्यावेळी हे दर आणखी खाली घसरणार आहे का? म्हणजे १ सिंगापूर डॉलर भारतीय रुपयामधे कन्व्हर्ट केले तर रुपये कमी होतील का?

धन्यवाद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपले असेच!
निदान धन्यवाद तरी म्हणताहेत, उगीच काहीतरी वेडेवाकडे बोलले नाहीत म्हणून आपणच त्यांना धन्यवाद म्हंटले पाहिजे.
किंवा मायबोलीकर म्हणतात तसे धन्स.

दर खाली उतरणार की चढणार ह्याचा अंदाज करणे कठीण असते. Happy ग्लानी आलेल्या भारतीय अर्थ्व्यवस्थेला उभारी येईल असे दिसतय त्यामूळे दर अजून पडू शकेल असे मला वाटते. इथे बघा.

४३ पर्यंत तर नक्की जाईल येत्या काही काळात.

मागे २००९ मध्ये मंदी आली तेंव्हा रुपया इतका वधारला की तूलनेत अमेरिकी डॉलर ४८ वरुन ३६ पर्यंत आला होता. परदेशात नोकरी करणार्‍या आणि नेमाने भारतात ते पैसे पाठवणार्‍यांना बरेच नूकसान झाले. मी त्यावेळी पैसे फक्त एकवेळी भारतात पाठवले. बाकी काही Foreign Currency Fixed Deposit मध्ये ठेवले. डॉलरचे मूल्य पून्हा वधारले तेंव्हा पैसे भारतात आणले. नूकसान झाले नाही किंबहूना खूपच कमी झाले.

तूमचे नक्कीच NRE - NRO खाते असेलच. तूमची भारतातील बँक Foreign Currency Fixed Deposit बद्दल तूम्हाला अधिक माहिती देउ शकेल.

आपले असेच!
निदान धन्यवाद तरी म्हणताहेत, उगीच काहीतरी वेडेवाकडे बोलले नाहीत म्हणून आपणच त्यांना धन्यवाद म्हंटले पाहिजे.
किंवा मायबोलीकर म्हणतात तसे धन्स
----- नवा धागा काढल्याबद्दल धन्यवाद आहेत असे समजायचे...

रॉबीनहूड यान्च्या पोस्टी नेहेमीच अभ्यास करण्यासारख्या आणि मार्गदर्शक असतात. Happy

झक्की धन्स Happy आणि ह्या बीबीवर आपले चरण स्पर्श झालेले पाहून मला रोमहर्ष झाला. त्याबद्दल धन्यवाद Happy

सेनापती धन्यवाद. सध्या माझी अवस्था अशी आहे की भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे म्हणून मला एकीकडे आनंद होतो आहे आणि मी नियमानी भारतात पैसे पाठवतो म्हणून आता थोडे जास्त पैसे पाठवावे लागतील म्हणून वाईटही वाटत आहे Happy

रॉबीनहूड यान्च्या पोस्टी नेहेमीच अभ्यास करण्यासारख्या आणि मार्गदर्शक असतात.
खरे आहे. त्यांची पोस्ट दिसली की मला लगेच दुसरीकडे जावे हे कळते.

बी

सिंगापुर डॉलर हा मागच्या ७ महिन्यामध्ये बराच पडला आहे. मागच्या जुलै मध्ये USD : SGD rate $1.24 होता आज $१.३४ आहे. भारतिय रुपया वधरण्यपेक्षा पेक्षा सिंगापुर डॉलर जास्त घसरला आहे. सिंगापुर डॉलर हा युरो , येन घसरण्यामुळे घसरला आहे.

तरीपण माझ्या मते भारतिय रुपया जोपर्यन्त हे सरकार आहे तो पर्यन्त एकतर स्थिर राहिल किंवा वधारेल. जरी स्थिर राहिला तरी व्याजदरामुळे भारतात पैसे ठेवणे फायद्याचे होईल.