कॉमन "स्त्री"चा आधार

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 23 January, 2015 - 07:03

बरेच दिवस झाले काही लिहील नाही. अस कस झाल? कोणत्या विषयावर लिहायचं बर? काहीच विषय नाही मिळाला तर एक विषय खूप कॉमन होऊन बसतो... भारतीय स्त्री आणि तिच्यावर होत असलेला अन्याय. मग तो नवनवीन पैलू ने मांडायचा. पिडीत स्त्रीचे आत्मकथन. लिखाणाला नवीन विषय. पुरुषप्रधान संस्कृतीत पिच्चून गेलेली स्त्री. कधी अन्यायाला सहन करणारी तर कधी न्यायासाठी दाद मागणारी. अनेक लेखकांच्या लेखणीतून साकार झालेली, व्यक्त झालेली स्त्री. आजच्या या लेखालाही तोच कॉमन "स्त्री"चा आधार.

स्त्रीवर होत असलेल्या अन्यायावर एखादा लेख प्रसिद्ध होतो. उपहासात्मक, आत्मचरित्र मंiडल जात. लेखकाला लेखणीतून अशा विषयाला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन केल जात. कमेंट च्या रुपात अनेक वाचकांचा प्रतिसाद मिळतो. त्यातूनही नवीन मुद्दे, नवीन अन्याय, चीड व्यक्त होते. अशाच एका कमेंटमध्ये वाचनात आल... "या सगळ्या गोष्टी घडत आहेत न म्हणून मुलगीच नको वाटते." व्वा रे व्वा ती आई. जननी. माता आणि सगळ्यात आधी धन्य ती स्त्री. (जी कधी काळी मुलगी होती.)

आधीच या पुरुषप्रधान संस्कृतीत "मुलगाच पाहिजे" या विचारसरणीपायी नाहक भ्रूण हत्या होत आहेत. आणि त्यात आता हे नवीनच काहीतरी. अरे का सारख सारख घाबरवून हतबल बनवताय या स्त्रीला? प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.. आई च्या रुपात, कधी बहिणीच्या, कधी मैत्रिणीच्या, कधी शिक्षिकेच्या तर कधी पत्नीच्या.. मग हा पुरुष का नाही उभा राहू शकत स्त्रीच्या मागे. खंबीरपणे. का तिच्या शालीनतेवर, क्रौमार्यावर तिला अग्निपरीक्षेस भाग पाडल जात?

बहिणीपेक्षा तिच्या मैत्रिणीवर नजर ठेवणारा "मुलगा"नको अस का नाही वाटत? रस्त्यावरून जाणार्या मुलीला छेडणारा "मुलगा" नको अस का नाही वाटत? मुलीच्या मागे मागे लागून तिचा होकार मिळवणारा "मुलगा" नको अस का नाही वाटत? नजरेत वासना साठवलेला "मुलगा" नको अस का नाही वाटत? दारू, सिगारेटच व्यसन जडेल म्हणून "मुलगा" नको अस का नाही वाटत? उद्या नवरा होऊन बायकोवर पुरुषार्थ गाजवणारा, तिच्यावर हात उचलणारा "मुलगा" नको अस का नाही वाटत? म्हातार्या आई बापाला एकट टाकून पोटापाण्यासाठी अहोरात्र खपणारा, स्वतःच्या गुंगीत असलेला "मुलगा" नको अस का नाही वाटत?

असा विचार नाहीच येणार मनात कारण आपण गृहीत धरून चालतो कि आपला मुलगा अस काही नाही करणार पण मुलगी, तिच्याबाबतीत अस काहीही होऊ शकत? का माहितीय कारण समोर अन्याय होतोय हे दिसत असूनही आपला मुलगा "षंढ" होऊन, हतबलपणे तो प्रकार पाहत राहतो. एक "मुलगा" अन्याय करतो आणि दुसरा मुलगा "सहन कर" अस सांगून अन्यायाला आणखीन वाव देतो. स्त्री "मुलगा" या रुपात असलेल्या पोलिसाकडे जाते दाद मागायला तो तिला वकिलाकडे पाठवतो. हो,... त्याआधी तिला तिच्यावर झालेला अन्याय सिद्ध करण्यासाठी डॉक्टर या रुपात असलेल्या "मुलगा" या प्रकाराकडेही जाव लागत. खूप पायर्या आहेत आणि बरच काही... जे हल्ली हर दुसर्या वर्तमान पत्रात अगदी सविस्तरपणे लिहील जात. कॉमन झालय सगळच. अब्रू... अब्रूचे धिंडवडे... सारच.
अलिप्त राहून, नुसते मोर्चे काढून काय उपयोग? मानसिकता बदला… समाजाची नको स्वतःची. खंबीर व्हा आणि खंबीरपणे कोणासाठी तरी उभे राहा. हातात राखी बांधून घेतली म्हणून ती राखी बांधणाऱ्या बहिणीचच रक्षण करायचं दुसरीच कशाला? हि विचारसरणी सोडा. स्त्रीला मानसिक आधाराची नेहमीच जास्त गरज असते.. तो देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.

मुलगीच नको म्हटल्यावर कुठून जन्माला येणार हो शिवबाला घडवणारी माता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मि बाई, कल्पना चावला आणि अशाच किती तरी जणी.

मयुरी चवाथे- शिंदे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू तू माझ्यात दडलेल लहान मूल या तोडीचा विनोद केलायस.

ती काळी मुलगी नसून क्धी काळी मुलगी आहे. रंग नव्हे वन्सपॉनटाइम!

स्त्री "मुलगा" या रुपात असलेल्या पोलिसाकडे जाते दाद मागायला तो तिला वकिलाकडे पाठवतो. हो,... त्याआधी तिला तिच्यावर झालेला अन्याय सिद्ध करण्यासाठी डॉक्टर या रुपात असलेल्या "मुलगा" या प्रकाराकडेही जाव लागत. >>> Happy
बघ, आपल्याच मनातील 'हिडन बायसेस' लिहिताना असे नकळत कागदावर उमटतात. पोलीस, वकील, डॉक्टर ह्या व्यवसायात स्त्रिया नाहीत का?
राखी बांधणाऱ्या बहिणीच रक्षण करायचं, पण बहिणीने फक्त भावालाच राखी का बांधावी? आपले रक्षण करू शकेल अशा स्त्रीला बांधली तर काय हरकत आहे??

तुम्ही सगळ्या स्त्रीमुक्तीवाल्या नाठाळ बायका (अपवाद वैद्यबुवा, कारण ते बुवा आहेत) आहात, तुम्हाला या लेखातील गांभिर्य कधीच समजणार नाही.

धन्यवाद सुमुक्ता आणि आगाऊ (?)

(जी कधी काळी मुलगी होती.) अरे मला म्हणायचं आहे (कोणे एके काळी ती देखील मुलगी होती.)

सीमंतिनी- मला देखील दोन मुलीच आहेत ज्या एकमेकीना राखी बांधतात पण मी जे लिहील आहे ते ७०% ते ८०% समाज पद्धतीवर लिहील आहे. 'हिडन बायसेस' वगैरे काही नाही. स्त्रिया सगळ्या क्षेत्रात एक पाऊल पुढेच आहेत, पण जेव्हा "मुलगा" हा विषय येतो, तेव्हा "मुलगा" या प्रकारची मानसिकता लिहायची होती फक्त.

ए आगावा मी फक्त आशूच्या विनोदावर प्रतिक्रिय दिलीये हा.. लेखबद्दल कैप्पण बोलले नाहीय. आवाज नै कर्नेका!

बहिणीपेक्षा तिच्या मैत्रिणीवर नजर ठेवणारा "मुलगा"नको अस का नाही वाटत? रस्त्यावरून जाणार्या मुलीला छेडणारा "मुलगा" नको अस का नाही वाटत? मुलीच्या मागे मागे लागून तिचा होकार मिळवणारा "मुलगा" नको अस का नाही वाटत? नजरेत वासना साठवलेला "मुलगा" नको अस का नाही वाटत? दारू, सिगारेटच व्यसन जडेल म्हणून "मुलगा" नको अस का नाही वाटत? उद्या नवरा होऊन बायकोवर पुरुषार्थ गाजवणारा, तिच्यावर हात उचलणारा "मुलगा" नको अस का नाही वाटत? म्हातार्या आई बापाला एकट टाकून पोटापाण्यासाठी अहोरात्र खपणारा, स्वतःच्या गुंगीत असलेला "मुलगा" नको अस का नाही वाटत?

>>>>>>>>>

मला हे सारे वाटते. Happy
मी तर मुलीसाठी नवसही टाकलाय.

सुरेख- धन्यवाद

ऋन्मेऽऽष- आपल्या प्रतिसादाची अपेक्षा होतीच..तुमचा "मुलगीच हवी" हा लेख वाचला होता.

हो, मी अश्या विषयावर प्रतिसाद देतोच, हा विषय कितीही घिसापीटा झाला तरी हा प्रश्न अनादी कालापासून आहेच.
तसेच हल्लीचे बलात्कार, विनयभंग, गर्ल चाईल्ड अ‍ॅब्युज, सेक्शुअल हॅरासमेंट .. अगदी जन्मापासून शेवटपर्यंत स्त्रियांना भोगावे लागणार्‍या या गोष्टींनी बर्‍याच जणी उघड वा छुपा, या कारणासाठी आजही मुलगी न झाली तरच बरे असा विचार करतात. चूक असो वा बरोबर, दुर्दैवी आणि समाजासाठी लांच्छनास्पद आहे इतके मात्र खरे.

मयुरी चवाथे-शिंदे,

तुम्ही म्हणालात की :

>> बहिणीपेक्षा तिच्या मैत्रिणीवर नजर ठेवणारा "मुलगा"नको अस का नाही वाटत? रस्त्यावरून जाणार्या मुलीला
>> छेडणारा "मुलगा" नको अस का नाही वाटत? मुलीच्या मागे मागे लागून तिचा होकार मिळवणारा "मुलगा" नको
>> अस का नाही वाटत? नजरेत वासना साठवलेला "मुलगा" नको अस का नाही वाटत? दारू, सिगारेटच व्यसन
>> जडेल म्हणून "मुलगा" नको अस का नाही वाटत? उद्या नवरा होऊन बायकोवर पुरुषार्थ गाजवणारा, तिच्यावर
>> हात उचलणारा "मुलगा" नको अस का नाही वाटत? म्हातार्या आई बापाला एकट टाकून पोटापाण्यासाठी
>> अहोरात्र खपणारा, स्वतःच्या गुंगीत असलेला "मुलगा" नको अस का नाही वाटत?

यावरची तुमची मीमांसा पटली नाही :

>> असा विचार नाहीच येणार मनात कारण आपण गृहीत धरून चालतो कि आपला मुलगा अस काही नाही करणार

हे गृहीतक कशाच्या आधारे मांडलंत ते कळलं नाही. लोकांना मुलगी वेगळ्याच कारणासाठी नको असतात.

असो.

छेडछाडीच्या संबंधी माझं मत पूर्वी एका धाग्यावर नोंदवलं होतं. इथे परत सांगतो :

>> स्त्री ही प्रथम माता आहे. हे खोलवर ठसलं पाहिजे. आपली आई कितीही कुरूप वा बेढब असो, आपल्याला ती
>> आवडतेच. तसाच दृष्टीकोन परस्त्रीसंबंधी ठेवला पाहिजे.

आ.न.,
-गा.पै.