स्थळ : ऑफिस - बॉसच्या केबिन बाहेरचा परिसर
अजय : ए चंदर बॉसची दुपारी साडे तीन वाजता मिटिंग आहे, तो संद्याकाळी काही परत येईल असं वाटत नाही, चल आपणही हाफ डे कल्टी मारून मस्त एक पिच्चर टाकूया.
चंदर : आज नको रे, मला हि फाईल कम्प्लीट करायची आहे.
अजय : अरे चल ना यार, काय भाव खातो ? ती शीतल आली तर आत्ता उड्या मारत येशील.
चंदर : तू असं कर ना, त्या मिनलला घेऊन जा सिनेमाला.
मिनल : वाव मस्त प्लान य, अजय चल खरंच जाऊया आपण !
अजय : ठीक य, तू आधी त्या शीतलला विचार, ती आली कि चंदर एका पायावर तयार होइल.
मिनल : पण त्याचा आता काही उपयोग नाही.
अजय : का ?
मिनल : अरे शीतल बॉसबरोबरच मिटींगला चाललीय,
चंदर : काय ?
मिनल : हो, माहितीय मला,
अजय : पण ती आपल्याला काहीच बोलली नाही.
मिनल : अरे मिटींग वगैरे काही नाही, ते दोघं लंचला बाहेर चाललेत आणि बॉस आज तिला प्रपोज करणार आहे.
चंदर : काय ? आणि हे तुला आधीच माहित होतं ?
मिनल : हो बऱ्याच दिवसांपासून त्याचं डेटिंग चाललंय.
अजय : तरी तुला सांगत होतो वेळ घालवू नकोस, पाहिलस ना कासवा इथेही ससाचं जिंकला.
चंदर : जाऊ दे यार, चुकलच माझं, मी या आधीच शीतलला विचारायला हवं होत.
मिनल : अरे पण अजूनही वेळ गेलेली नाहीय, आत्ताही तू विचारू शकतोस.
चंदर : पण ती तर बॉस बरोबर ss
अजय : अरे पण तू विचारून तर बघ एकदा, त्यांना निघायला अजून दीड तास बाकी आहे.
चंदर : बरं ss बघतो प्रयत्न करून
मिनल : अरे फार-फार तर काय ती नाही म्हणेल आणि काय ? ए शीतलss या चंदरला बघ तुला काहीतरी विचारायचंय.
( आतून शीतल बाहेर येते आणि चंदरला विचारते )
शीतल : काय रे चंदर, काय झालं ? काय विचारायचंय ?
अजय : अरे बोल ना साल्या, हा तुझा शेवटचा चान्स आहे.
चंदर : हा थांब ना यार विचारतो.
शीतल : चंदर काय विचारायचंय ते लवकर विचार ना ? मला आत खूप कामं आहेत.
चंदर : शीतल तु बॉस बरोबर मिटींगला बाहेर जाणार आहेस का ?
अजय : बघ साल्याने विचारून - विचारून काय विचारलं तर, अरे मघाशी काय ठरवलंयस ? घाबरतोस कशाला विचार ना डायरेक्ट काय ते ?
चंदर : हो थांब ना विचारतो यार, तूss तू ss
शीतल : अरे बोल न चंदर लवकर काय ते ?
चंदर : शीतल तू आज माझ्याबरोबर दुपारी लंचला बाहेर येशील ?
शीतल : का नाही येणार, अरे पण तू हि साधी गोष्ट विचारायला इतका वेळ घेतलास ?
अजय : आयचा घो, देखा चुहा भी शेर बन गया !
शीतल : वेडाच आहेस, मला माहितीय मी तुला आवडते, आपण रोज एकत्र घरी येतो-जातो, मलाही तू खुप आवडतोस, रोज मला वाटायचं आज तरी तू मला प्रपोज करशील पण तू आपला गप्पच, म्हणून आज आम्हाला हे सगळ नाटक कराव लागलं.
मिनल : हेय कॉंग्रॅच्युलेशन्स चंदर, सेलिब्रेशन व्हायला पाहिजेss
चंदर : thanks यारsss, OK… आज माझ्याकडून तुम्हा सर्वांना लंच पार्टी !
चुहा बना शेर
Submitted by यतिन-जाधव on 15 January, 2015 - 01:49
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कैच्या काई
कैच्या काई
काहीही:D
काहीही:D
ऊफ्फ्फ्फ्फ!
ऊफ्फ्फ्फ्फ!
चेश्टा?????????????????
चेश्टा?????????????????
अरे पण प्रपोज कुठे केले? फक्त
अरे पण प्रपोज कुठे केले? फक्त लंचलाच विचारतो ना तो सुद्धा... यालाच प्रपोज म्हणायचे झाल्यास माझ्या आजतागायत ३०-३२ ग'फ्रेंड असत्या
फक्त लंचलाच विचारतो ना तो
फक्त लंचलाच विचारतो ना तो सुद्धा... >> @ऋन्मेऽऽष "२४ विबासं कायद्याच्या कलम २३ अनुसार हे प्रपोजलच आहे". आता फक्त दोघांनी लग्न एकमेकांशी न कराता दुसर्या कुणाबरोबर केल की "२४ विबासं" कायद्याचे २४ कलम पुर्ण केल्याबद्दल त्यांचा माबोवर जाहीर सत्कार केला जाईल.
हा २४ विबास कायदा काय आहे?
हा २४ विबास कायदा काय आहे?
@ऋन्मेऽऽष माबो अभ्यास वाढवा.
@ऋन्मेऽऽष माबो अभ्यास वाढवा. (त्यानंतर "माझेपण २४ विबासं आणि १ गअफ्रे" असा धागा नाही काढला तरी चालेल. काढलाच पाहिजे अस काही नाही.)
आता ॠन्मेष यांच्याकडुन
आता ॠन्मेष यांच्याकडुन विबांसवर २५ धागे आले तर त्याचे खापर निव्वळ अभिजित नवले साहेबांवर फोडले जावे ही नम्र विनंती मी मायबोलीकरांना करत आहे

विबासं की विबांस .. कोणाचे
विबासं की विबांस .. कोणाचे बरोबर आहे.. कि कुठेच अनुस्वार नाही.. भाई हिंट तर द्या.. शप्पथ नाही काढत धागा
सहीये समजले.. माबो अभ्यास
सहीये समजले.. माबो अभ्यास वाढवा हिच हिंट.. विबासं हे सर्च मध्ये टाकले आणि पट्टकन उत्तर मिळाले.. विवाहबाह्य संबंध.. वॉव!

त्यानंतर २४ आकडा टाकल्यावर ती कोणाची आहेत हे हि समजले
मायला आता तर माझे ३०-३२ पोरींच्या प्रेमात एकतर्फी पडून झालेय ते लिहायला खरोखर हात शिवशिवू लागलेत
प्रेमळ मायबोलीकरांसाठी एक
प्रेमळ मायबोलीकरांसाठी एक प्रेमळ धागा आला आहे. सूसांनल.
Dhavati katha vatali ....
Dhavati katha vatali .... Khup lvkr sampli