अफलातून धंदे

Submitted by रमेश भिडे on 24 December, 2014 - 01:50

नुकत्याच भारत भेटीमध्ये एका मित्राने काही किस्से सांगितले. मुंबईत लोक कायकाय धन्दे करतील याचा नेम नाही :

१) काही लोक अमेरिकेत ट्रस्ट चालवतात आणि अमेरिकेतून वापरलेले कपडे हिंदुस्तानात गरीब लोकांना वाटण्यासाठी घेऊन येतात (विना मुल्य आणि विना इम्पोर्ट ड्युटी) आणि मुंबईत रस्त्यावर `स्वस्त कपडे' म्हणून विकतात.

२) एक माणूस ऑफिस मध्ये आला होता. माझ्या गाडीचा एक्सिडेंट राजेस्थानला झाला, ड्रायवर पळून गेलाय. म्हणून दुसऱ्या एका ड्रायवरला राजेस्थानच्या एका गावात पोलिस स्टेशन मध्ये हजर करण्यासाठी घेऊन जातोय, १०,०००/- मागतोय, कारण १ दिवस जेल मध्ये बसावे लागेल. पण ५,०००/- वाला कोणीही मिळत नाही, म्हणून ह्याला झक मारून घेऊन जावे लागणार'
म्हणजे एक्सिडेंट करणारा दुसराच कोणीतरी, हजर होणारा वेगळाच, जो हजर होणार त्याला १०००० आणि पळालाय तो सुद्धा सुखी, `नशीब पोलिसांच्या लफड्या मध्ये अडकलो नाही'

३) काही लोकांचा धंदा म्हणजे आर.टी.आय. फाईल करणे आणि नंतर त्या कंपनीला, त्याच्या मालकाला आर.टी.आय. च्या आधारे मिळवलेल्या माहितीद्वारे ब्ल्याकमेल करून पैसा कमवणे.

४) आर.टी.आय वरून ब्ल्याकमेल करत असणाऱ्यांना बदडवून काढणे आणि पैसे कमवणे

*अभय जोशी ,डहाणू. यांच्या अनुभवांवर आधारित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भिक मागने हा खुप सोपा व्यवसाय आहे आजकाल ... पुण्यात जे एम रोड ला असेच काही भिकारी आहेत...सध्याकाळी भिक मागत असतात हॉटेल च्या गर्दीत ...म्हातारे आहेत .. खायचे काहि दिले तर नको म्हनतात ... पैसे हवे असतात... रात्री उशिरा रिक्षा ने जाताना पाहिले आहे त्याना किती वेळा...तसेच डेक्कन , नळ स्टॉप च्या सिग्नल ला लहान मुले आणि बायका असतात... पन कोनालाच काहि दुआवे वाटत नाही ... त्यापेक्शा निवारा वैगेरे ठिकाणी दिलेले चाण्गले/..

Pages