Dandy - Walker Malformation

Submitted by स्पार्टाकस on 25 December, 2014 - 13:27

माझ्या एका मित्राला नुकताच मुलगा झाला. अमेरीकेतील पद्धतीप्रमाणे मुलाच्या जन्मानंतर त्याची पूर्ण तपासणी केली असताना अल्ट्रासाऊंडमध्ये त्याच्या मेंदूची पूर्ण वाढ झाली नसल्याचं आढळून आलं आहे.

या बाबत डॉक्टरांकडून मिळालेली माहीती अशी -

माणसाच्या मेंदूचे दोन अर्धगोलाकृती (Hemeshphire) भाग असतात. हे दोन्ही भाग जोडणार्‍या मेंदूच्या भागाला सेरेबेलम (Cerebellum) असं नाव आहे. हा भाग आपल्या हालचाली नियंत्रीत करतो, तसेच तोल सावरण्यास महत्वाचा असतो. नर्व्हस सिस्टीम आणि मेंदूच्या विविध भागांकडून याला सूचना मिळत असतात, त्याप्रमाणे आपल्या शरिराचा तोल सांभाळणं आणि हालचालींचं को-ऑर्डीनेशन करणं हे प्रामुख्याने या भागाचं काम असतं.

त्या लहान बाळाच्या मेदूतील या सेरेबेलमची वाढ झालेली नाही. इनफॅक्ट हे सेरेबेलम त्याच्या मेंदूत अस्तित्वातच नाही!

इंटरनेटवर वैद्यकीय परिभाषेत बरीच माहीती आहे, पण ती डोक्यावरुन जाणारी आहे. साध्या सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा धागा -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही. सेरेबेलम म्हणजे लहान मेंदु .. त्याचे दोन अर्धगोल असतात . डावा व उजवा. हे दोन्ही भाग वर्मिस नावाच्या भागाने जोडलेले असतात.

या आजारात वर्मिस हा भाग विकसित झालेला नसतो.

या आजारावर केवळ सपोर्टिव्ह उपचार आहेत.

थोडं अधिक स्पष्ट करून सांगू शकाल काय?

गुगलवर ही माहिती मिळाली जी तुम्ही सांगितलेल्याशी जुळते आहे. अर्थात शास्त्रीय परिभाषेत असल्याने डोक्यावरुन गेली.

Dandy–Walker syndrome (DWS), is a congenital brain malformation involving the cerebellum and the fluid filled spaces around it. A key feature of this syndrome is the complete absence of the part of the brain located between the two cerebellar hemispheres (cerebellar vermis).[1] The Dandy–Walker complex is a genetically sporadic disorder that occurs one in every 30,000 live births.

The key features of this syndrome are an enlargement of the fourth ventricle; complete absence of the cerebellar vermis, the posterior midline area of cerebellar cortex responsible for coordination of the axial musculature; and cyst formation near the internal base of the skull. An increase in the size of the fluid spaces surrounding the brain as well as an increase in pressure may also be present. The syndrome can appear dramatically or develop unnoticed.

आईग! नुसते वाचूनही जीव गलबलला! बाळाच्या आईबाबांच्या मनःस्थितीची कल्पनाही करवत नाही. प्रेयर्स!