Submitted by क्रांति on 20 June, 2009 - 08:29
आयुष्याचा अर्थ नेमका
काय असावा? केवळ दडपण?
की नियतीच्या उंबरठ्यावर
छिन्न जिवाचे आत्मसमर्पण?
मी वाकावे, मीच झुकावे,
मलाच मी घालावे कुंपण
अन् माझे सर्वस्व लुटावे,
जपण्यासाठी तुझे थोरपण
किती जपू मी? किति सांभाळू?
तुझ्या मनाचे दुभंगलेपण
मनात काही, जनात काही,
कृत्रिम अन् फसवे मोठेपण
तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण?
गुलमोहर:
शेअर करा
आयुष्याचा
आयुष्याचा अर्थ नेमका
काय असावा? केवळ दडपण?
की नियतीच्या उंबरठ्यावर
छिन्न जिवाचे आत्मसमर्पण?
तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण?
क्रांती, पाणी आणलंस डोळ्यांत... पहिल्या चार ओळी तर अक्षरशः जगतो आहे..
विष्णु
वा !!! खुप
वा !!! खुप छान मांडलय
जबर्दस्त! ह
जबर्दस्त!
हरीश
-----------------------------
Have You Saved a Life Yet?
http://hridayjyot.synthasite.com/
------------------------------
फारच
फारच सुंदर. सहज आणि नेमकी शब्दरचना व त्याला अलवार लयीची जोड. छान.
कविता
कविता आवडली
तपे लोटली
तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण
.....हळवेपणाचा अतिरेक म्हणजे अश्रु .....
क्रान्ति.....
क्रान्ति.......जबरदस्त कविता !!
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
आज इथे
आज इथे प्रतीसाद देतोय...
खुपच छान आहे...
ग्रेट आहे..
तु आणी कविताही..
आवडली.
आवडली. अगतिकता चांगली मांडलीय.
माझ्या "का" ची आठवण झाली.-
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..
खास..
खास.. म्हणजे एकदम खास!
क्रांती
क्रांती खुप चांगली कविता.
खुप आवडली
खुप आवडली
हं ! अगदी
हं ! अगदी पटलं ! >>>तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण?<<< हे सगळ्यात जास्ती त्रासाचे !
शेवट्च्या
शेवट्च्या चार ओळी फारच आवड्ल्या
तुमची ही
तुमची ही कविता फार आवडली. शुभेच्छा!
तपे लोटली
तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण?
अर्थपुर्ण कविता....
ही परिस्थिती बदलावी असं खुप वाटतं....
*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************
सही कविता
सही कविता एकदम एवढ्या दिवसात नजरेस कशी आली नाही.....:(
तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण?
hats off just great creation...........!
तपे लोटली
तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण?
मस्त कविता
अतिरेकी
अतिरेकी हळवेपण!!
मस्त!!
....मानसी
तपे लोटली
तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण? >>> एकदम लाजवाब... ग्रेट क्रांती.
क्रांती
क्रांती खुप चांगली कविता!
कविता
कविता आवडली. खुप सुरेख जमलीय.
क्रान्ति,
क्रान्ति, फारच परिणामकारक. तुझे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. मला माझी 'गुलाम' आठवली.
..............................................................................
हलकी 'घ्या', जड 'घ्या'
दिव्याखाली 'घ्या', अंधारात 'घ्या'
'घ्या', 'घेऊ' नका
तुमचा प्रश्न आहे!
खुपच आवडली
खुपच आवडली .............
कविता
कविता मनापासून आवडली.
ब-याच दिवसानी कोणीतरी खूप खूप जुन्या ओळखीचं भेटलं असं वाटलं कविता वाचताना.
मस्त !
मस्त ! आंधळा अहंकार अन अतिरेकी हळवेपण खासच !
________________________________________
प्रकाश
क्रान्ती
क्रान्ती तुझी कविता छान आहे कारण जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही कारनाशिवाय शक्य नाही
कविता खुपच
कविता खुपच सुंदर !!
अनु.
छान , आवडली
छान , आवडली कविता.
धनु.
वा क्रांती
वा क्रांती ... ग्रेट .. खुप छान.