वाघोबा

Submitted by झकासराव on 29 July, 2009 - 07:52

हा आहे कात्रजच्या प्राणीसंग्रहालयातील वाघ.
एक पांढरा आणि एक पिवळा पट्टेरी.
जरी तो बंद कुंपणा आड असला तरी त्याचा रुबाब कमी नाहि होत.
काय म्हणता खालील फोटु बघुन. Happy
एखादा माणुस मंतर मारल्यासारखा गुंग होतो म्हणजे काय होतो ह्याचा अनुभव ह्या कुंपणा आडच्या वाघाने दिला बॉ.
आता ओढ आहे ती असाच वाघ जंगलात बघायची ह्याचीच.

पहिल्यांदा हा पाहिला पांढरा वाघ. एकदम रुबाबात बसला होता. त्याचे डोळे पाहिले का?? वेगळेच आहेत. गुढ.

DSC03232" alt="" />

आणि हा दुसरा तर त्याहुन देखील सुंदर. तिथे जमा असलेल सगळ पब्लिक अक्षरक्ष: मंत्रमुग्ध झाल होत ह्याला बघुन. तो ज्या बाजुला जाइल त्याबाजुला सगळे नुसते येड्यागत पळत होते.
येड लावेल असच देखण जनावर आहे हे. Happy

DSC03240" alt="" />

गुलमोहर: 

व्वा काय पण रुबाब आहे.
पहिला म्हणतोय जणु " पंगा नही लेने का".
आणि दुसर्‍याचा पंजा बघा , जणु म्हणतोय " कानाखाली देईन".

मला मुद्दलातला वाघच दिसत नाहीये तर त्यावर चढलेले रुबाबाचे व्याज कसे दिसणार. Happy

बाकी काय झकासराव. लै दिसांनी? Happy

झकास.. Happy

----------------------------------------------
ऐसीयांचा संग देई नारायणा | ओलावा वचनां जयाचिया ||

झक्कासच ! पहिला फोटो एकदम जबरी !!!! ______________________________________________
प्रकाश

झकासराव, फोटु मस्तच राव. लै भारी ! Happy

वॉव्...खुप च छान. तो धवल्या तर माझ्या वर च डोळे रोखुन बघतोय अस वाट्ल मला. Happy

काय झकासराव.. एकदम वाघोबाला घेउन अवतरलात !! Happy
सही फोटुज एकदम.. !!

वाघोबा एकदम छान !!
अनु.

अरे वा !! झकास , बर्‍याच दिवसांनी ?
फोटो सहीच! दोन्ही आवडले !! दोनच आहेत ना? मधे एक फुली दिसतीय..

www.bhagyashree.co.cc/

धन्यवाद दोस्तहो. Happy
भाग्यश्री दोनच फोटो आहेत.
केपी तुमच्याकडे फ्लिकर बन्द आहे का? त्यामुळे दिसत नसेल.
पिकासावर देखील आहेत फोटु. माज्या ख व मध्ये आहे लिन्क पिकासाची.

सही ! तो पांढरा तर झकासच Happy

पिंजरा रिकामा वाटतोय.. वाघोबा दिसत नाहीयेत. Uhoh (नुसत्या फुल्या दिसताहेत.)
आमच्याकडे पिकासावर सुद्धा बंदी आहे Sad
झक्कासराव, मला मेलमधून पाठवा फोटो.

.

मस्त आहेत रे दोन्ही वाघ ! पांढरा वाघ चिनी सारखा मिचमिच्या डोळ्यांचा दिसतोय.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

झकोबा, वाघोबा एकदम झकास! Happy
-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

झकास मला पण मला पण. इथे दोन्हीला बंदी.

परत एकदा धन्यवाद दोस्तहो.
किरु तुझा मेल आयडी दे. किंवा केपी तुला मेल करेल.
केपी तुला मेल केली आहे माझ्या हापिसच्या आयडीवरुन.

झक्या,
अखेर तुझे वाघ आले म्हणायचे इथे. Happy
मस्तच आलेत फोटो.
आणि मला जास्ती आनंद तुला इथे पाहून झालाय. वेलकम बॅक. Happy

झकासा, काय रुबाब आहे रे. झचकास!
इतक्या वेळा पाहिलाय कात्रजचा पांढरा वाघ, पण मी अजून फोटू नाही काढू शकलो.

बाकी, लई दिसांनी? Happy

ह्या वाघांचे फोटु काढुन बरेच दिवस झाले. बहुतेक एप्रिल मध्ये काढले होते.
नेट बंद होत म्हणुन येत नव्हतो.
दक्क्षिणाला मेल केले होते मायबोलीवर टाकायला पण तिला जमले नाहीत टाकायला.
परत एकदा सगळ्यांचे आभार.