शनिवज्रपंजरकवचं

Submitted by विक्रमादित्य पणशीकर on 1 December, 2014 - 12:19

शनिच्या साडेसातीचा जो काळ पूर्णतः प्रतिकूल आहे. त्याकाळात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शनि आजारपण लांबवणारा ग्रह आहे. त्यामुळे दीर्घकालीन आजार शनि निर्माण करतो. अशा वेळेस शनि उपासना करण्याचा नक्कीच लाभ होतो. ब्रह्माण्डपुराणातील ब्रह्मनारद संवाद स्वरूपात असलेले शनिवज्रपंजरकवच म्हणणे अत्यधिक लाभाचे ठरते असा अनुभव आहे.

श्रीगणेशाय नमः
नीलांबरो नीलवपुः किरीटी गृधस्थितस्त्रासकरो धनुष्मान्।
चतुर्भुजः सूर्यसुतः प्रसन्नः सदा मम स्याद्वरदः प्रशान्तः॥१॥
ब्रह्मा उवाच॥ श्रुणुध्वमृषयः सर्वे शनिपीडाहरं महत्।
कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमम् ॥२॥
कवचं देवतावास वज्रपंजरसंज्ञकम् ।
शनैश्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम् ॥३॥
ॐ शिरो शनैश्चरः पातु भालं मे सूर्यनंदनः ।
नेत्रे छायात्मजः पातु पातु कर्णौ यमानुजः ॥४॥
नासां वैवस्वतः पातु मुखं मे भास्करः सदा ।
स्निग्धकंठश्च मे कंठं भुजौ पातु महाभुजः ॥५॥
स्कंधौ पातु शनिश्चैव करौ पातु शुभप्रदः ।
वक्षः पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितस्तथा ॥६॥
नाभिं ग्रहपतिः पातु मंदः पातु कटिं तथा ।
ऊरू ममांतकः पातु यमो जानुयुगं तथा॥७॥
पादौ मंदगतिः पातु सर्वांगं पातु पिप्पलः।
अङ्गोपाङ्गानि सर्वाणि रक्षेन् मे सूर्यनंदनः ॥८॥
इत्येतत्कवचं दिव्यं पठेत्सूर्यसुतस्य़ यः।
न तस्य जायते पीडा प्रीतो भवति सूर्यजः॥९॥
व्ययजन्मव्दितियस्थो मृत्युस्थानगतोऽपि वा ।
कलत्रस्थो गतो वापि सुप्रीतस्तु सदा शनिः ॥१०॥
अष्टमस्थे सूर्यसुते व्यये जन्मव्दितीयगे ।
कवचं पठते नित्यं न पीडा जायते क्वचित ॥११॥
इत्येतत्कवचं दिव्यं सौरेर्यन्निर्मितं पुरा ।
व्दादशाष्टमजन्मस्थदोषान्नाशयते सदा ।
जन्मलग्नस्थितान् दोषान् सर्वान्नाशयते प्रभुः ॥१२॥
॥ इति श्रीब्रह्माण्डपुराणे ब्रह्मनारदसंवादे शनिवज्रपंजरकवचं संपूर्णम् ॥

या कवचाचे नित्य पठण केल्यास आपल्या भोवती शनिकृपेचे अभेद्य कवच निर्माण होऊन आत्मबल प्राप्त होते. या कवचा मध्ये आपल्या शरीराच्या विविध अवयवांचे शनिने रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे. उदा. सदासर्वदा शुभफल प्रदान करणा-या शनिने आपल्या हाताचे रक्षण करावे अशी प्रार्थना " करौ पातु शुभप्रदः" या प्रकारे केली आहे याचा अर्थ शनिचे शुभप्रद हे वैशिष्टय आहे. ब्रह्मदेवाने शनिच्या या वैशिष्टयातून मानवास आपल्या हातानी सदैव शुभकर्म करावे असाच संदेश दिला असणार ज्यामुळे शनिची कृपादृष्टी सहजपणे प्राप्त होणे शक्य होईल.
ज्यांना संस्कृत स्तोत्र म्हणणे शक्य नसेल त्यांनी शनिची हि दिव्य नामावली वाचणे भाग्यवर्धक व मनोबल वाढवणारे ठरेल. विषेश म्हणजे यात शनिच्या अनाकलनीय सामर्थ्याचे वर्णन करणारी १९ नावे आहेत , आणि जसे लोक साडेसातीला अकारण घाबरतात तसेच शनिची महादशा सुरु झाली कि मनात अस्थिरता घर करते असे अनेकांचे म्हणणे आहे , योगायोग असा शनिची महादशा १९ वर्षाची आहे व या नामावलितहि शनिची १९ नावे आहेत. सूर्यनंदन हे नाव दोनदा आले असले तरे त्यात सूर्यनंदन नावाने कपाळाची व अखेरीस जे नाव आले आहे त्याने शरिराच्या सर्वांगीण रक्षणाची प्रार्थना केली आहे. हे नाव घेण्यामागे हेतु निराळे आहेत.

१) ॐ श्रीशनैश्चराय नम: । शिरोरोग निवारणासाठी हा जप करावा.
२) ॐ सूर्यनंदनाय नम: । कपाळाचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
३) ॐ छायात्मजाय नम:। डोळ्यांचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
४) ॐ यमानुजाय नम: । कानाचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
५) ॐ वैवस्वताय नम:। नाकाचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
६) ॐ भास्कराय नम:। मुखाचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
७) ॐ स्निग्धकंठाय नम:। कंठाचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
८) ॐ महाभुजाय नम: । भुजांचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
९) ॐ शनये नम:। खांद्यांचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
१०) ॐ शुभप्रदाय नम: । हाताचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
११) ॐ यमभ्रात्रे नम:। स्तनांचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
१२) ॐ असिताय नम:। पोटाचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
१३) ॐ ग्रहपतये नम:। बेंबीचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
१४) ॐ मंदाय नम:। कंबरेचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
१५) ॐ अंतकाय नम:। छातीचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
१६) ॐ यमाय नम:। दोन्ही गुढग्यांचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
१७) ॐ मंदगतये नम: । पायाचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
१८) ॐ पिप्पलाय नम:। संर्वांगाचे रोग निवारणासाठी हा जप करावा.
१९) ॐ सूर्यनंदनाय नम:। संर्वांगाचे रक्षणकरणासाठी हा जप करावा.

आपल्याला त्रस्त करणा-या रोगास दूर करण्यासाठी रोगाप्रमाणे आपण मंत्राची निवड करून भक्तवत्सल शानिकृपेचा आस्वाद निरोगी आयुष्य उपभोगून घेऊ शकता. या स्तोत्राचा किंवा नामावलीचा अवश्य पाठ करावा , यामुळे केवळ आरोग्यच प्राप्त होईल असे नाही तर संचित पापकर्माच्या कुप्रभावाने निर्माण झालेली समस्यांची श्रृंखला खंडित करणे व सत्कर्माचे बीज मनात रूजण्यास मनोभूमी तयार होईल असा आम्हास विश्वास वाटतो. आपणही याचा अनुभव घ्यावा. ज्यांना या स्तोत्राची mp 3 फाईल विनामूल्य हवी असेल त्यांनी panshikar 999 @gmail.com वर मेल करावा. ३ दिवसात पाठवली जाईल.
panshikar999@gmail.com
संपर्क - 9049600622

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्रमादित्य पणशीकर ,

हे अदभुत कवचम श्लोक मंत्र ह्या धाग्यावर मी टाकलेले आहे,

तुम्ही हा नविन धागा काढुन ह्या कवचांची महतता पटवुन द्यायचा प्रयास केला त्या बद्दल धन्यवाद !!

शनिच्या साडेसातीचा जो काळ पूर्णतः प्रतिकूल आहे. त्याकाळात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शनि आजारपण लांबवणारा ग्रह आहे. त्यामुळे दीर्घकालीन आजार शनि निर्माण करतो. >> हे मी अनुभवत आहे. ७ महिन्यांनपासून गुडगे त्रास देत आहेत. डॉक्टर सुद्धा निदान करु शकत नाहीये.

मी मत्रं म्हणून बघेन.

शनिच्या साडेसातीचा जो काळ पूर्णतः प्रतिकूल आहे. त्याकाळात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. शनि आजारपण लांबवणारा ग्रह आहे. त्यामुळे दीर्घकालीन आजार शनि निर्माण करतो. >> भयानक अनुभव आहेत घरात! गेल्या साडेसातीत आईचा (रास : मीन) हात फॅक्चर झाला होता.. रॉड टाकावा लागला!
सासर्‍यांना (रास : तूळ) साडेसातीत मोठा अपघात झाला. अडीच वर्षे हॉस्पीटल-घर असे करत काढले. खूप हाल झाले. शेवटचे दीड महीना हॉस्पीटलमध्येच काढावे लागले. साडेसाती सुरू असतानाच निर्वर्तले.
नवर्‍याला (रास : वृश्चिक) सुरू आहे साडेसाती. नुकताच डायबेटीस डिटेक्ट झालाय.

योगायोग असेल किंवा... पण अनुभवावरून वाटतेय पहील्यापासून आरोग्याची नीट काळजी घ्यावी म्हणजे साडेसातीच्या विशिष्ट कालावधीत तुलनात्मक कमी त्रास होतो.

श्लोक मंत्रांसाठी धन्यवाद. अधूनमधून शनीमहात्म्य वाचते. मनःशांतीसाठी पठण करायला सोपे आहेत.