(ज्येष्ठ गझलकारा संगीता जोशी यांची 'हे असे आभासवाणे चांदणे आता नको' ही ओळ व्हॉट्सअॅप वर एका गप्पांमध्ये मिळाली. त्यावर गझल लिहिण्याचा हा प्रयत्न.)
लाघवी बोलून हे नाकारणे आता नको
हे असे आभासवाणे चांदणे आता नको
एकट्याच्या सोबतीला ज्याक्षणी आलीस तू -
अन् मला वाटून गेले, थांबणे आता नको!
बहर ओसरताच आले भान वार्याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको
त्या निरोपाच्या क्षणी ती बोलली नजरेतुनी -
एकही कुठलेच हळवे मागणे आता नको
मी मनाच्या जवळ आता जात नाही फारसा
खोल या डोहामध्ये डोकावणे आता नको
तूच बोलावेस आता, 'हो' म्हणावे मी तुला
पण अबोल्याच्या दिशेने खेचणे आता नको
यापुढे भेटायला तू नेहमी दिवसाच ये!
सावली लपवून कोठे भेटणे आता नको!
धूळ साचू दे जराशी आरशावरती तुझ्या
रोज डोळ्यांना तुझ्या तू फसवणे - आता नको!
वाट संपायास येता फार वाटू लागले -
ऐकणे आता नको अन् बोलणे आता नको
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2014/10/blog-post_17.html)
सहीच रे
सहीच रे
झकास
झकास
बहर ओसरताच आले भान वार्याला
बहर ओसरताच आले भान
वार्याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको<<व्वा !
छान गझल.
सुंदर!
सुंदर!
अनेक शेर खूप आवडले हा
अनेक शेर खूप आवडले
हा सर्वाधिक आवडला.....
बहर ओसरताच आले भान वार्याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको
खूप सुंदर
लै भारी. -दिलीप बिरुटे
लै भारी.
-दिलीप बिरुटे
यापुढे भेटायला तू नेहमी
यापुढे भेटायला तू नेहमी दिवसाच ये!
सावली लपवून कोठे भेटणे आता नको!
वाट संपायास येता फार वाटू लागले -
ऐकणे आता नको अन् बोलणे आता नको<<< व्वा वा
धन्यवाद!
धन्यवाद!
सुर्रेखच .....
सुर्रेखच .....
उगाच र ला ट जोडलय नुसते शब्दच
उगाच र ला ट जोडलय
नुसते शब्दच शब्द एकही ओळीला धड अर्थ नाही
असो , खोर्याने गझलकार आलेत हल्ली
गझल आवडली.
गझल आवडली.
मस्त ... आवडली !!
मस्त ... आवडली !!
मस्तच नचिकेत!!!
मस्तच नचिकेत!!!
मस्त
मस्त
बहर ओसरताच आले भान वार्याला
बहर ओसरताच आले भान वार्याला पुन्हा -
ह्या सुगंधाभोवती रेंगाळणे आता नको
यापुढे भेटायला तू नेहमी दिवसाच ये!
सावली लपवून कोठे भेटणे आता नको! >>>>>> व्वा! अप्रतिम!
मी मनाच्या जवळ आता जात नाही
मी मनाच्या जवळ आता जात नाही फारसा
खोल या डोहामध्ये डोकावणे आता नको>>>
मस्तच रे. कसलं सॉलीड लिहीता राव तुम्ही लोक _/\_
धन्यवाद सर्वांना विशाल
धन्यवाद सर्वांना
विशाल
मस्त
मस्त
<<धूळ साचू दे जराशी आरशावरती
<<धूळ साचू दे जराशी आरशावरती तुझ्या
रोज डोळ्यांना तुझ्या तू फसवणे - आता नको!<<
अहाहा... सुंदरच!
मी मनाच्या जवळ आता जात नाही
मी मनाच्या जवळ आता जात नाही फारसा
खोल या डोहामध्ये डोकावणे आता नको
हे विशेष आवडले
त्या निरोपाच्या क्षणी ती
त्या निरोपाच्या क्षणी ती बोलली नजरेतुनी -
एकही कुठलेच हळवे मागणे आता नको----
मस्त ... आवडली !!
वा वा …
वा वा …