बद्धकोष्ठ / मलावरोध

Submitted by उडन खटोला on 20 November, 2014 - 13:54

नमस्कार
एक शंका आहे . माझ्या एका मित्राचे वय सध्या ३७ आहे . त्याला वयाच्या १२/१३ व्या वर्षापासून बद्धकोष्ठ / मलावरोधाचा त्रास आहे . वयाच्या १८ व्या वर्षी sigmoidoscopy / colonoscopy / barium enema इत्यादी सर्व टेस्ट करून झाल्या , त्यात सुरुवातीला मोठ्या आतड्याला stricture असल्याचे निदान झाले व operation करण्याचा सल्ला मिळाला ,पण प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यापूर्वी पुन्हा एकदा colonoscopy केल्यानंतर stricture नसल्याचे डॉक्टरचे मत पडले . नंतर काही पोट साफ करण्याची औषधे देऊन बोळवण करण्यात आलि. परंतु मित्राचा प्रश्न तसाच राहिला राहिला . नंतर निसर्गोपचार /आयुर्वेदिक /पंचकर्म इत्यादी अनेक उपचार करून झाले ग़ेल्या २० वर्षात सुमारे ५ लाखावर खर्च करून झाला ,पण म्हणावा तसा गुण नाही .

सध्या त्याला depression / anxiety तसेच अन्य psycho -somatic समस्या जाणवतात .सतत चिडचिड ,कामात लक्ष न लागणे ,मानसिक तणाव ,भीती ,अपुरी व सतत disturbed झोप अशी लक्षने आहेत . या सर्व गोष्टीमागे कुठेतरी बद्धकोष्ठ / मलावरोध व बिघडलेले metabolism हेच मूळ कारण असू शकते का? असल्यास या समस्येचे निराकरण नक्की कोणत्या प्रकारे शक्य आहे ?कृपया मार्गदर्शन करावे

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.सतत चिडचिड ,कामात लक्ष न लागणे ,मानसिक तणाव ,भीती ,अपुरी व सतत disturbed झोप अशी लक्षने आहेत . या सर्व गोष्टीमागे कुठेतरी बद्धकोष्ठ / मलावरोध व बिघडलेले metabolism हेच मूळ कारण असू शकते का? असल्यास या समस्येचे निराकरण नक्की कोणत्या प्रकारे शक्य आहे ?कृपया मार्गदर्शन करावे>>>>> पोट हे सर्व कारणान्चे मूळ असते. पोट साफ नसेल तर वरील सर्व मागे लागते.

जागरणे, जन्क फुड, कामाचा तणाव याने हे बिघडते. त्याना खाण्यात अन्जिर, केळ, ताजे ताक ( सुट्टीच्या दिवशी तरी घेणे), रात्री कोमट दुधात साजुक तुप घालुन ते घ्यायला सान्गा. मलावरोध कमी होतो. जागरणाने जी उष्णता वाढते, ती कमी होईल.

मुळात फायबर भरपूर असलेले अन्न खाणे गरजेचे आहे.
काकडी, गाजर, मुळा, बीट
पालेभाज्या देठांसकट नुसत्या थोड्याश्या तेलाच्या फोडणीवर, मसाले न घालता.
मोसंबी, संत्री, अशी फळे (पण बी नि आतील सालासकट, भरपूर प्रमाणात)
टरबूज, खरबूज, इ.

उडण खटोला, इथल्या चिनी संस्कृतीत एक म्हण आहे 'एका अस्वस्थ हृदयात एक भले मोठे अस्वस्थ जग वसलेले असते'. शरीर आणि मन हे दोन्ही स्वस्थ असले तरच माणूस स्वस्थ असतो.

तुम्ही तुमच्या मित्रांस ज्येष्ठमध ध्या. त्यानी मल मऊ होऊन तो बाहेर पडायला मदत होतो. दिवसातून तीन वेळा एक एक काडी चोथा होईपर्यंत चघळायला सांगा. पिकलेली मऊ पपयी खाल्ली तर पोट साफ व्हायला आणखी मदत होते.

मन प्रसन्न होण्यासाठी योगामधील कपालभाती आणि प्राणायम अशक्य सुंदर उपाय आहे.

आणि हे टाळा: दुधाचे सगळे पदार्थ टाळायला सांगा. रात्री दुध घ्यायची ज्यांना सवय असते त्या<ना हा त्ग्राअस हमखास होतो. तसेच रात्री भात खायला सांगू नका. केळी बहाटेच्या वेळी खायला सांगा. नंतर कुठलीएच वेळ केळीसाठी बरी नसते.

सध्या आवळ्याचा सिझन चालु आहे. रोज दोन आवळे खाण्यास सांगावे. सोबत बेलफळाचा कल्प घेतला तर आणखी फरक पडेल.

अश्या दिर्घकालीन आजारांवर योग अभ्यासाला पर्याय नाही. सामान्य आसने, कपालभाती आणि काही बंध ( तज्ञांच्या सल्याने / नियमीत मार्गदर्शनाने ) केल्यास परीणाम नक्की साधेल.

आवळ्याचा फायदा लगेच होत नाही. त्याला वेळ लागतो. पण ज्येष्ठमध त्वरीत बरे करतो. आवळा हा पुन्हा अनाशा पोटी पहाटे खाल्ला तरच फायदेकारक ठरवो. कधीही खाता येत नाही. जेवल्यानंतर आवळा खल्ला तर उलट ब. को. वाढते.

अश्या दिर्घकालीन आजारांवर योग अभ्यासाला पर्याय नाही. सामान्य आसने, कपालभाती आणि काही बंध ( तज्ञांच्या सल्याने / नियमीत मार्गदर्शनाने ) केल्यास परीणाम नक्की साधेल.>> १००० +++

जेवल्यानंतर आवळा खल्ला तर उलट ब. को. वाढते. माझा असा अनुभव नाही. काही कारण नसावे. जेवणानंतर आवळा खाल्ला तर तोंडात लाळ जास्त निर्माण होते जी अ‍ॅसीडीटी कमी करायला व पचन उत्तम व्हायला कारणीभुत होते असे माझे मत आहे.

आवळा हा पुन्हा अनाशा पोटी पहाटे खाल्ला ( तरच) ऐवजी ( जास्त )फायदेकारक ठरतो. + १००००

जेवणात चपा ती/ भाकरी घ्यावी
ज्याने करुन फायबर ही मिळते अन सकाळी ओके

रात्री नीट जेवुन १, १.५ तासात झोपणे आवश्यक आहे

याच्यावर 100% उपाय तुम्ही अॅब्स चे 12,चे 3 सेट दररोज मारा 15 दिवसांनंतर 15 सेकंदात प्रातःविधी उरकतो त्या बरोबर जोर चे25 चे 5 सेट 15 दिवसाच्या आत फरक पडणार......फक्त एकदा करून बघा

याच्यावर 100% उपाय तुम्ही अॅब्स चे 12,चे 3 सेट दररोज मारा 15 दिवसांनंतर 15 सेकंदात प्रातःविधी उरकतो त्या बरोबर जोर चे25 चे 5 सेट 15 दिवसाच्या आत फरक पडणार......फक्त एकदा करून बघा
>>>अॅब्स चे सेट मारणे बंद केल्या वर पोट सुटते असे अनेक जणानी सांगितले आहे ते खरे आहे का ???

१) सकाळी उठून दात घासल्यावर कमीत कमी १ ग्लास कोमट पाणी पिणे. नंतर अर्ध्या तासाने चहा, नाश्ता वगैरे घ्यावे.

२) रोज जेवणात किंवा अन्य प्रकारे पालेभाज्या खाणे.

मौलिक माहिति !----------

............................................................................................................

नविन लेखन कसे करावे, त्यात फोटो कसे टाकावे याचे मार्गदर्शन करावे, मी माय बोलि वर नवीन आहे

मुळात फायबर भरपूर असलेले अन्न खाणे गरजेचे आहे.>>>+११११
गुगलून बघा. High Fibre diet काय आहे ते . सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी उपाशी पोटी २ अंजीर आणि लिंबू - मध घातलेलं कोमात पाणी पिणे . ब . को साठीची योगासने करण्याने हि खूप फायदा होतो .
पोटावर दाब पडेल आणि पोटाच्या स्नायूंची शक्ती वाढेल असं व्यायाम आणि योगासने करणे

हिमालयाच्या herbolax म्हणून गोळ्या मिळतात . ब . को . थोडं असेल तर १ गोळी जेवण्या अगोदर १ तास . chronic constipation असेल तर २ गोळ्या

.....ताजे ताक ( सुट्टीच्या दिवशी तरी घेणे), रात्री कोमट दुधात साजुक तुप घालुन ते घ्यायला सान्गा. मलावरोध कमी होतो......

.......दुधाचे सगळे पदार्थ टाळायला सांगा. रात्री दुध घ्यायची ज्यांना सवय असते त्या<ना हा त्ग्राअस हमखास होतो. तसेच रात्री भात खायला सांगू नका......
>>>>>
दोन डॉक्टर नसलेल्या व्यक्तींचे परस्पर विरोधी सल्ले....

पेशन्ट वेडाच होइल आणि वाचणारे सुद्धा !

....सध्या आवळ्याचा सिझन चालु आहे. रोज दोन आवळे खाण्यास सांगावे....

... जेवल्यानंतर आवळा खल्ला तर उलट ब. को. वाढते

>>>>

आणखी दोन मुक्ताफळे ! चालू द्या चालू द्या !

याच्यावर 100% उपाय तुम्ही अॅब्स चे 12,चे 3 सेट दररोज मारा ...

...अॅब्स चे सेट मारणे बंद केल्या वर पोट सुटते असे अनेक जणानी सांगितले आहे

>>>

आता खरेच आवरा !!!

फायबर भरपूर असलेले अन्न >>>
सफरचंद, मुळा , गाजर , पपई , द्राक्षे , हिरव्या पालेभाज्या , लिंबू , ओट्स , ब्रोकोली , अख्खी धान्य .
फायबर भरपूर असलेले अन्न पाणी धरून ठेवते . म्हणजे मोठे आतडे ते पाणी शोषून घेवू शकत नाही . त्यामुळे २ नंबर ला मऊ आणि वेळेवर होते
मैदा (ब्रेड , पिझ्झा , केक ) , आंबवलेले पदार्थ (इडली , डोसा वगेरे ) बंद .