'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे' ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 20 November, 2014 - 01:27

**************************************
किती वाकुडे बोल बोलून झाले
स्वत:च्याच सत्वास गाळून झाले

धरा सांगताहे कथा पावसाची
किती थेंब पदरात झेलून झाले

जरी भोवती 'माणसे' फार झाली
तरी एकट्यानेच 'खेळून' झाले

नको रोकडा, दागिनेही नकोसे
बियाण्यासवे सत्व तोलून झाले

जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले

कसा रे मुरारी तुझा हा अबोला?
सुरांवर तुझ्या आज भाळून झाले

'बळीच्या घरी सौख्य नांदो सदाचे'
पुन्हा आरशालाच टाळून झाले

किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?

**************************************

विशाल

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

धरा सांगताहे कथा पावसाची
किती थेंब पदरात झेलून झाले ?

जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले

<<< वाह हे दोन खूप आवडले
धरेच्या शेरात प्रश्नचिन्ह अनावश्यक वाटले (वै.म.)

जरी भोवती 'माणसे' फार झाली
तरी एकट्यानेच 'खेळून' झाले >>> वाह!

जमावा कसा नाच मोरा प्रमाणे ?
चकोरापरी प्राण उधळून झाले >>> वाहवा!

किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ? >>> वाहवा!, वाहवा!

किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रगो' रे किती डाव खेळून झाले ?

>>> हा शेर अत्यंत आवडला ... गझल माझ्या नावाने खपवत आहे Proud

वाह.......!

क्या बात है यार मस्तच.

किती राहिले श्वास देहात बाकी ?
'प्रभो' रे किती डाव खेळून झाले ?

सुप्पर्ब...!

-दिलीप बिरुटे

विशाल कुलकर्णी,

गझल चांगली जमलीये. झाले च्या आधी फार हा शब्द ठेवून वाचली. तरीही बराच सुसंगत अर्थ लागतोय. हे अनायसे की जाणीवपूर्वक?

आ.न.,
-गा.पै.

काय रे बाळ बिरुटे,

तुला कधीपासून शेर समजायला लागले? की वरचे प्रतिसाद वाचून ठोकतोयस मते स्वतःची?

सॉरी बेफिकीर! गझलेच्या जागी कविता म्हणायचं होतं! पण शेवटच्या तीन कडव्यांचा अर्थ फसतोय.
आ.न.,
-गा.पै.

बाळा बेफिकीर, गझल तुझी नै ये ना, मग फुकट कशाला कुंथत आहेस. गझलेचा लेखक माझ्या प्रतिसादाबद्दल काय बोलायाचेते बोलेल तू कशाला ओझं उचलतोय माझ्या प्रतिसादाचं नै का ? काय हिशेब चुकते करायचे ते आपापल्या धाग्यावर... दुस-याच्या वरातीत किती दिवस नाचणारेस तू ...!

-दिलीप बिरुटे

-