ववि २००८: माहिती

Submitted by ववि_संयोजक on 30 June, 2008 - 06:10

नमस्कार मंडळी!
एक वर्ष कसं निघुन गेलं कळलच नाही आणि पुन्हा एकदा आपल्या प्रिय वर्षाविहाराची वेळ जवळ येऊ लागली . यंदा वर्षाविहाराचे सहावे वर्ष. गेली पाच वर्षे मायबोलीकर ज्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले तसेच यावर्षीदेखील होतील याची आम्हा संयोजकांना खात्री आहे... :). गेल्या वर्षभरात मायबोलीवर नविन आलेल्या मायबोलीकरांनाही या वविचे खास आमंत्रण आहे. त्यांनी यानिमित्ताने त्यांनाही मायबोलीपरिवारातील काही सदस्यांना प्रत्यक्षात भेटता येईल. नविन मित्र जोडता येतील.

    यंदाच्या ववि संबंधी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :

      तारीख: २७ जुलै, २००८ (रविवार)

      वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५

      स्थळ: Aayurlife International (डॉ. हेगडेज् हॉलिडे व्हिलेज, कर्जत)

        या वर्षाविहारात registered मायबोलीकर व त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी व मुले) यांनाच भाग घेता येईल.

          आपण varshaa_vihaar@yahoo.com या ई-मेल आयडीवर मेल करुन आपले नाव नोंदवायचे आहे.

            नोंदणी करताना खालील माहिती आवश्यक आहे.

            १. नाव
            २. मायबोलीचा User ID
            ३. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक (भ्रमणध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम)
            ४. कुठल्या शहरातुन येणार (मुंबई,पुणे ई.)
            ५. आपला नेहमी वापरात असलेला Email ID
            ६. सहभागी होणार्‍या एकुण व्यक्तिंची संख्या (प्रौढ/ मुले).
            ७. लहान मुले (३ ते १२ वयोगट) असल्यास त्यांचे वय
            ८. मायबोली गृपबरोबर बसने येणार की स्वतंत्र येणार?
            ९. पैसे कसे भरणार? प्रत्यक्ष की ऑनलाईन?

              नावनोंदणीची अंतीम तारीख १७ जुलै आहे.

                डॉ. हेगडेज् रिसॉर्टचे प्रवेश शुल्क प्रत्येकी २६०.०० रुपये आहे. ३ ते १२ वयोगटातील मुलांसाठी वर्गणी शुल्कात ५०% सूट (१३०.०० रुपये शुल्क) आहे.

                  एकुण इच्छुक सभासदसंख्येनुसार बसभाडे ठरविण्यास मदत होते. याकरता लवकरात लवकर नावनोंदणी केल्यास उत्तम!

                    पुणेकरांसाठी बसप्रवासाचा अंदाजे खर्च प्रत्येकी २०० रुपये.
                    मुंबईकरांसाठी बसप्रवासाचा अंदाजे खर्च प्रत्येकी २०० रुपये.
                    तीन वर्षावरील सर्व व्यक्तीना हे बसभाडे लागू होईल.

                      इतर माहिती जाणुन घेण्याकरता आपण इथे मेसेज टाकु शकता अथवा varshaa_vihaar@yahoo.com या ई-मेल आयडीवर संपर्क करु शकता.

                        वर्षाविहार २००८ चे संयोजक मंडळ:

                          पुण्यातील संयोजक:
                          मयूरेश Kmayuresh2002(०९९२२४०१७७८)
                          हिमांशु himscool (०९८२२०१८७९५)
                          अतुल Atlya
                          बिपिन Yashwardhan

                            मुंबईतील संयोजक:

                              दत्तराज Indradhanushya(०९८३३९५३८८७)
                              आनंद Anandsuju(०९८२०००९८२२)
                              संदीप Gharuanna
                              निलेश Neel_ved

                                सांस्कृतिक समिती:

                                श्रद्धा Shraddhak
                                नंदिनी nandini2911
                                मीनाक्षी meenu

                                  मंडळी, पैसे जमा करण्यासाठी माहिती देत आहोत.

                                    पुणेकर मायबोलीकरांसाठी:

                                      तारीख: १९ जुलै (शनिवार) आणि २० जुलै,२००८ (रविवार)

                                        स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा.

                                          वेळ: सं. ५.३० ते ८.००

                                            वर्गणी:

                                              प्रौढांकरता रु. ५०० (डॉ. हेगडेज् रिसॉर्ट रु. २६० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ४०)

                                                मुलांकरता (३ ते १० वयोगटातील) रु. ३७० (डॉ. हेगडेज् रिसॉर्ट रु. १३० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ४०)

                                                  मुंबईकर मायबोलीकरांसाठी:

                                                    तारीख: २० जुलै,२००८ (रविवार)

                                                      स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात

                                                        वेळ: सं. ५.३० ते ८.००

                                                          वर्गणी:

                                                            प्रौढांकरता: रु. ५०० प्रत्येकी (डॉ. हेगडेज् रिसॉर्ट रु. २६० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ४०)

                                                              मुलांकरता (३ ते १२ वयोगटातील) रु. ३७० प्रत्येकी (डॉ. हेगडेज् रिसॉर्ट रु. १३० + बस भाडे रु. २०० + इतर खर्च रु. ४०)

                                                                इतर खर्चामधे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणार्‍या खर्चाचा अंतर्भाव आहे.

                                                                  मह्त्वाचे: आपण नाव नोंदवले असल्यास, परंतु २० जुलै पर्यंत पैसे जमा न केल्यास नावनोंदणी रद्दबातल ठरविण्यात येईल.

                                                                    समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं तर बसचे भाडे २०० rs वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.

                                                                      स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.

                                                                        ऑनलाईन पैसे भरणार्‍यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याचे सर्व डीटेल्स ईमेलने कळविले जातील.

                                                                          मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणाला वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

                                                                            इथे रेसॉर्टचा पत्ता आणि नकाशा देत आहोत.

                                                                              ayurlife.jpg

                                                                                map1.jpg

                                                                                  रेसॉर्टचे दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी नं. अनुक्रमे पुढीलप्रमाणे: ९५२१४८-२२१६९०/ ९८२४००७६९

                                                                                    आपल्याला काही शंका असल्यास विनासंकोच संपर्क साधा.

                                                                                    धन्यवाद!

                                                                                    वविसंयोजक

                                                                                    विषय: 
                                                                                    Group content visibility: 
                                                                                    Public - accessible to all site users

                                                                                    आपल्याला काही शंका असल्यास विनासंकोच संपर्क साधा. <<<<<<<
                                                                                     
                                                                                    डॉ. हेगडेज् हॉलिडे व्हिलेज, कर्जत
                                                                                    <<<<<<
                                                                                    सगळ्या डॉक्टरांनी कर्जतला रिसॉर्टस काढली आहेत की काय? मोदी झाले, आता हे हेगडे.... Proud यांच्याही नावाच्या तिथे 'चौफेर' पाट्या असल्या तर डॉ. मोदी'ज ला आलेल्यांना पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळेल बहुधा. Happy
                                                                                    हे कसले डॉक्टर आहेत? पोलिओ डोस शिबीर किंवा/आणि मोफत नेत्रतपासणी हा सां का मध्ये अंतर्भूत करावा काय?:-)
                                                                                     
                                                                                    डोळे तुझे जुल्मी गडे.
                                                                                    म्हटले तिला डॉ. हेगडे.
                                                                                    अशी कविताही सुचतेय. Happy
                                                                                    ~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                                                    Order is for idiots. Genius can handle chaos.

                                                                                    पोलिओ डोस शिबीर किंवा/आणि मोफत नेत्रतपासणी हा सां का मध्ये अंतर्भूत करावा काय
                                                                                    'सांस्कृतिक (महिला) मंडळ' पहाता काहीतरी अ. अ. कार्यक्रम असणार असा अंदाज आहेच. Happy

                                                                                    छे छे.... गेल्या वर्षीची वविची घोषणा कशी मस्त रंगीबेरंगी होती. त्यावर म्हशींची, पक्ष्यांची छान छान चित्रं पण होती.... ह्यावर्षी ही अशी फक्त काळी पांढरी घोषणा का बरं?? Happy

                                                                                    म्हशींची, पक्ष्यांची छान छान चित्रं पण होती.... ह्यावर्षी ही अशी फक्त काळी पांढरी घोषणा का बरं?? ..>>>म्हशीने मनेका गांधींकडे तक्रार केली की मागील वर्षी वविला माझ्या पाठीवर बसुन काही मायबोलीकरांनी माझ्या पाठीची वाट लावली आणि शारिरीक छळ केलाय म्हणुन... त्यामुळे मनेका गांधीनी फतवा काढला की या वविला प्राणीमात्रांना कुठलाही त्रास होता कामा नये .. त्यांचे फोटोसुध्दा छापायचे नाहीतः):)

                                                                                    आणि त्यामुळेच यावर्षी काही मायबोलिकरणींचे फोटोही छापता येणार नाहीत Sad

                                                                                    डॉ. हेगड्यांच्या रीसॉर्टवर म्हशी नाहीयेत तर......... मग कुठले 'प्राणीजन' आहेत? यंदाच्या वविचं प्रमुख आकर्षण काय???? Wink
                                                                                    ~~~~~~~~~
                                                                                    संयोजक, registration mail पाठवलाय, कृपया पोचपावती द्यावी.

                                                                                    वाचल्या त्या म्हशी...>>>> म्हशी कश्या वाचाव्यात? Happy

                                                                                    _________________________
                                                                                    -Man has no greater enemy than himself

                                                                                    म्हशी कश्या वाचाव्यात? >>>>>>> ते फक्त रेड्यांनाच जमतं. हो की नाही रे भ्रमरा ????? Lol

                                                                                      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                                                      Dream is not what you see in sleep
                                                                                      But it is the thing which does not let you sleep

                                                                                      इतर खर्च रु. ४० >>>>>>> यात वविहून परतताना कर्जतच्या वड्यांचं जमेल ना ?????????? Happy

                                                                                        ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                                                        Dream is not what you see in sleep
                                                                                        But it is the thing which does not let you sleep

                                                                                        इतर खर्च रु. ४० >>>>>>> यात वविहून परतताना कर्जतच्या वड्यांचं जमेल ना ?????????? Happy

                                                                                          ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                                                          Dream is not what you see in sleep
                                                                                          But it is the thing which does not let you sleep

                                                                                          आहो संयोजक माझा एक प्रॉब्लेम आहे हो !
                                                                                          मला पुणे आणि मुंबई दोन्हीकडुन उलटा प्रवास करावा लागेल मी रहातो तिथुन कर्जतच मला जवळ पडेल (बहुतेक) तिथे थेट येता येणार नाही का हो ?
                                                                                          .................................................................................................................................
                                                                                          ** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

                                                                                          waw सही... मजा करा मस्त..
                                                                                          सांस्कृतिक कार्यक्रमांमधे हॉरर नाटक, रोमँटिक नाटकं आणि टोमणे झीलायची स्पर्धा असे कार्यक्रम असणारेत का???????????????? Happy

                                                                                          संयोजक, बसने न येणार्‍यांसाठी Detailed Address द्या ना ईथेच.

                                                                                          मला पुणे आणि मुंबई दोन्हीकडुन उलटा प्रवास करावा लागेल मी रहातो तिथुन कर्जतच मला जवळ पडेल (बहुतेक) तिथे थेट येता येणार नाही का हो ?... >>> चाफ्फा,काहीच हरकत नाही... स्वतंत्र येण्याचा ऑप्शन पण आहे की... तुम्ही रजिस्ट्रेशनची मेल करा.. त्यात वर सांगितलेले सर्व डिटेल्स लिहा...
                                                                                          आणि त्यात स्वतंत्र येणार असं नमूद करा... तुम्हाला बसचे २०० भरावे लागणार नाहीत...
                                                                                          फक्त वविचे पैसे कसे भरणार ते पहा.. कारण प्रत्यक्ष पैसे भरण्यासाठी तुम्हाला मुंबई किंवा पुण्याला यावे लागेल. ऑनलाइन पैसे भरायचा ऑप्शन पहा शक्य आहे का तुम्हाला. तो जास्त सोयीचा होईल.

                                                                                          डॉ. हेगडेंचा पूर्ण पत्ता, दूरध्वनी वगैरे द्या ना इथे. तसंच त्यांची काही वेबसाईट असेल तर तो पत्ताही.
                                                                                          नाहीतर वविला पोचेपर्यंत पत्ता लागला नाही असं होईल Lol
                                                                                          दिवे घ्या!
                                                                                          ----------------------
                                                                                          The cheapest face-lift is a SMILE
                                                                                          Happy

                                                                                          बरं, या डॉ. हेगडेचे प्रमुख आकर्षण काय??
                                                                                          मागच्या वर्षी म्हैस होती. यावेळेला तसेच काही आहे का??
                                                                                          वर्षा विहाराला पाऊस आला नाही तर काय करायचे??
                                                                                          रीना जर बसमधे गझल म्हणायला लागली तर कानात घालायला बोळे मिळतील??
                                                                                          लाडकीचा आवाज ऐकू यायला माईक मिळेल का??
                                                                                          सांस्कृतिक समिती अति त्रास द्यायला लागली तर त्याना बाहेर काढता येइल का???
                                                                                          (शेवटचा प्रश्न खोडलेला आहे असे समजावे.)

                                                                                          मंडळी आपल्या आग्रहास्तव काही छायाचित्र प्रकाशित करीत आहोत.

                                                                                          डॉ. हेगडें रिसॉर्ट
                                                                                          HEGDE_RESORT.jpg

                                                                                          खास आकर्षण 'रेन डान्स'
                                                                                          RAIN_DANCE.jpg

                                                                                          'कृत्रीम धबधबा'
                                                                                          WF.jpg

                                                                                          छोट्या मंडळींसाठी 'घसरगुंडी'
                                                                                          SLIDER_1.jpg

                                                                                          आणखी बरचं काही, तर चला भेट द्यायला.

                                                                                          मोठी मंडळी बसली तर नाही का चालणार या घसरगुंडीवर?? मा'ऊ' आम्ही!
                                                                                          Happy
                                                                                          ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                                                          आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
                                                                                          पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

                                                                                          नमस्कार. हे ठिकाण कर्जतपासून जवळ आहे का? कारण यायची खूप इच्छा आहे पण एका घरगुती कार्यक्रमासाठी ६ वाजेपर्यन्त तळेगावला पोचायचे आहे. ते शक्य होईल का?

                                                                                          सारिविना, हे ठिकाण कर्जतहून अगदी जवळ आहे. साधारणपणे ५.३० पर्यंत सगळे कार्यक्रम संपवून परतीचा प्रवास सुरु होईल. तुम्ही जर मायबोलीकरांनी ठरवलेल्या बस ऐवजी स्वतः च्या गाडीने आलात तर तुम्हाला थोडे आधी निघून सुद्धा वेळेत तळेगावला पोहोचता येईल.

                                                                                            फोटो एकदम भारी बरका..
                                                                                            चला रेन डान्स म्हणजे यंदा कुठेतरी तंगड तोड करत जाऊन धबधब्याखाली भिजण्या ऐवजी डायरेक्ट शॉवर खाली भिजायचे की....
                                                                                            ==================
                                                                                            डिंग डाँग डिंग

                                                                                            जल्लां त्या रेन डान्स मधला रेन आणि कृत्रिम धबधब्यातलं पाणि आत्ता जसं गायब आहे तसं नेमकं वविला गायब नाही ना होणार? Wink

                                                                                            मोठी मंडळी बसली तर नाही का चालणार या घसरगुंडीवर??
                                                                                            नाही.. त्यासाठी त्या 'कृत्रिम धबधब्याचा' वापर करावा.. Lol Biggrin
                                                                                            .

                                                                                            बाकि पत्ता, नकाशा नि चित्रं दिलित ते छान Happy

                                                                                            अरे वा!!! डॉ हेगडे रीजॉर्ट तर एकदम भारी दिसतय...
                                                                                            बरं घसरगुंडीवर नाही.. झोक्यावर तर आम्ही बसू शकतो ना???
                                                                                            आणि मंजु नीट बघ, त्या कृत्रिम धबधब्यात पाणी आहे... Happy
                                                                                            बरं मला पडलेला प्रश्न.. खास आकर्षण काय आहे हो या वविचे????

                                                                                            संयोजक, रीसोर्टचा पत्ता दिल्याबद्दल आभार.
                                                                                            फोटो मस्त आलेत.. रेन डान्स भारी आहे Happy
                                                                                            नन्दिनी, तू हल्लीच गेंडा पाळला आहेस का? Proud
                                                                                            ----------------------
                                                                                            The cheapest face-lift is a SMILE
                                                                                            Happy

                                                                                            पूनम, मी कुठलेही प्राणी पाळत नाही. मला बिचार्या प्राण्याची दया येते.

                                                                                            धन्यवाद हिम्स्..आता पक्कं करतेच...

                                                                                            मागच्या वर्षी म्हैस होती. यावेळेला तसेच काही आहे का??>>> नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार वविसंयोजक हिप्पोपोटॅमसचे चित्र शोधायला धावले आहेत. तसेच डॉक्टर हेगडे यांना हिप्पोपोटॅमस राइड साठी ट्रॅक करण्याची विनंतीही करण्याचा त्यांचा मानस आहे असे आमच्या खास सूत्रांकडून समजले. Proud

                                                                                            ~~~~~~~~~
                                                                                            ~~~~~~~~~
                                                                                            Happy

                                                                                            मग हिप्पोवर बसायला हिप्पींसारखी वेशभुषा करून येणं आवश्यक आहे का हो संयोजक? Wink

                                                                                            Pages