भाड्याने घर घेताना कोणती काळजी घ्यावी.

Submitted by प्रितीभुषण on 11 November, 2014 - 04:51

भाड्याने घर घेताना कोणती काळजी घ्यावी. सामाना बद्दल
घराच्या परि स्थीती बद्दल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) घर कुठल्या एरियात आहे, म्हणजे तुम्हाला, तुमचे वा तुमच्या मिस्टरान्चे ऑफिस फार लाम्ब नसेल. मुलाना शाळा लाम्ब पडणार नाही वगैरे.

२) करार कसा आहे? म्हणजे अकरा महिन्याचा की लॉन्ग टर्म मध्ये ते पण आधी विचारात घ्यावे.

३) घर मालक विश्वासु आहे का, परीचयातला आहे का? नसल्यास किमान स्पष्टपणे आपल्याला खटकते ते बोलुन दाखवले तरी नाराज न होणारा आहे का? कारण करार झाल्यावर काही गोष्टी खटकल्या तर त्या दुरुस्तीपलीकडच्या आहेत का हे बघीतले पाहीजे. म्हणजे घरात पाणी-वीज-केबल कनेक्शन इत्यादी आवश्यक सेवा घरमालका समोर आधीच पारखलेल्या बर्‍या.

४) घरात रहायला जाण्या आधी काही लिकेज वगैरे आहे का, डागडुजी आहे का हे पण बघावे. आणी असल्यास मालकाना आधीच कळवावे. ( घरचा आधीचा अनूभव आहे यातला )

1. If the rent is inclusive or exclusive of maintenance? It should be clearly specified in the agreement.

शिवाय काही घरमालक भाडे पावत्या देत नाहीत. ते कबूल करून घेणे.
करार करताना तो प्रॉपर कायदेशिर करून घ्या... त्यात बरेच पैसे जातात म्हणून खूपसे घरमालक फक्त १०० रू च्या स्टॅम्प पेपरवर काहीसं टायपून सह्या घेतात आणि नंतर बदलतात. अव्वाच्या सव्वा पैसे वाढवून मागतात.

माझे भाड्याच्या घरातले खूप अनुभव आहेत. लिहिन एकेक.

लिकेज वगैरे आहे का, डागडुजी आहे का>>

घर कलर अरण्या आधी पाहिलेले एकदा पण आता
कलर केल्या वर एन पावसाळ्यात प्रोब्लेम नको

३ र्या मजल्या वर आहे
नो लिफ्ट

मैत्रिणीच्या नणंदेचं घर म्हणून आम्हाला भाड्याने मिळालं. कारण आम्ही फक्त मुली मुली राहणार होतो.
* आम्हाला घर हातात मिळालं ते स्वच्छ नव्हतं. आधीच्या भाडेकरूने ज्या अवस्थेत सोडलं त्याच अवस्थेत होतं. रंगरंगोटी दूरच. (हे पाहून घ्या.)
* भाडं मार्केट रेटने, पण नो पावती नो लिखापढी. डिपोझिट पन तसंच. (१०००० घेतलं होतं २००५ साली) नंतर अजून दहा घेतले
* दर वर्षी भाडं वाढवताना नाटक. डायरेक्ट कुनाला तरी घेऊन घुसून घर दाखवत असे आणि सांगे की हे तुमच्यापेक्षा जास्त भाडं देत आहेत तुम्ही २ दिवसात घर खाली करा. दरवर्षीचा मनःस्ताप झाला. नंतर अति झालं आणि हसू आलं असं झालं आणि आम्हाला त्याचं काही वाटेना झालं.
* घरात कोणत्याही सोयी करून दिल्या नाहित. नळ नेहमी बिघडत,खिडच्किच्या काचा निखळून पडत. आम्ही अनेक तक्रारी केल्या पण आम्हा ला कधी भिक घातली नाही. एकदा खिडकिची काच निखळून एकाच्या कार वर पडली. मग त्याने फोन करून आमच्या घरमालकाना खूप सुनावलं आणि मग घाबरून यांनी अत्यंत चिप लेबर लावून स्लायडिंग विंडो केल्या. त्या घरात खूप छान वारा यायचा तो बंद झाला.
* पण ते घर आमच्यातल्या प्रत्येकिला लाभलं. आमच्या आधी तिथे राहिलेला प्रत्येक भाडेकरून तिथून डायरेक्ट स्व्तःच्या घरी गेला. मी पण मैत्रिण पण. आमच्यात एक जण होती तीचं लग्न होत नव्ह्तं ते त्या घरात जमलं.
* आम्ही तिथे अनेक वर्ष राहिलो, मैत्रिणी ला पासपोर्ट साठी घरमालकांचा पत्र हवं होतं. रेसिडेंट प्रूफ म्हणून. पण त्यांनी साफ नकार दिला. त्यांना फक्त आमचे पैसे हवे होते.

असो... पण सोसायटीची सेक्रेटरी खूप चांगली होती. तिने सोसायटीच्या लेटर हेड वर लेटर दिले आणि मैत्रिणीचा पासपोर्ट झाला.

खरंतमेंटेन्स्न्स हा अर्धा मालक आणि अर्धा भाडेकरून असा विभागायचा असतो.
काही मालक नालायक असतात ते पुर्ण भाडेकरू क डून घेतात. काही अति चांगले स्वत भरतात

अजून एक धागा काढा "भाड्याने घर देताना कोणती काळजी घ्यावी Happy
<काही अति चांगले स्वत भरतात> Happy मी स्वतः भरायचो

पण भाडेकरूचा एक वाईट अनुभव,
भाडेकरुने कर्ज घेतांना बहुतेक भाडेकरार ची प्रत दिलेली होती अ‍ॅड्रेस प्रूफ म्हणून आणी आता दिड वर्शांनंतर बँकेचे लोक त्याला विचाराय्ला घरी येतात. असा अस्सा राग येतो ना.. पण त्याने दिलेले ३ पैकी एकही मोबाईल नंबर आता अस्तित्वात नाही , नवीन पत्ता पण कोणालाच माहित नाही

खरंतमेंटेन्स्न्स हा अर्धा मालक आणि अर्धा भाडेकरून असा विभागायचा असतो.>>
इथे पहिल्या महिन्यात घर मालक काही मेंटेंन करायचे असल्यास कर तो अन्यथा २र्य्य महिन्या पासुन भाडे करुलाच करावे लागते

फक्त भाडे भरायचे असते. मेंटेनन्स भरणे हे मालकाचे काम असते. निदान मला तरी तो भरावा लागला नाही.

भाड्याने की लीव्ह न लायसन्स?
कधीही भाडे, डिपॉझिट यातले काहीही चेकने द्यावे.
हल्ली अ‍ॅग्रीमेंटचे रजिस्ट्रेशन आणि जवळच्या पोलिसस्टेशनला अ‍ॅग्रीमेंटची कॉपी वगैरे देणे गरजेचे आहे ते करावेच. सोसायटीचे एन ओ सी पण जोडावे लागते सोबत.

अ‍ॅग्रीमेंटमधे लॉकिंग पिरियड आणि नोटीस पिरियड स्पष्ट लिहिलेला असावा.

सोसायटीचे लीव्ह लायसन्स संदर्भात असलेले नियम माहिती करून घ्यावेत.

पुण्यात तरी सध्या घरांची उपलब्धता वाढलेली आहे त्यामुळे भाडेकरुंच्या कलाने घरमालकांना घ्याव लागत. घरमालकांचा रुबाब आता निवळत चालला आहे. कारण जास्त काळ घर रिकाम राहिल की आर्थिक फटका जाणवायला लागला आहे.आता घरमालकही एजंटला कमिशन देउ लागलेत. कारण जे कमिशन देतात त्यांचीच घरे हे एजंट लोक लवकर घालवतात.