उषा उत्थुप

Submitted by Sanjeev.B on 8 November, 2014 - 04:14

उषा उत्थुप हे नाव ऐकलं कि डोळ्या समोर तरळतं एक सळसळतं व्यक्तिमत्व, वयाच्या ६७व्या वर्षी ही जी अमाप उत्साह त्यांच्यात दिसतं, ते पाहुन आजची तरुण पिढी नक्कीच त्यांच्या कडुन स्फुर्ती घेत असणार. ७ नोव्हेंबर १९४७ ह्या दिवशी त्यांचा जन्म मुंबईत एका तामिळ ब्राह्मण कुटुंबात झालं. लहान पणा पासुन त्यांना गाण्याचे हौस होते, पण त्याचे शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी घेतले नाही. घरी फार कर्मठ वातावरण असुनही २०व्या वर्षी चेन्नई मध्ये एका नाईट क्लब मध्ये ते गाऊन आपल्या गायन कारकिर्द चे सुरुवात केली, तत्पुर्वी ९व्या वर्षी अमिन सयानी ने त्यांना रेडिओ सिलोन वर गाण्याचे संधी दिले.

नाईट क्लब मध्ये ही भरजरी कांचीपुरम साडी, केसात गजरा माळुण आणि कपाळावर भली मोठी बिंदी लावुन रॉक / जॅझ चे तो शोज करत, तेव्हा पासुन ते आजतागायत त्यांची ही वेषभुषा त्यांचे ट्रेडमार्क होऊन गेले आहे. १९७२ साली रिलीज झालेली Bombay To Goa ह्या चित्रपटात त्यांचे एक गाणं आहे, त्या गाण्या मध्ये त्या दिसल्या आहेत, तेव्हाची बिंदी आजच्या मानाने लहान होती.

uu.jpg

१९७८ साली रिलीज झालेल्या शालिमार चित्रपटातले One Two Cha Cha Cha, हे त्यांनी गायलेलं गाणं आमच्या लहानपणी च्या सर्व पार्ट्यां मध्ये हे गाणं न चुकता लावत होतो, व आमची डांस पार्टी अजुन रंगात येत होती.

पुढे नंतर Disco Dancer ह्या चित्रपटातले कोई यहा आहा नाचे नाचे हे गाणं ही आमच्या डांस पार्टी ची शान वाढवत होती.

शान चित्रपटातले, दोस्तो से प्यार किया, दुश्मनों से बदला लिया आणि वारदात चित्रपटातले तु मुझे जान से भी प्यारा है हे गाणं ही मला फार आवडतं. नवीन गाण्यां मध्ये दौड चित्रपटातले टायटल ट्रॅक ही आवडतं.

त्यांचा भारदस्त आवाज हीच त्यांना मिळालेली देणगी आहे.

आज त्यांच्या वाढ दिवशी रेडिओ वर सकाळ पासुन त्यांनी गायलेले गाणि लागत होते, तर स्मृती पटला वर झर झर ही काही आठवणी तरळु लागल्या म्हणुन हा छोटासा लेखन प्रपंच.

उषा उत्थुप तुम्हांस वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

धन्यवाद Happy

संजीव बुलबुले.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्नापूर्वी ची उषा अय्यर ते उषा उत्थुप.... खूप आवडी ची गायिका आहे माझी ही..

जकार्ता ला मी शिकवत असलेल्या शाळेत ती आली तेंव्हा कोण आनंद झाला होता.. तिच्याबरोबर बसून गप्पा मारताना उत्साहाचा प्रचंड झरा सतत आजूबाजूला खळखळत वाहतोयसं वाटलं..
आणी तिने आपल्या जादूभर्‍या आवाजात म्हटलेलं ,' किलिंग मी सॉफ्टली' हे गाणं तर ,नंतर चे कित्येक आठवडे
आमच्या ऑडिटोरियम मधे भरून वाहात होतं...

शी इज अ ग्रेट सिंगर आणी ग्रेट ह्युमन बिइंग

तिच्याबरोबर बसून गप्पा मारताना उत्साहाचा प्रचंड झरा सतत आजूबाजूला खळखळत वाहतोयसं वाटलं.. <<<< lucky you Happy

सन्जीव मस्त लेख. खरे तर लहानपणी आम्ही त्यान्चा आवाज ऐकुन हसायचो, का तर तो खर्जात वाटायचा. आणी त्या आधी नाव न ऐकल्याने तो आवाज पुरुषाचा वाटायचा. मग बिनाका गीतमाला आणी आमच्या इथल्या एका दादाने ( गुन्ड नव्हे) वारदात, आणी बाकी शिनेमातील त्यान्ची गाणी ऐकवल्याने आमचा भ्रम दूर झाला.

मला पण आवडतो त्यान्चा आवाज. एकदम हटके. आणी चक्क साडी व गजरा या पेहेरावात देखील मॉडर्न दिसता येते, याचा आनन्द होतो. मज्जा यायची.

उषा उत्थुप यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा . Happy
मस्त लिहिलेय. उषा उत्थुप यांचा आवाज जसा यूनीक आहे तसा त्यांचा ड्रेसिंग सेंन्सही ,जो मलाही आवडतो . त्यांनी मराठी चित्रपट खोखो मधेही शेवटी टायटल साँन्ग गायलं आहे. तेही छान आहे.

One Two Cha Cha Cha . >>>> आशाजींनी पण गायलेय नवीन Happy उषा उत्थुप आणि आशाजीं म्हणजे दुधात साखर. हेही गाणं मस्त आहे आणि आशाजींचा घेण्यासारखा उत्साहपण .

संजीव,

खरच तुमचं कौतुक आहे अशा तारखा आणि माणसे जपून ठेवल्याबद्दल! Happy

दम मारो दम आणि हरी ओम हरी हे गाणीही उषा उत्थुप यांचीच का?

आ.न.,
-गा.पै.

दम मारो दम हे आशा भोसलेंचं आहे. उषा उत्थुप माझ्याही आवडत्या आहेत. दुर्दैवाने त्यांची स्वतःची मूळ गाणी अगदी थोडी आहेत बहुधा हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच. स्टेज शो मध्ये त्या इतर व इतरांचीच गाणी गातात...
पण त्यांचे व्यक्तिमत्व एकदम चार्मिंग आणि चार्जिंग आहे ....

सर्वांचे आभार.

पण मराठीचा मुडदा पाडलाय! <<< +१.
लेखन प्रकाशित करण्यापुर्वी शुद्ध लेखन तपासायचे राहुन गेले

लेख छान..

<<अनंत छंदी | 8 November, 2014 - 11:39 नवीन
लेख बरा आहे, पण मराठीचा मुडदा पाडलाय!>>

मराठीचा मुडदा बशिवला असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
अवांतर - बशिवण्यावरून आठवलं, मागे एका प्रोफेसरांनी त्यांच्या कवितेत 'गजरा बशिवला', तेव्हा मायबोलीवर कोण गहजब उडाला होता. Biggrin Light 1