एक कविता
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
5
एक नेगेटिव्ह कविता जी की माझी शैली.. आवड नाही पण आता भावनेच्या भरात लिहिलीच आहे तर प्रकाशन करण्यायोग्य समजावी :=) हा हा हा :=)
कशाला हवी माया?
नको कुणाची छाया
मातिशी इथल्या
माझीही काया
मिसळेलच ना?
कशाला हवे मैत्र
नको कुणाचे छ्त्र
ढगाखाली इथल्या
माझीही काया
भिजेलच ना?
कशाला हवे पुर्णत्व
नको कुणाचे तत्व
जगता जगता
माझीही काया
विरेलच ना?
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
ढगाखाली इथल्या माझीही
ढगाखाली इथल्या
माझीही काया
भिजेलच ना?<<< छान
आवडलीच.
आवडलीच.
छान लिहिलंय. पहिली प्रस्तावना
छान लिहिलंय.
पहिली प्रस्तावना तेवढी कवितेतील गांभीर्याशी विसंगत.
छान आहे.
छान आहे.
म्हणता तेवढी कविता नकारात्मक
म्हणता तेवढी कविता नकारात्मक नाही वाटत.