सापडलेल्या उत्तरातही

Submitted by निशिकांत on 28 October, 2014 - 00:37

प्रश्नच होते सापडलेल्या उत्तरातही
गुंता सारा जीवनातही, काळजातही

अत्म्यांमध्ये देव नांदतो, खरे तरी पण
अता श्वापदे जंगालातली माणसातही

कथनी, करनी मेळ न खाते वाचाळांची
म्हणून हल्ली राम न उरला प्रवचनातही

अन्नसुरक्षा फक्त मिळाली कागदावरी
निलाजरेपण! शासन करते जाहिरातही

जीवन इतके बत्तर जगलो, आर्त उसासे
ऐकू येती स्मशानातल्या गोवर्‍यातही

धोपट मार्गी सदा चालणे बंद करावे
वृक्ष सरळ तो अधी कापती जंगलातही

प्रेमसरी आईच्या सोडुन, बाकी सार्‍या
सोय पाहुनी झरझर झरती, आटतातही

स्वर्थासाठी दंगल करवुन आग लावती
श्रेय लुटाया संधी दिसते, विझवण्यातही

वीण एवढी घट्ट मनाची, पण ती येता
"निशिकांता"ला मजा वाटते उसवण्यातही

निशिकांत देशपांडे. मो.क्र.९८९०७ ९९०२३
E Mail--- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल छान झाली आहे. जमीनही छान आहे.

जीवन इतके बत्तर जगलो, आर्त उसासे
ऐकू येती स्मशानातल्या गोवर्‍यातही<<< वा वा

धोपट मार्गी सदा चालणे बंद करावे
वृक्ष सरळ तो अधी कापती जंगलातही<<< अधी ही सूट रुचली नाही. थोडा शब्दक्रम बदलून 'आधी' करता येईल का?

स्वार्थासाठी दंगल करवुन आग लावती
श्रेय लुटाया संधी दिसते, विझवण्यातही<<< दुसरी ओळ मस्त!

वीण एवढी घट्ट मनाची, पण ती येता
"निशिकांता"ला मजा वाटते उसवण्यातही<<< चांगला मक्ता!

आवडली
जाहिरातही आणि आटतातही ह्या ओळी अधिक आवडल्या अंदाज-ए-बयान मुळे
>>>वृक्ष सरळ ; तो प्रथम कापती जंगलातही <<<असे करता येईल का ?
जमीन छान आहे ह्या बेफीजींच्या मताशी १००% सहमत

सुंदर