denguvar ha kharach upay aaheka?

Submitted by सुभाषिणी on 27 October, 2014 - 06:03

आमच्या अंगणात पपईचे झाड आहे. गेल्या काही दिवसात अनेक जण पपईची पाने घेउन गेले. पाने देताना सहज विचारले काशासाठी हवी आहेत. सरवांना डेंग्युचया रुग्णासाठी हवी होती. पपईच्या पानाचा रस दिल्यास डेंग्यु बरा होतो असे कळाले.
असेच दुसरे म्हणजे किवी फळ खालल्यास रक्तातील प्लेटलेटस वाढतात असेही बर्याच जाणांकडौन ऐकले.हे खरेच प्रभावी ईलाज आहेत का? असल्यास त्याचा नेमका डोस किती असावा. किती दिवस हे चाल् ठेवावे. क्रुपया जाणकार व्यक्तींनी याचा खुलासा कारावा.सध्या डेंग्युची साथ फार आहे.त्यामुळे हे समाजले तर फार बरे होईल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पपईचे पान खाल्याने डेंग्यु बरा होत नाही पण रक्तातील प्लेटलेटस वाढायला मदत होते. कीवी आणि खरवसानेही होते.

पपईचे पान खाल्याने डेंग्यु बरा होत नाही पण रक्तातील प्लेटलेटस वाढायला मदत होते >>> +११११ Happy
माझ्या मावशीसाठी आत्ताच आम्हीही अशीच पपईची पानं मागुन आणलेली Happy

बाप्रे! किती फोफावलाय हा डेंग्यू एकंदरच >>> अनुमोदन
मागच्या वर्षी आईला झाला होता आणि सध्या काकूला झाला आहे!
आईचा डेंग्यू बरा होऊन हॉस्पिटल मधून घरी आल्यावर मनपा वाले घरात आणि आजूबाजूला फवारणी करुन गेले. याही वर्षी आले होते. का तर आमच्याच बिल्डींग मधे अजुन एक केस सापडली डेंग्यूची. मनपा कर्मचार्‍याला तोंडावर विचारले, की एखाद्या ठिकाणी अशी केस सापडल्यावर मग फवारणी करण्यात काय हशील आहे. मान्य आहे की उरले सुरले डास मरतील. जर दरवर्षीच पावसाळा संपताना, सगळीकडे डेंग्यूच्या केसेस मिळतात, तर ठराविक वेळापत्रक ठरवून खबरदारीचा उपाय म्हणून योग्य वेळीच का फवारणी करत नाही ! त्यावर त्याच्याकडे काही उत्तर नव्हते Sad

बरं झालं हा उपाय समजला. सासूबाईंना झालाय डेंग्यू.
आता महिना होऊन गेला तरी त्यांना अशक्तपणा वाटतो, बारीक ताप येतो रात्री खूप दगदग झाली तर हे किती दिवस चालू राहते?

आता महिना होऊन गेला तरी त्यांना अशक्तपणा वाटतो, बारीक ताप येतो रात्री खूप दगदग झाली >>> अंजली, अशक्तपणा येतोच. पूर्ण विश्रांती घेतली पाहीजे. तेच खरे ऑषध आहे. शक्यतो दगदग होणार नाही असे बघ.

मला ही झाला होत. ८ दिवस दवाखान्यात होतो. वरील उपाय केला. प्लेटलेटस वाढल्या

अ‍ॅडमीट झालो होतो तेंव्हा ७६००० होत्या
३५००० झाल्यावर बाहेरुन प्लेटलेटस दिल्या

बाहेर पडे पर्यंत २ लाखावर गेल्या

अमोल केळकर

नुकतेच मी आणि नवरा डेंग्यू मधून रिकव्हर झाल्याने नक्की सांगू शकेन. सुदैवाने आम्ही ताप, कणकण अंगावर न काढता पहील्याच दिवशी डॉक्टरकडे गेल्याने आणि आमचा डॉ़क्टर खरंच धीर देणारा असल्याने बरेच गैरसमज दूर झाले.
लक्षणे : सांधेदुखी, अंगदुखी, कणकण, डोकेदुखी, अचानक हाय फिवर, ताप चढ उतार त्यामुळे अंगावर न काढता डॉक्टर कडून तपासणी करून घ्यावी.
डेंग्यू पहील्याच दिवशी रक्ततपासणीमध्ये समजत नाही. त्यामुळे दुसर्‍या दिवसापासून सतत सीबीसी काऊंट तसेच दुसर्‍या आणि आठ दिवसांनंतर डेंग्यु अँटीजेन टेस्ट करावी लागते. (ही अवांतर माहीती जी डॉक्टरपरत्वे थोडीफार बदलू शकते)
किवीबद्दल माहीत नव्हते पण पपईच्या पानांच्या रसाबद्दल माहीत होते. डॉक्टरला विचारल्यास, तसा ठोस पुरावा नाही की यांनी प्लेटलेट्स वाढतात पण आयुर्वेदिक उपचार असल्याने हार्म नाही. त्यामुळे इतर औषधांसोबत करण्यास हरकत नाही असे सांगितले गेले.
पपईच्या कोवळ्या पानांचा रोज २-३ टाईम २ चमचे रस (शक्यतो काही खाण्याआधी कारण उलटून पडण्याची शक्यता असते.) तसेच फळे खावीत विशेषतः डाळींब. डॉ ने सांगितले की या आजारात अशक्तपणा खूप येतो. त्यामुळे नियमित औषधे, पोषक आहार आणि पुरेशी विश्रांती घ्यावी. पंधरा दिवस अशक्तपणा जाणवतो साधारण. त्यामुळे काळजी घ्यावी. मला सहा-सात दिवस लागले रिकव्हर व्हायला पण नवरा पंधरा दिवस झाले तरी अजून अशक्तपणा फील करतो.

किती जणांना खरच डेंग्यु झाला आहे ? प्लेटलेटस कमी झाल्या या कारणावरुन हा डेंग्यु असण्याची शक्यता मला ही डॉक्टर साहेबांनी सांगीतली होती.

पहिल्या दिवशी १,५१,०००/- होत्या

तिसर्‍या दिवशी १,४७,०००/- दिसल्या

यावरुन मी डेंग्यु ची टेस्ट करुया का विचारले. त्यावर ते हो म्हणाले. ताप, अंग दुखी आणि डोकेदुखी तिसर्‍या दिवशी सुरुच होते.

हिमोग्राम पहिल्या डॉक्टर साहेबांनी नीट पाहिलाच नव्हता. त्यांचा अनुभव खुप आहे पण नेमके काय झाले कुणास ठाउक. माझ्या शंकेला त्यांनी नीट हाताळुन डेंग्यु नाही असे म्हणायला हवे होते. पण त्यांना काय झाले होते माहित नाही.

जेव्हा तो हिमोग्राम नीट पाहिला तेव्हा त्यात पांढर्‍या पेशींची संख्या प्रमाणात होती आणि पांढर्‍या पेशींमधे असलेल्या पाच प्रकारच्या प्लेटस ची स्थिती पाहिल्यावर शरीरात कुठेच इन्फेक्शन दिसत नव्हते.

१,५१,०००/- प्लेटलेट्स काउंट बॉर्डरवर होता. पहिल्या आणि तिसर्‍या दिवसाच्या काउंटमधे सिग्नीफिकंट फरक नव्हता.

मग मी नेहमी प्रमाणे आयुर्वेदीक वैद्यांकडे गेलो. त्यांनी नाडी आणि इतर लक्षणावरुन अतिरिक्त पित्तामुळे ताप आला आहे असे निदान केले. औषध सुध्दा दिले ज्याने ताप २४ तासात उतरला.

डेंग्युचे निदान डेंग्युच्या टेस्ट ने होते पण त्या आधीची लक्षणे आणि हिमोग्राम निट तपासुन ही टेस्ट करायला हवी अन्यथा त्या टेस्ट चा रिपोर्ट तीन दिवसांनी येतो आणि तो पर्यंत पेशंट भितीने मरतो.

माझ्या साबांचे पण महिनाभर असंच चालू होतं ... हा डॉक्टर तो डॉक्टर... एकाने चक्क मलेरियाची औषधे दिली.
त्यांना काय व्हायचे की रोज न चुकता रात्री ताप यायचा. दिवसा हळूहळू कमी व्हायचा. हे असं बरेच दिवस चालू राहिलं त्यात नेहेमीचे डॉ. नव्हते.
२-३ डॉ. बदलले .. पहिल्यांदा ड्रीमगर्ल म्हणतेय तसं तपासणीमधे डेंग्यु चे काहीच निदान झाले नाही. तरी पण हा असा ताप येणं, अंगदुखी सुरू राहिले. ८-१० दिवसांनी डॉ. बदलल्यावर निदान झाले. प्लेटलेट काऊंट ३३००० झाला होता.
आता थोडं बरं आहे पण अशक्तपणा जाणवतोच.