लेकीची चित्रकला

Submitted by सायु on 8 October, 2014 - 02:43

ही सगळी चित्र सई, (वय १३) हीने काढलेली आहेत.
नुकतीच इन्टरमीजीयेट ची परिक्षा दिली आहे... त्यामुळे सध्या हुरुप जास्त आहे...
खुप सफाई नाहीये अजुन तरी सांभाळुन घ्या :)...
सई सध्या ८व्या वर्गात आहे, चित्रकला आणि हस्तकला दोन्ही आवडीचे विषय आहेत.
शिवाय शास्त्रीय संगीत पण शिकते आहे.... (यंदा ४थ्या परिक्षेला बसली आहे)..

शेवटची रांगोळी नवरात्रात अष्टमीला आम्ही दोघी मायलेकींनी काढली होती... (रेणुका देवीचा मुखवटा काढण्याचा प्रयन्त केला...)

saee.jpgsaee1.jpgsaee2.jpgsaee3.jpgrangoli_0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुद्धा एलिमेंटरी अन ईंटर्मिजिएट पास आहे ....

पण हे एवढे कौशल्याच्या आसपासही .. तेव्हाही नव्हतो, आताही नाही __/\__

अवांतर - एलिमेंटरी ८ वी ला आणि ईटरमिजिएट ९ वीला असते ना..?

अस्मादिकांना गुरुवर्यांनी ह्या परीक्शेचं " ताकास तुर" कळु दिलं नाही.
आमची कलाच तशी महान होती :प

अप्रतीम.. तिच्या वयच्या मनाने तर अजुनच कौतुक करवसं वाटतं आहे!

माझ्या मित्रानी ह्या परिक्षा ६वी ७वीतच दिल्या होत्या.. आणि मी इंजिनियरींगच्या फर्स्ट इयरला इंटरमिजिएट दिली.

आशिका, हेमा ताई, साक्षी, जिप्सी, दिनेश दा, नलिनी, दक्षिणा, धनुकली, मामी,चैत्राली, विजय, नताशा, हिम्सकूल सगळयांचे मना खुप खुप पासुन आभार...:) तुम्हा सगळ्यांची शाबासकी , शुभेच्छा सदैव तीच्या पाठीशी असु दया!:)

मी सुद्धा एलिमेंटरी अन ईंटर्मिजिएट पास आहे .शाळेतले दिवस आठवले.>>>>>>>>>>>>>
मी पण मी पण!!!
असो.........सायली लेकीला शाब्बासकी गं! स्टिल लाइफ मस्तय!

.खुप सफाई नाहीये अजुन तरी सांभाळुन घ्या >>>>.. सायली, किती सुंदर चित्रं काढली आहेत.वयाच्या मानाने सफाईही आहे.

Pages