एक कॉफ़ी... होज्जाए?

Submitted by बागेश्री on 17 September, 2014 - 22:59

मी: आज भेटशील?
तो: हो
मी: काय सांगतोस?
तो: खरंच!
मी: केव्हा? कुठे?
तो: तू सांग
मी: CCD? शार्प सहाला?
तो: चालेल
मी: बापरे! फक्त २ तास!! मला तयारी करायला हवी! अजून ऑफिसमध्येच आहे मी, घरी पोहचून जरा फ्रेश होऊन यायचं म्हणजे पंधरा मिनीटात इथून सटाकायचं! असो... भेटतो म्हणतोयस हेच खूप आहे, भेटू चल..
तो: ओ.के.
मी: ए पण ऐक ना...
तो: हां बोल
मी: नककी येशील ना?
तो: ह्यावेळेस नक्की!!

मी पाऊणे सहाला तिथे.
माझ्या आवडत्या टेबलावर स्थानापन्न!
शेवटी आज आमना- सामना होणारच होता
जरा केस सारखे केले.... 
बसण्याचं पोस्चर फायनल केलं
डोळ्यांतून फार काही सांगण्यात येऊ नये म्हणून भाव-भावना ऑर्गनाईज करून घेतल्या
सगळं मनासारखं झालं!
मग दहा मिनीटे गेली असावीत...
पुन्हा एकदा सगळं ज़रा नीट केलं.
आता CCD वाला रेस्टलेस होत होता...
मग माझ्यासाठी Cafe Latte अॉर्डर केली...
आता जरा रेलून बसले

६.३० होऊन गेले....
कॉफी आली...
हा कॉफी एक खरंच ख़ास प्रकार आहे
त्याचा अरोमा चित्तव्रृत्तींवर जादू करतो
काहीतरी कुलूपबंद केलेलं अलगद सुटतं अन् मनाभोवती रुंजी घालत राहतं
कुठेतरी दूर दृष्टी खिळवून, स्वत:तच गुंतून एक एक घोट पित जाताना आपल्यातलंच एक तलम रूप आसपास जाणवत राहतं.. रोजच्या जगण्यात न जाणवणारं...
कॉफीचा शेवटचा घोट घेतला, मग रिकामा झाला आणि तंद्री मोडली...

सात वाजत आलेत!
आता फोनकडे लक्ष गेलं
मिटींगमध्ये व्यत्यय नको म्हणून तो मघाशीच सायलेंटवर केला होता..
कॉल येऊन गेला असेल का? की मेसेज तरी? म्हणून अधीरतेने फोन अनलॉक केला.
फोनने 7:00 अशी वेळ, आणि बाहेर हलकं ड्रिझल होतंय, इतकीच माहिती दिली.

"मॅम, वुड यू लाईक टू ऑर्डर अ‍ॅनिथींग?"
"ओह येस, रिपीट सेम कॉफ़ी प्लीज, थँक यू"
"शुअर मॅम"

कॉफीचा दुसरा मग...
मनातं सावरून ठेवलेलं आता पसरू लागलं!
डोळ्यातही खूप काही साठू लागलं!
धुकंच धुकं आसपास उरलं!
अशात तो आला असता तर हा नूर त्याला बघवला असता? की हाच नूर बघायचा म्हणून हे असं वागणं?
तो आत्ता इथे आलाच तर?
मी शांततेने बोलेन?
की बरसेन... सगळं फ्रस्ट्रेशन काढत?
CCD चा डेकोरम जपताही येणार नाही तेव्हा!

पण मलाही इथे येण्याआधी अंधूकशी जाणिव होतीच ना की तू येणार नाहीसंच म्हणून?
मी एकटीच कॉफी पित बसेन म्हणून.
अमोरा समोर बसून, डोळ्यांत डोळे घालून बोलण्याचा तुझा स्वभावच नाही म्हणून.
लक्ष नसताना, कधीतरी सरर्कन बाजूने निघून जाण्याचाच तुझा खरा स्वभाव
'तो तू होतास' हे कळून, वळून पाहेपर्यंत तू बराच दूर गेलेला असतोस, पाठमोरा पूसटसाच आठवतोस, धूसरसा.

कॉफीचा अरोमा!

काय बिघडालं असतं आज आलाच असतास तर?
मला काय हवं होतं,
फक्त विचारायचं होतं!
तुझ्याकडून ऐकायचं होतं!

कॉफीचे घोट रिचवताना, मनाचा वेग किती वाढू शकतो?
किती वाजलेत?
बिल पे केलं का?
नाही!
अजून कॉफी संपायचीय
पुन्हा एक घोट!
पुन्हा तो इसेन्स!

आज विचारणार होते, मस्त स्माईल करून
काय आहेत प्लॅन्स?
मोकळं सांगून टाक.
धक्के कशासाठी.
सांगून टाक 'अशी अशी तुझी वाट लावणार आहे...'
मग अमोरा समोर मीही ते चॅलेंज स्विकारेन.
अशा लढाईतली मजा अनुभवूया...
तू अंतिम ध्येय सांगावंस, मग हवे ते डाव टाकावेस.
मीही हवे तसे झेलीन!

पण ये असा एकदा!
पुढ्यात बैस!
भलं करणार आहेस,
बुरं करणार आहेस, जे काही असेल ते असं पुढ्यात येऊन सांग... अगदी निधडया छातीनं!
मागनं वार करायचे, बेसावध असताना करायचे, ह्या जुन्या पद्धतींना सोड.
ये नशीबा, असा समोर ये!
सामोरा येता येता असा पळ काढून गनिमी कावा पुरे.
पुढ्यात ये,
मग बोलू!

"मॅम, वूड यू.."
"नंथिग! बिल प्लीज....."

-बागेश्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही

हा कॉफी एक खरंच ख़ास प्रकार आहे
त्याचा अरोमा चित्तव्रृत्तींवर जादू करतो
काहीतरी कुलूपबंद केलेलं अलगद सुटतं अन् मनाभोवती रुंजी घालत राहतं
कुठेतरी दूर दृष्टी खिळवून, स्वत:तच गुंतून एक एक घोट पित जाताना आपल्यातलंच एक तलम रूप आसपास जाणवत राहतं.. रोजच्या जगण्यात न जाणवणारं...>>मस्त..

बागेश्री...
<<हा कॉफी एक खरंच ख़ास प्रकार आहे
त्याचा अरोमा चित्तव्रृत्तींवर जादू करतो
काहीतरी कुलूपबंद केलेलं अलगद सुटतं अन् मनाभोवती रुंजी घालत राहतं
कुठेतरी दूर दृष्टी खिळवून, स्वत:तच गुंतून एक एक घोट पित जाताना आपल्यातलंच एक तलम रूप आसपास जाणवत राहतं.. रोजच्या जगण्यात न जाणवणारं...>>

झक्कास. एकदम मनातलं.
<<भलं करणार आहेस,
बुरं करणार आहेस, जे काही असेल ते असं पुढ्यात येऊन सांग... अगदी निधडया छातीनं!>>...
कॉफी हा असला अ‍ॅटिट्यूड जागवते नै?

बागेश्री! विचार, भावना यांना छान शब्दबद्ध केले आहेस... भवना अगदी तंतोतंत, सहज मांडल्या आहेत... कॉफीमुळेच हे शक्य झाले असणार... Wink

मनातं सावरून ठेवलेलं आता पसरू लागलं! मस्त...

बागु.. सुप्पर्ब ...

किस किस को बतायेंगे , जुदाई का सबब हम
तू मुझसे खफा है तो
जमाने के लिये आ
रंजिश ही सही.. या ओळी आठवल्या.. उगाचच !!!

>>>>>हा कॉफी एक खरंच ख़ास प्रकार आहे
त्याचा अरोमा चित्तव्रृत्तींवर जादू करतो
काहीतरी कुलूपबंद केलेलं अलगद सुटतं अन् मनाभोवती रुंजी घालत राहतं
कुठेतरी दूर दृष्टी खिळवून, स्वत:तच गुंतून एक एक घोट पित जाताना आपल्यातलंच एक तलम रूप आसपास जाणवत राहतं.. रोजच्या जगण्यात न जाणवणारं...

अहाहा!!! कॉफी प्यावीशी वाटू लागली. काय मस्त लिहीले आहे.