मलाही कोतबो - श्रीरंग गोखले

Submitted by श्रद्धा_ on 13 September, 2014 - 08:14

कधीपासून मनातल लिहायच होत पण काय करणार कागदाचा वापर कमीत कमी करतो ना मी ...अगदी ऑफिसमध्ये पण कागद वापरत नाही ....अहो अस काय करताय जंगल संपत आली आहेत,झाडांच्या कित्तेक प्रजाती नष्ट होत आहेत (म्हंटल हिथे लिहूया विजेचा अपव्यय झाला तरी काही हरकत नाही तो झाला तरी चालतो बर मला).. .अहो तुम्हाला माहित आहे का ??....तिसर महायुद्ध हे पाण्यासाठीच होणार आहे त्यामुळे आम्ही तर आतापासूनच पाण्याच्या बचतीला सुरवात केली आहे....तुम्हाला म्हणून सांगतो मी आणि माझी आई रोज रडून रडून ४-५ कळश्या तर ह्या अशा जमवतो ...माझ्या आईची तर मास्टरी आहे रडण्यात ,आहात कुठे ??..आपणच नको का नैसर्गिक साधनसंपत्तीच रक्षण करायला ....हा तर मला काय सांगायचे होते ,गोकुळात जन्म झाला माझा तिथे कशालाही तोटा नव्हता आया,बाबा ,काक्या,काके सगळ अगदी मुबलक ....म्हणजे आधी तशी परिस्थिती हलाकीचीच होती.. आमचे बाबाआजोबा एकदा आईआजीशी काहीतरी खोट बोलले आणि ते तिला कळल ,झाल घाबरून त्या धसक्यानेच हार्ट अटॅक ने गेले ना ते ,ते तसे गेले नसते तरी आईआजीनी त्यांना घराबाहेर काढलंच असत म्हणा (नंतर माझ्या बाबांना आणि काकाला नाही का काढल तसच ) मग ते गेल्यावर आईआजीनी गृहोउद्योग काढला तो वाढवला ,मुलांना वाढवल मग त्यांची लग्न करून त्यांच्या बायकांना घरात ठेवून मुलांना घराबाहेर काढल, असो....पण माझ्यावर मात्र आईआजीचा फार जीव...आईआजी आणि बाकीच्या आयांनी मिळून मला वाढवल पार ऑक्सफर्ड पर्यंत शिकायला पाठवल (तिथे जावून माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही हा भाग निराळा )....मग कष्टाने वाढवलेला गृहोउद्योग रसातळाला नेण्यासाठी माझ्याकडे सोपविला...

दान धर्म करून गृहोउद्योगाचे तीन तेरा वाजवण्याच्या तयारीत असताना एकदा बसस्टॉपवर जान्हवी भेटली आणि माझ्या नशिबाची चक्रेच उलटी फिरली... तिकडे माझ्या आयांनी माझ्यासाठी सायलीला पसंत केली होती (कोणाला सांगू नका पण मस्त आयटम होती ती;) )...पण मी मात्र जान्हवीच्या प्रेमात आंधळा झालो होतो ना (आता कळतंय मूर्खपणा होता सगळा ).

मग आयांशी भांडून जान्हवीशी लग्न करून तिला घरात आणल ...लग्नानंतर कसला रोमांन्स आणि कसलं काय.. .नेहमी सहा आयांपैकी एक आई मधेच कडमडणार नाही तर ही ‘काहीही हा श्री’ ‘काहीही हा श्री’ म्हणून पकवणार....दुर्दैवाचे दशावतार दुसर काय ...सहा आयांचा वेडेपणा कमी होत होता कि काय म्हणून अजून भर म्हणून ही एक वेडी बायको घरात आणली.. ..काय सांगू तुम्हाला हिचा वेंधळेपणा कधी चंद्रहार हरवते ,कधी मला विसरते ,कधी स्वतालाच विसरते काही विचारू नका ...ह्या सात बायकांमध्ये राहून जीव घुसमटायला लागला होता माझा...तेवढ्यात देवाने माझी हाक ऐकली ...घराबाहेर गेलेले बाबा,काका घरी परतले तेव्हा कुठे जीव भांड्यात पडला माझा ...आता अधून मधून बसतो त्यांच्याबरोबर पित ,उगाच भलते सलते विचार करू नका आईनी केलेला आल्याचा चहा पित बसतो ...दुसर काही पिण्याच भाग्य नाही आमचे....आईआजीनी हे ऐकल ना तर आताच आम्हा तिघांना घराबाहेर काढेल असो...माझ्या बायकोचा आय क्यू कितीही कमी असला तरी एक गोष्ट मात्र तिने चांगली केली ती म्हणजे माझ्या सगळ्या आयांना उदयोगधंद्याला लावल नाही तर सगळ्या आयांनी 'माझा सोनुला', 'माझा छकुला' म्हणून माझ्या अवतीभवती करत डोकं mad करत आणल होत..

सगळ काही सुरळीत झालय अस वाटत असतानाच जान्हवी डोक्यावर पडली....आधीच मंद असलेली तिची बुद्धी आणखी मंद झाली....नशिबाचे भोग दुसर काय म्हणणार ह्याला ...अरे हे काय बोलता बोलता संध्याकाळचे सहा वाजले ...मला निघायला हव आता. ..बसस्टॉपवर ती येडी वाट बघत असेल माझी..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला म्हणून सांगतो मी आणि माझी आई रोज रडून रडून ४-५ कळश्या तर ह्या अशा जमवतो ...माझ्या आईची तर मास्टरी आहे >>>>>:हहगलो:

आईआजी आणि बाकीच्या आयांनी मिळून मला वाढवल पार ऑक्सफर्ड पर्यंत शिकायला पाठवल (तिथे जावून माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही हा भाग निराळा )...मग कष्टाने वाढवलेला गृहोउद्योग रसातळाला नेण्यासाठी माझ्याकडे सोपविला...>>>:हहगलो:

माझ्या आयांनी माझ्यासाठी सायलीला पसंत केली होती (कोणाला सांगू नका पण मस्त आयटम होती ती;) >>:फिदी:

लग्नानंतर कसला रोमांन्स आणि कसलं काय.. नेहमी सहा आयांपैकी एक आई मधेच कडमडणार नाही तर ही ‘काहीही हा श्री’ ‘काहीही हा श्री’ म्हणून पकवणार....दुर्दैवाचे दशावतार दुसर काय ..सहा आयांचा वेडेपणा कमी होत होता कि काय म्हणून अजून भर म्हणून ही एक वेडी बायको घरात आणली.>>>>>:हहगलो:

आता अधून मधून बसतो त्यांच्याबरोबर पित ; उगाच भलते सलते विचार करू नका आईनी केलेला आल्याचा चहा पित बसतो ..दुसर काही पिण्याच भाग्य नाही आमचे..>>>:हहगलो:

.माझ्या बायकोचा आय क्यू कितीही कमी असला तरी एक गोष्ट मात्र तिने चांगली केली ती म्हणजे माझ्या सगळ्या आयांना उदयोगधंद्याला लावल नाही तर सगळ्या आयांनी 'माझा सोनुला', 'माझा सोनुला' म्हणून माझ्या अवतीभवती करत डोकं mad करत आणल होत..>>>>:हाहा:

सगळ काही सुरळीत झालय अस वाटत असतानाच जान्हवी डोक्यावर पडली....आधीच मंद असलेली तिची बुद्धी आणखी मंद झाली....नशिबाचे भोग दुसर काय म्हणणार ह्याला ..अरे हे काय बोलता बोलता संध्याकाळचे सहा वाजले ...मला निघायला हव आता ..बसस्टॉपवर ती येडी वाट बघत असेल माझी..>>>:हहगलो:

भारीये श्रद्धा हे पण.:फिदी:

रश्मी ..जान्हवी नंतर 'श्री' बाळाच मनोगत मांडणे भागच होत ग ..कारण ते एकाच जीवाचे दोन तुकडे आहेत Proud Proud

सगळ्यांचं लिहिणार का?>> हाहाहाहा.. नाही नाही हे शेवटच होत .. स्टॉक संपला आता Happy आणि तसही आता कोण उरल आहे ??

आहेत. चार आया(दोघींवर लिहिलं गेलंय), वडील, एक काका, एक दत्तक बहीण(सिमरन), एक सावत्र भाऊ(पिंट्य|), झालच तर आपटे, स्मितूडी (हिचा पहिला नंबर : थोबाड दिसत नाही पण फुकट बदनामी , तिची , तिच्या आईची आणि मुलांचीसुद्धा), बसस्टॉपवरचा दाणेवाला.

स्मितूडी (हिचा पहिला नंबर : थोबाड दिसत नाही पण फुकट बदनामी >> Lol

थोबाड दाखवलेल्यांपेक्षा थोबाड न दाखवलेल्यांची लिस्ट मोठी आहे ..रघुअण्णा,मनीषची आई, गीताचा बॉयफ्रेंड,शिवानी ,माळी काका.. ह्या सगळ्यांनी थोबाड दाखवायला सुरवात केली तर अजून १० वर्ष तरी मालिका संपणार नाही Happy