उच्च रक्तदाब आणि त्यासंबधीचे प्रश्न

Submitted by सावली on 11 September, 2014 - 03:56

उच्च रक्तदाब हा आजार (?) बहुतांश वयस्कर व्यक्तींना होतो असा माझा भ्रम होता. जवळच्या नात्यातल्या पस्तिशितल्या व्यक्तीलाही उच्च रक्तदाबाचे निदान झाले आहे. गेले दोन वर्ष वार्षिक चाचणीमधे रक्तदाब थोडा जास्त होता, यावर्षी अधिक जास्त आला (१६०/९०) असे डॉ. चे म्हणणे आहे. अर्थातच गोळ्या लगेच चालु केल्या.

पहिल्यांदा ज्या डॉक कडे गेलो त्यांच्या म्हणण्यानुसार गोळ्या घ्यायला सुरुवात केली की लगेच ( फारतर आठवडा भरात ) रक्तदाब कमी होईल. न झाल्यास गोळ्या बदलुन पहाणार. दर दिवसाआड फॉलोअप साठी बोलावले. पण प्रॉब्लेम असा की हे डॉक. त्यांच्या दिलेल्या वेळेत दवाखान्यात हजरच नसायचे. (यांनी दिलेल्या गोळ्या दहा दिवस घेतल्या.) त्यामुळे दुसरा डॉक शोधणे आले.

या डॉक. ने वेगळ्या गोळ्या लिहुन दिल्या. यांच्याकडे जायच्या आधी दोन तीन दिवस गोळ्या बंद. यांच्याकडे रक्तदाब १८०/९० आला! पंधरा दिवसांनी फॉलोअपला बोलावले तेव्हा १६०/९० आला ( हे क्लिनिक वेगळे, म्हणजेच रक्तदाब मोजायचे मशिन वेगळे होते). आता तीन महिन्यांनी फॉलोअप्साठी बोलावले आहे. या डॉक च्या मते गोळ्या घ्यायला सुरुवात केल्यावर सुमारे एक महिन्याने फरक पडेल.

हेच घरी असलेल्या मशिनवर रिडींग घेतले तर १४५/ ९० च्या आसपास येते. ( हे केवळ मशिन आहे म्हणुन काहि दिवस सलग एकाच वेळेस चेक केले)

या दोन्ही गोष्टींमुळे बरेच गोंधळ वाढले.
१) गोळ्या घ्यायला लागल्यावर खरच किती दिवसात फरक पडतो? गोळ्या बदलुन वगैरे बघाव्या लागतात का?
२) रक्तदाब मोजण्याच्या मशिनचे कॅलिबरेशन वगैरे असते का? ( डॉक ना काळजी असेलच तरिही ) वेगवेगळ्या मशिनवर वेगळे रिडींग येऊ शकते का?
३) जेवणात मीठ कमी करायचे आहेच. सुरुवात केली आहे. पण अलिकडे लो सोडीयम मिठाच्या जाहिराती पाहिल्या. त्यांच्या वापरण्याने खरच काही उपयोग होतो का?
४) जवळपास रोज तासभर खेळायची सवय आहे. खेळण्याने, कार्डियाक व्यायामाने काही त्रास होऊ शकतो का? ( हे डॉक ना विचारायचे राहिले आहे. पुढच्या भेटीत विचारणारच )
५) इतक्या लवकर रक्तदाब सुरु होण्याची काय कारणे असु शकतात? वजन जास्त आहे , ते कमी करायचे प्रयत्न चालु आहेत. त्याव्यतिरिक्त काय?
६) इतर काय पदार्थ खाल्याने / न खाल्याने उपयोग / नुकसान होते असे काही आहे का?
७) रोज गोळी चालु असेल आणि तरिही एखाद कारणाने रक्तदाब वाढु शकतो का? वाढल्यास काय करावे?
८) लाइफस्टाईल मधे काय बदल अपेक्षित आहेत?

अजुनही बरेच प्रश्न पडत असतात. प्रत्येकवेळेस लगेच डॉक कडे जाऊन विचारता येतेच असे नाही. त्यांची अपॉइंटमेंट असली की प्रश्न विचारले जातातच पण इथेही काही माहिती मिळेल असे वाटल्याने इथे विचारत आहे.
आधीचे रक्तदाबावरचे धागे घरगुती उपाय सदृश्य होते पण या धाग्याचा उद्देश्य वेगळा आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता एकूणच हार्ट डिसीज, बीपी व रिलेटेड डिसीजेस, डायबेटीस च्या रुग्णांची वयोमर्यादा कमी होत चालली आहे. बैठे काम, व्यायाम नसणे, ओबेसिटी, स्ट्रेस चुकीचा आहार ही कारणे आहेत. डिटेल वारी आर्टिकल इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आहे.

मला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. पण गोळी घेण्याइतका नाही. एक गोळी दिली होती पण त्याने फारच डोके दुखायचे म्हणून बंद केली. वरून मीठ घेणे वगैरे पूर्ण बंद करायचे. प्रोसेज्स्ड चीज सोया सॉस, पॅकेज बंद फूड, रेडी मील्स वगैरेत खूप सोडियम असते. ते बंद करायचे. व्यायाम पाहिजे. स्ट्रेस लेव्हल कमी केली पाहिजे. आवश्यक असलयस कामाचे स्वरूपच बदलावे असे सांगतील. मी हाय स्ट्रेस सेल्स ची नोकरी व बिझनेस सोडून दुसर्‍या पद्धतीचे काम करते.

मनःशांतीसाठी मेडिटेशन, योगा, पेट थेरपी, उपयोगी पडते. काही टेन्शन दायक घटना फोन कॉल घडल्यास बीपी हाय होते लगेच. डोक्यात मुंग्या आल्यासारखे वाटते. तेव्हा शांत बसणे डीप श्वास घेणे प्राणायाम इत्यादी उपयोगी पडेल. वैयक्तिक आयुषातील स्ट्रेस कमी केला पाहिजे, सासवा सुना/ जुनी घरगुती भांडणे, आतल्या गाठीचा स्वभाव ह्याने मन आतूनच पोखरले जाते. ते सर्व सॉर्ट आउट करून इनर पीस अचीव्ह केल्यास उपयोग होतो. Mental equilibriam helps but physicial exercise and regular check ups help even more. sudden very high BP requires hospitalization. patient can faint. Focus on the really important things in life and let go others. make time for your loved ones.

लाइक् डायबेटीस बीपी नीड्स टु बी मेंटेन्ड इन इट्स हेल्दी रेंज. बाकी साती/ इब्लिस जास्त सांगू शकतील.

अमा, अगदी योग्य.

सावली; इथले डॉक्टर सांगतीलच पण रक्तदाब हा त्या वेळच्या मनस्थितीवर अवलंबून असतो. खुपदा तो मोजायचाय याचेच टेंशन येते. मी केनयात तपासायचो त्यावेळी, तो डॉक्टर मला ५ मिनिटे बसवून ठेवायचा, गप्पा मारायचा
मगच ते मोजायचा.

मशीनबरोबर जे लिफलेट येते त्यात सविस्तर लिहिलेले आहे. ( कधी घ्यायचे, कसे बसायचे, त्यात बदल होऊ शकतो का वगैरे )

सावली, मला वयाच्या एकतिसाव्या वर्षी उच्च रक्तदाबाचं निदान झालं आहे. रोज एक गोळी घेते मी.
माझी आई तर तिच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी उच्च रक्तदाबाची शिकार झाली होती, त्यामानाने माझ्याकडे तो वारसा सहा वर्ष उशीरा आला असं म्हणायला हवं Wink आमच्याकडे आजोळकडून उच्च रक्तदाबाचा वारसा मिळालेला आहे. आजीसकट सगळे मामा आणि मावश्या भेटले की तुला सध्या कोणती गोळी किती वेळा आणि सध्याचं रिडिंग काय ह्या चौकश्या आधी करतात, मग हवापाण्याच्या गप्पा Wink
माझ्या सख्ख्या मावसभावालाही नुकतंच त्याच्या वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी ह्याचं निदान झालं आहे.
तस्मात्, वय/ वजन/ लाईफस्टाईल/ खाणंपिणं/ व्यायाम यांबरोबरच अनुवंशिकता हेही एक या आजाराचं कारण आहे.

या डॉक च्या मते गोळ्या घ्यायला सुरुवात केल्यावर सुमारे एक महिन्याने फरक पडेल. >> एक महिन्याने नाही, माझ्या माहितीप्रमाणे तीन दिवस.

अनुवंशिकता बरोबर. हार्ट, बीपी,डायबेटीस ही मेजर त्रयी आहे तस्मात एक डिटेक्ट झाल्यास बाकीच्या दोन्हीच्या पण टेस्ट करून घ्यावा. घाबरवायला लिहीत नाही. पन त्यानुसार उपचारात फरक असतो. योग्य औषधे मिळू शकतात. महत्त्वाचे म्हणजे सुपर महत्वाचे सिगरेट दारू ही दोन्ही व्यसने सोडून द्यावीत.

कोणी डॉक्टर ही जी दोन प्रेशर असतात ( सामान्य माणुस वरचे आणि खालचे असे म्हणतो ती ) त्याबद्दल काही बेसिक लेव्हल चे सांगेल का?
ती कशी मोजली जातात ते मला माहीती आहे, पण त्याचा नक्की रीलेव्हंस काय आहे असे काही तरी.

अमा, दिनेश., मंजूडी, टोचा, उदयन.. धन्यवाद.

डॉक ने सांगितलेल्या बाकी टेस्ट ( किडनी, डोळे, इतर इत्यादी) केल्या आहेतच. कोलेस्ट्ररॉल, शुगर दोन्ही आधीपासुनच बॉर्डरलाइन आहे. त्यामुळे तसेही खाण्यावर कंट्रोल ठेवणे होतेच.
मंजूडी, म्हणजे आनुवांशिकता हा मुद्दा महत्वाचा आहे तर.
एक महिन्याने नाही, माझ्या माहितीप्रमाणे तीन दिवस. >> हम्म. प्रत्येक औषधाप्रमाणे बदलत असेल का हे? सध्या दिलेले Eritel - AM 45 आहे.

रक्तदाब हा त्या वेळच्या मनस्थितीवर अवलंबून असतो >> हम्म. डॉक कडे बघुन टेन्शन येत असेल का ? Wink

कोणी डॉक्टर ही जी दोन प्रेशर असतात ( सामान्य माणुस वरचे आणि खालचे असे म्हणतो ती ) त्याबद्दल काही बेसिक लेव्हल चे सांगेल का? >>++

सावली आणि टोच्या.
सध्या मला लिहायला वेळ नाही.

तुम्ही ही साईट चेक करू शकता.
http://www.heart.org/HEARTORG/Conditions/HighBloodPressure/AboutHighBloo...
चांगली आहे.
ते वाचूनही काही प्रश्नं असल्यास विचारा.
मी वेळ होताच उत्तरे देईन.

सावली खरेच क्लिनिक ब्लड प्रेशर म्हणून नक्की असते. तशी टर्मच आहे. म्हणून आपल्याला काहीतरी प्रोसीजर मध्ये गुंतवून, इकडचे तिकडचे बोलून जरा रिलॅक्स करतात व प्रेशर घेतात.
स्ट्रोक हा एक महत्त्वाचे कॉप्लिकेशन आहे ह्या आजारात. त्या संब्ंधाने काळजी घ्यावी.

गोळ्या बदलुन वगैरे बघाव्या लागतात का? >>> काही काळाने ठराविक औषधाला शरीर इम्युन होऊ शकते. अशा वेळेस गोळी बदलावी लागते. इतरही कारणे असतील ती डॉ. लोक सांगतिलच.

डॉ. सल्याने गोळ्या घ्यालच.. व्यायाम आहार ई. पण योग्य तो बदल करा..
पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला hi BP आहे याची काळजी अजीबात करु नका.
गोळी घ्या,व्यायाम आहार ई. योग्य प्रकारे करा and just forget it. त्याची काळजी मात्र अजीबात करु नका.

८ महीन्यांपुर्वी अ‍ॅन्युअल चेक अप मधे १४०/८० असे रीडींग होते अन मॉनीटरींग सांगितले होते. ते फॉलो करत होतो. २-३ वेळेला तेच रीडींग कंटीन्यु होते. पण प्राणायाम, योगा सुरु केल्यावर दोन वेळा रीडींग १२०/७० असे आले. मग चेक करायचे सोडुन दीले. परवा दुसर्‍या पेशंट सोबत गेलो असता सहज चेक केले तर १७०/११० !! परत मॉनीटर करायला सांगितले. डोके फार दुखत होते म्हणून नंतर चेक केले तर १५०/१०० वर होते. मग त्या डॉ ने गोळी दिली अन एक दिवसानी परत चेक केले १४०/९० वर आले होते. आता त्या डॉ ने शांत झोपीसाठी अन बीपी साठी म्हणून १० गोळ्या दिल्या आहेत. एकदा गोळ्या घेतल्या तर त्या कंटीन्युच घ्याव्या लागतात का? पस्तीशीत हा रोग ह्याच गोष्टीचे जरा जास्त टेंशन आलेय की काय असं वाटतय.

मला श्रीयूचे म्हणणे पटते, डॉक्टरच जास्त घाबरवतात कधी कधी..
मी कोटकच्या लाईफ इन्शुरन्स च्या रुटिन मेडिकलसाठी २०१२ ला गेले तर १४०-९० बीपी आले, परत येऊन नेहमीच्या आजारांसाठी जायच्या डॉक्टरकडून केले तर १२०-८५ आले. मग रेग्युलरली करते घरी मशिन आणून.. कधी कधी वाढते (फार व्यायामही करत नाही मी) पण वाढले की डॉक्टरकडे जाऊन विचारले तर लगेच गोळी चालू करा म्हणतात.. आजकाल डॉक्टर लोक फारसे ज्ञान पाजळत नाहीत की रिस्क ही घेत नाहीत. नेहमी मॉनिटर करणे बेस्ट..
मी रोज १५ मिनिटे ओंकार न चुकता करते. त्याने बीपी नीट होते म्हणतात.

एकदा गोळ्या घेतल्या तर त्या कंटीन्युच घ्याव्या लागतात का? पस्तीशीत हा रोग ह्याच गोष्टीचे जरा जास्त टेंशन आलेय की काय असं वाटतय.>>>>>>> गोळ्या किती दिवस घ्यायच्या ते डॉक सांगतील त्याप्रमाणे फॉलो करा. टेंशन घेतलं तर बीपी अजुन वाढणार. विचारच करु नका. मीठाचं प्रमाण थोडं कमी करा आहारात.

पस्तीस ते साधारण पंचेशाळीस सत्तेचाळीस हा प्रखर ताणाचा कालखंड आहे. गोळी घ्या मीठ व पापड लोणची कमी खा. प्रोसेस्ड फूड मधून सोडिअम जाते ते लक्षात असूद्या. ध्यान योगा प्राणायाम औषधे. स्वतःकडे लक्ष द्या. सिगरेट ओढत असाल तर लगेच बंद करा. दारू कमी करा. शुगर चेक करा मधुमेह असल्यास डॉक्टरास सांगा. ऑल द बेस्ट.

कामाच्या ठिकाणी ताण असल्यास तो कमी करता येइल का ते नक्की बघा. त्रास होतो. लाइफ इज प्रेशस.
आणि तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही प्रेशस असता. म्हणून काळजी घ्या.

डीविनिता, असे असेल तर डॉक्टर बदलून पाहा. घाबरवत असतील किंवा त्यांच्या सल्ल्यात तथ्यही असेल. सेकंड ओपिनिअन घ्यावा. मी असेही डॉ. बघितले आहेत की त्यांनी स्वतःहूनच लगेचच गोळी सुरू करायची आवश्यकता नाही, आपण आणखी थोडे मॉनिटर करून डेटा जमवू आणि मगच काय ते ठरवू असे सांगितले होते. नोटः या केसमध्ये रक्तदाब (सिस्टॉलीक) किमान १२० ते कमाल १४८ पर्यंत होता.

मला श्रीयूचे म्हणणे पटते, डॉक्टरच जास्त घाबरवतात कधी कधी.. + १ हे पद्मविभूषण डॉ हेगड्यांच व्याख्यान ऐकलं तेही म्हणाले की डॉ तुमच्या मनात भरवून देतात आईवडिलांना आहे तर तुम्हाला होईल पण अनुवंशिकता हा एक वन ऑफ फॅक्टर आहे ... आज सगळ्या रोगांच मुख्य कारण बदललेली जीवनशैली व स्पर्धा...

अशा प्रश्नोत्तरातुन खरच सर्वांनाच माहिती मिळते. ते आवश्यकहि आहे.
मलाहि एक शंका दुर करायची होती. माझी एन्जिओप्ल्यास्टी झाली २००९ मधे. मेडिसीन, फिरण चालु आहे.प्राणायामहि करते. पण आज-काल थोड भरभर चालल कि, किंवा चालतांना बोलल कि थोडा दम लागतो. त्यासाठी काय कराव लागेल ? ओंकाराने किंवा अणुलोम- विलोमने फायदा होइल का? साधारणत ; किती वेळ करावा ? मार्गदर्शन केल्यास बरे होइल. धन्यवाद.

योगनिद्रा/शवासनही खूप फायद्याचे आहे. दीर्घश्वसन अनुलोम विलोम व ओंकार हे सगळ झेपेल इतकच करावं..

हायला १६०/९० हेच रिडींग गेल्या आठवड्यात आमच्या ऑफिसच्या मेडिकल चेक-अप वेळी माझे आले होते. माझे वय वर्षे ३६ आहे. कन्सलटन्ट डॉक्टरनी मला सांगितले की मला उच्च रक्तदाब असु शकतो तरी दर आठवड्याला रक्तदाब तपासण्याचा सल्ला दिला आणि जर प्रत्येकवेळी हेच रिडींग आले तरच गोळ्या चालू कराव्या लागतील असे सांगितले. जेवणात मिठाचे प्रमाण कमी करण्याचा आणि व्यायामाचा सल्ला दिला.

मी इतक्या गांभिर्याने घेतले नाही, पण आता दर शनिवारी रक्तदाब तपासणार.

१४०/८०नॉर्मली येतेच, बीपी चेक करताना आडवे झाले की बीपी थोडासा वाढतो, त्यामुळे ते वरचे सीस्टॉलीकचे आकडे दहा वीसने वाढतात. १५०च्यापुढे येत असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास असु शकतो.

प्रभा, तुमच्या हृदयरोग तज्ञ डॉ. चा सल्ला घ्या. दम लागणे वाढले तर check angiography करून stentची condition बघावी लागेल, २d echo इ. बघुन औषध योजना बदलावी लागेल.

दीप्स,
ती सायकल विकू नका.
लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आवश्यक आहे.
गोळी नेहेमी घ्यावी लागूही शकते.

इब्लिस, मी रोज न चुकता एक तास वॉक करतो गेली ५ वर्षे , गेल्या काही महीन्यात खाण्यातही बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. कॉलेस्ट्रॉल ऑलरेडी बॉर्डर लेवलला आहे. डॉ ने वजन ५-६ किलो कमी कर असे सांगितले आहे. मध्यंतरी काही महीने बीपी नॉर्मल ला आला होता (सु न आणि प्राणायामामुळे) त्यामुळे मला थोडी आशा आहे की गोळी कंटीन्यु करावी लागु नये तरीही बीपी मॉनीटर करीत राहीन अन रेग्युलर घ्यावी लागली तरी हरकत नाही.
सु न , सायकलींग केली तर चालेल ना ? (डॉ कडे सोमवारी जाणार आहे तेंव्हा विचारीनच.)