समर्थन...

Submitted by मी मुक्ता.. on 9 September, 2014 - 01:41

किती किती हिरीरीने समर्थन केलं मी माझ्या लहान सहान दु:खांचं..
त्यांची बाजू मांडली.. त्यांच्यासाठी भांडले..
स्वीकार केला तरी आवाज उठवणं सोडलं नाही..
खुलेपणाने मान्य केलं त्यांचं अस्तित्व
आणि कुरवाळत राहिले त्यांना..
एकटेपणी..
सर्वांसमक्षही..
.
पण आता श्वासाश्वासात अलगद वाहत रहावं,
आयुष्यभर तळहातावर जपावं असं दु:ख समोर आलं असताना,
रात्रीच्या नीरव एकांतात
हुंदकाही न फुटू देता गाळलेल्या मूक अश्रुंशिवाय,
त्याच्या समर्थनार्थ माझ्याकडे काहीच नाही..
काहीच नाही..
-------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

' पाऊस '

पाऊस,
कधी श्रावणातील उन्हांत
सर्व पानांत अन् फुलांत
कधी त्या बेधुंद सरींत
जणू तूझाच आभास

पाऊस,
कधी तुझ्याच सोबतीत
फक्त आपलाच …
कधी प्रेमाचा तर कधी हळवां
रोमरोमांत, डोंगरवनांत

पाऊस,
कधी तुझ्याच आठवणीत
दूर स्वप्नांच्या गावांत
कधी व्याकूळ विरहांत
बरसे मनसोक्त डोळ्यांत

पाऊस,
कधी तुझ्या अंगणात
त्या नि:शब्द सरत्या रात्रींत
दिसे अगदी शांत नितांत….
भासे जणू मौनातील साद !!!