आता कशाला शिजायची बात -- सुलेखा -- " अबूझ " [तिखट पदार्थ ]

Submitted by सुलेखा on 7 September, 2014 - 06:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

विदेशी आणि देशी [त्यातही आपल्या मराठमोळ्या ]पद्धतीची सांगड घालून "अबूझ "ची निर्मिती केली आहे. पौष्टीकता भरपूर आहे त्याशिवाय चवीला चटकमटक त्यामुळे लहान मोठ्या सगळ्यांना आवडेल पूर्व तयारी केलेली असली तर अबूझ लगेच तयार करता येतील..
साहित्य :--
Abooz saahitya.JPG
अबूझ साठी डाळीचा चटका व सॅलड तयार करावे लागेल.
१] डाळीचा चटका बनविण्यासाठी :--
१] १ वाटी चणाडाळ दोन तीन वेळा धुवून पाण्यात किमान २ तास भिजत घालावी.या पाण्यात अर्धा टी स्पून हळद घालावी.म्हणजे भिजलेल्या डाळीला छान पिवळा रंग येईल.
२]२ किंवा ३ हिरव्या मिरच्या .बारीक चिरुन घ्याव्या.
३] चवीप्रमाणे मीठ. साखर.
४] २ चमचे लिंबाचा रस.
५]२ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
६]४ चमचे खोवलेले ताजे खोबरे
७] २ चमचे तेलाची फोडणी.या फोडणीत १/२ टीस्पून मोहोरी, १/२ टी स्पून जिरे, १/२ टी स्पून हिंग व १/४ टी स्पून हळद घालावे. ही फोडणी थंड करून डाळीच्या चटक्यावर घालायची आहे.

२] सॅलड साठीचे साहित्य :--
१] १ गाजर -किसणीवर किसून घ्यावे.
२]अगदी बारीक उभी चिरलेली पानकोबी.साधारण १ वाटी असावी.
३]१/२ शिमला मिरची -अगदी बारीक चौकोनी चिरुन घ्यावी.
४[ २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर .
५]२ चमचे लिंबाचा रस.
६] चवीप्रमाणे मिरे पूड ,मीठ. साखर

३] ब्राऊन ब्रेड साइस ४ नग.

क्रमवार पाककृती: 

भिजलेल्या चणा डाळीला रोवळीत टाकून त्यातील सर्व पाणी काढून टाका.
ही डाळ मिक्सर मधे जाडसर वाटुन घ्या.
वाटलेल्या डाळीत ओले खोबरे , हिरवी मिरची.कोथिंबीर्,मीठ साखर व लिंबाचा रस घालुन छान एकत्र करा.त्यावर आधी तयार केलेली तयार फोडणी घालुन सर्व मिश्रण छान ढवळुन घ्या.
डाळीचा चटका तयार झाला.
आता सॅलड साठी एका बाऊल मधे सॅलडचे साहित्य एकत्र करा.म्हणजेच गाजर-पानकोबी-शिमला मिरची-कोथिंबीर-मिरे पूड -मीठ-लिंबाचा रस-साखर एकत्र करा चमच्याने कालवुन घ्या.
आता ब्राऊन ब्रेड च्या स्लाईस वर एका बाजुला चमच्याने डाळीचा तयार चटका पसरवा .त्यावर सॅलड पसरवा. अशा सर्व स्लाईस तयार करा. प्रत्येक स्लाईस मधुन कापा. .
"अबूझ" तयार आहेंत.सजावटीसाठी गाजराच्या चकतीची फूले तयार करा. प्लेट मधे "अबूझ "ठेवून त्याभोवती ही गाजराची फुले ठेवा.
abooz tayaar.JPG
बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व मंडळींना "अबूझ"खायला द्या.

माहितीचा स्रोत: 
मायबोली गणेशोत्सव २०१४ .
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो मस्तय. कोबी मस्त चिरला आहात. पर्सनली मला हे सँडविच जास्त आवडलं नाही कारण सगळ्या भाज्या कच्च्या आहेत. स्पर्धेकरता केलंत म्हणून ठीक पण एरवी तव्यावर शॅलोफ्राय किंवा भाजून चालेल का?

चिरलेला कोबी फार भारी दिसतोय.

मला स्वतःला हे खायला आवडणार नाही.
मी डाळ नुसती खाईन आणि बाकीचं सॅलड ब्रेड टोस्टवर लावून खाईन Wink