व्हीस्लिंग वुड अ‍ॅन्ड हॅप्पी मशरुम बाय अनन्या

Submitted by विनार्च on 6 September, 2014 - 03:39

Whistling Wood

IMG_20140905_184029-001.jpg

Happy Mushroom

IMG_20140901_172059-001.jpg

ही माझ्या लेकीने नुकतीच केलेली वॉटर कलर पेंटींग्स आहेत. ही चित्रे पाहील्यापासून मी चिंतीत झाले आहे...काय कराव यापुढे या मुलीचं? हा मोठ्ठा प्रश्न पडला आहे. ह्यापुढील वाटचाली साठी तिला गुरुची गरज लागेल असं मला वाटते आहे. कोणत्या क्लासला घातले तर ती अशी वेळेच्या बंधनात बांधून घेणारी मुलगी नाही. ती चित्र फक्त तेंव्हाच काढते जेव्हा न जी चित्र तिला काढाविशी वाटतात....कुणी सांगितलं आणि तिने काढलं अस कधीच होत नाही...याचा पुरावा तिची शाळेची चित्रकलेची वही...जी कायम अपूर्ण अन गचाळ चित्रांनी भरलेली असते.

समजावून बसायला लावल जरी क्लासला तरी आमच्या इथे जो प्रसिद्ध क्लास आहे, ते सर मुलांना चित्र कॉपी करायला देतात न त्यातला चुका दाखवून हुबेहुब काढायला लावतात. त्यांचे विद्यार्थी नो डाऊट खूप सुंदर चित्रं काढतात पण सगळ्यांची चित्र एका साच्यातुन काढल्या सारखी दिसतात. त्यामुळे समजत नाही आहे अनन्याला त्यांच्या हवाले करावं की नाही. आम्ही दोघ (मी न तिचे बाबा) चित्रकलेच्या बाबतीत तज्ञं लोक नाही आहोत.
तिची चित्रकला तुम्हा माबोकरांच्या सल्ल्यानेच बहरली आहे... सो आता ही हक्काने मार्गदर्शन करा ही विनंती Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय अफाट आहे मुलगी!
त्या व्हिसलींग वुडसमधला पिवळा आणि हॅपी मशरूमच्या पायथ्याचा कोलाजसारखा रंगं भारीच .
अश्या मुलाना योग्य गुरूच हवा.
केवळ दिशा दाखविणारा. कॉपी करून हात धरून चित्रापर्यंत सोडणारा नको.

चिनूक्स फार सुंदर लेख आहे... धन्यवाद!
तिच्या चित्रातल्या चांगल्या गोष्टी अन सुधारणा दाखवण्यासाठी लागणारा गुरू शोधते आहे तुमच्या माहिती मध्ये कुणी असेल तर सांगा, प्लीज Happy

अगदी व्यावसायिक स्तरावरची आहेत हि चित्रे.
तिच्यातला उस्फुर्तपणा असाच राहिला पाहिजे. सध्या शाळेतल्या परिक्षा देऊ दे, नंतर याच क्षेत्रात करीयर करण्याएवढा रस राहिला तर शाळेनंतरचे शिक्षण तसे घेता येईल. तोपर्यंत तिला वेगवेगळी प्रदर्शने बघू देत.

भारतात चित्रकलेवरची अनेक पुस्तके उपलब्ध आहेत, ती पण वाचू देत तिला. आणि तिला जे काही काढावेसे वाटेल, जे माध्यम हाताळावेसे वाटेल ते करू द्या. तिची चित्रे केवळ मायबोलीवरच नव्हे तर इतर चित्रकलाविषयक वेबसाईटस वर पण अवश्य द्या. तिथले प्रतिसाद तिला बघू द्या.

जहांगीरमधे प्रदर्शने असतातच शिवाय त्या गॅलरीच्या बाहेर अनेक चित्रकार बसलेले असतात. ती चित्रे अवश्य दाखवा. त्या चित्रकारांना भेटू द्या. तिथल्याच म्यूझियममधेही अनेकानेक उत्तम पेंटींग्ज आहेत.

चनस,अल्पना,जयु,स्वस्ति,कविता धन्यवाद Happy

साती , दिनेशदा, सविस्तर प्रतिसाद दिल्या बद्द्ल खूप धन्यवाद.... सध्या जमतील तितकी चित्र प्रदर्शन दाखवायच ठरवलय..न माध्यम सगळी आणुन दिलेली आहेतच...पुस्तक ही बरीच आहेत तिच्याकडे, जोडीला इंटरनेट आहेच.
अजुन काही करायला हवय का?

प्रोफेशनल चित्रकराने काढल्यासारखे वाटताहेत वरील दोन्ही चित्रं.
विनार्च तुमच्या मुलीत प्रचंड पोटेंशियल आहे, तिला खुप खुप शुभेच्छा !

वॉव मस्त. आवडले.
मायबोलीकर अजय पाटील आहेत ना जलरंगात काम करणारे ते सुचवू शकतील शिक्षक.
तुमच्या एरीयात चित्रकारांचे मीट अप ग्रूप आहेत का जे शनि-रविवारी वगैरे भेटतात आणि एकत्र चित्र काढतात, अश्या ग्रूपमधे तिला नेवू शकता कदाचित तिला आवडेल.

क्लासला घालायचे झालयास तिथल्या शिक्षकांशी आधी बोलुन घ्या. टेक्निकॅलिटिज /अ‍ॅकॅड्मिक ड्रॉईंग /पेंटींग शिकवण्यापुरते कॉपी वर्क ठिक मात्र बाकी चित्र तिला हवी तशी काढु द्या . त्यात काय टेक्निकली काय सुधरणा करता येतिल ते डीस्कस करा.

सुरेख रंगचित्रे ! आवडली ! तिच्या भवितव्याच्या दृष्टीने चित्रकार अजय पाटील यांचा सल्ला मोलाचा ठरावा !

दोन्ही चित्र सुरेख आली आहेत..

प्रत्यक्ष चित्रं काढण्यासाठी नाही तरी योग्य माध्यमासाठीचे योग्य टेक्निक समजण्यासाठी आणि शिकण्यासाठी कुठल्यातरी क्लासची गरज नक्की आहे.. लवकर तिच्यासाठी चांगला गुरु मिळो..