केदार१२३ मलाही कोतबो मी एक झाड

Submitted by केदार१२३ on 1 September, 2014 - 12:21

माय्बोलीवरील मलाही कोतबो हा धागा पाहीला आणि वाटल आपण ही लेखनाचा विषय होउ शकतो का? मग मी विचार केला जर भारत भुषण , विश्वजीत प्रदीप कुमार ही म.न्डळी प्रत्यक्ष चित्रपटात काम करू शकतात शारदा , हीमेश रेशमीया (टोपी न घालता) स.न्गीत देण्याचा आणि (टोपी घालून) गाऊ शकतो आणि प्रत्यक्ष अभिनय करायची चेष्टा करू शकतो तर मी लिखाणाचा विषय का नाही होऊ शकत (ह्या सर्वात मी उजवा आहे नक्कीच , मी उजवा आहे म्हण्जे बाकीचे डावे आहेत असे नाहीत (एक पॉलीटीकल करेक्शन ) कि.न्वा 'वाम' मार्गी आहेत असेही नाही ( उगाच नसते वाद नकोत )

तर सा.न्गायचा मुद्दा हा की मी एक झाड मी 'झाडू'न सगळ्या चित्रपटात भुमीका केलेल्या आहेत . तुमच्या त्या जुन्या चित्रपटातील देवीका राणी , कानन बाला पासून मलाच लटकून नायकाला आळवत राहील्या आणि मधुबाला नरगीस, उषा किरण (एक जाज्वल्य अभिमान ) वैजय.न्ती माला माझ्या आडूनच नायकाला साद घालत राहील्या . त्याला प्रतुत्तर म्हणून तुमचे ते नायक 'वो कोन छुपता है झाडीयो के पीछे म्हणत नायीकेला आळवत राहीला ( प्लीज नोट मी आवळण म्हणत नाहीये ) परतीने टीरी र टी ट टीरी र टी ट करत नायकाला कधी माझ्या उजवी कडून तर कधी डावी कडून दर्शन देत राहीली . गाणी गाजली सिनेमा गाजला पण मी मात्र आहे तीथेच राहीलो.

तुमचा तो देवा.ना आन.न्द देणारा नायक दुडकत दुडकत सायकल चालवत केसाचा को.न्बडा आणि शर्टाची ईस्त्री सा.न्भाळत खोया खोया चा.न्द म्हणत गात राहीला . कधी कधी मी जीव झाडा.न्च्या फा.न्द्यात धरून बसायचा जर का हा को.न्बडा आय मीन नायक मला येऊन चुकून आदळला आणि त्याचे उरलेले दात पडले कि.न्वा मान आणि खा.न्दे खरोखरच लचकले तर मी मात्र उगाच लाखो तरुण आणि तरुणी.न्च्या शापाचा धनी व्हायचो. पण सुदैवाने तस काही न झाल्यानी मी वाचलो आणि आहे तीथेच राहीलो

तुमचा तो 'राज' बि.ण्डा नायक माझ्याच खा.न्द्यावर बसून स.न्गम होईल का म्हणून विचारत राहीला . नायीकेने नाही म्हटले तरीही

काल परवा सा.न्गायच तर तुमचा तो पोत्यातल्या चार्ली चाप्ल्नीन सारखा दिसणरा रणावर धीर सा.न्डणारा नायक ( राज्बि.न्ड्याचा मुलगा राज बी.न्डोक ?) तू कहा मै कहा म्हणून मला येऊन धडकला आणि माझ्या जागेवर उभा राहीला आणि पुढचे सगळे गाणे मीच निभावले ( लोका.ना फरकच कळला नाही ) चित्रपट गाजला पण माझ्या कामाची दखलच घेतली नाही ( बट नो रीग्रेटस )

पण आजकाल माझा चार्म कमी झालाय . नायक नायीका माझ्या मागे रहात नाहीत माझ्या पुढे उभे रहातात आणि मी ओशाळून जातो. माझ्या पुढे लोळतात काय कि.न्चाळतात काय काही विचारू नका (विचारल नाही तरी मी सा.न्गतोय ) आणि आजच्या नायिका तर बापरे . जीथे आजकाल नायक नायीका.ना चरित्र उरलेल नाहीये तीथे माझ्या सारख्या चरीत्र अभिनेत्याना कोण विचरणार हो

सा.न्गायचा उद्देश हा की मी अजून उभा आहे . आहे तीथेच उद्याही उभा राहीन . माझी दखल घेतली नाही तरी. मला पुरस्कार मिळाला नाही तरीही . कारण मी अनेक युगा.न्चा साक्शीदार आहे. मी अनेक चित्रपट गाजवले आहेत आणि मला खात्री आहे चित्रपटात जुने युग परत येणार आहे आंणि मी पुन्हा उभा रहणार आहे नवीन भुमिका निभावायला कुठच्या तरी नव्या युगाचा पुन्हा साक्शीदार व्हायला

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>सा.न्गायचा उद्देश हा की मी अजून उभा आहे . आहे तीथेच उद्याही उभा राहीन . माझी दखल घेतली नाही तरी. मला पुरस्कार मिळाला नाही तरीही . कारण मी अनेक युगा.न्चा साक्शीदार आहे. मी अनेक चित्रपट गाजवले आहेत आणि मला खात्री आहे चित्रपटात जुने युग परत येणार आहे आंणि मी पुन्हा उभा रहणार आहे नवीन भुमिका निभावायला कुठच्या तरी नव्या युगाचा पुन्हा साक्शीदार व्हायला<<<

मस्त!

देव आनंद धडकून त्याचे आणखीन दात पडण्याची कल्पना भारी Biggrin