अंबोली...एक निसर्गरम्य ठिकाण...

Submitted by फारुक सुतार on 22 August, 2014 - 06:14

नुकतेच अंबोली निसर्ग दर्शन घेउन आलो.. अफलातुन निसर्ग.. उनपावसाचा खेळ, हिरवळीने नटलेले डोंगर, दरी, खोरे आणि त्यातुन अलगद सरकणारे दाट धूके... कोसळणारे धबधबे. सोबतीला चहा, कांदाभजी, वडापाव आणि चक्क मैगी देखील...

मला आवडलेले काही प्रचि इथे टाकत आहे...

प्रचि १: सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन
1.jpg

प्रचि २: सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन
2.jpg

प्रचि ३: एम. टि. डी. सी. ग्रीन व्हेली रीसोर्ट प्रवेशद्वारामधून दिसणारे द्रुश्य.
3.jpg

प्रचि ४: नांगर्तास धबधबा
4.jpg

प्रचि ५: कावळेसाड पॉइन्ट
5.jpg

प्रचि ६: कावळेसाड पॉइन्ट टेपाड
6.jpg

प्रचि ७: अंबोली मुख्य धबधबा १
7.jpg

प्रचि ८: अंबोली मुख्य धबधबा २
8.jpg

प्रचि ९: अंबोली मुख्य धबधबा ३
9.jpg

प्रचि १०: अंबोली मुख्य धबधब्याच्या अवती भवती
10.jpg

प्रचि ११: अंबोली मुख्य धबधब्याच्या अवती भवती
11.jpg

प्रचि १२: एम. टि. डी. सी. ग्रीन व्हेली रीसोर्ट
0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२८ ऑगस्ट रोजी आंबोलीमार्गे कोकणात उतरलो, तेव्हा धबधब्याचे आणि आजु बाजुच्या विहंगम निसर्गाचे दर्शन झालेच. पण त्याबरोबर जाणवलेली आणि मनाला उद्विग्न करुन गेलेली दृश्ये म्हणजे ईतस्ततः पसरलेला प्लास्टीक कचरा, दारुच्या बाटल्या, खाण्याचे पदार्थ. असो. आपल्याकडील पर्यटकांच्या जाणिवाच तेव्ह्ढ्या असाव्यात.

भ्रमरा, आंबोलीत हल्ली हे खुप वाढलेय. यासोबत अजुन एक वाईट ट्रेंड वाढतोय तो म्हणजे गाडीत मोठ्याने गाणी लावुन बाहेर जोरात नाचकाम सुरू करणे. धटींगणासारखे दिसणारे लोक सुमो भरुन येतात, कुठेही पाणी दिसले की गाडी लावुन सुमोतले लाऊडस्पिकर्स फुल सोडुन, अंगावर फक्त हाफ चड्डी ठेऊन नाचायला लागतात. इतके गलिच्छ दिसते हे सगळे. आणि हे फक्त घाटातच नाही तर आता गावातही येऊन पोचलेत हे लोक. अशा वेळी घराबाहेर एकटीने पडायचे म्हणजेही घाबरतात बायका.

ऋन्मेऽऽष धन्यवाद! भ्रमर आणि साधना तुम्ही म्हणालात तोही अनुभव मुख्य धबधब्या जवळ घेतला आम्ही अंबोलीत... त्यामुळे मला आणि सौंना धबधबा एंजॉय करता नाही आला...

त्यामुळे मला आणि सौंना धबधबा एंजॉय करता नाही आला...

मी त्याच गावची असुनही अजुन एकदाही त्या धबधब्यात उतरले नाहीय याच कारणामुळे.

फोटोंवर Excess Editing झाल्यामुळे object चा feel गेल्यासारखं वाटतो.

फारुक:
मायबोलीवर स्वागत..
अत्यंत भन्नाट फोटोज..
भटकंती - फोटूग्राफी - ब्लॉगिंग हे वेड उत्तरोत्तर वाढतंच जावो, अश्या शुभेच्छा!!!

धन्यवाद! सुमित!

<<भटकंती - फोटूग्राफी - ब्लॉगिंग हे वेड उत्तरोत्तर वाढतंच जावो, अश्या शुभेच्छा!!!>>

आपण आमचे प्रेरणास्थान आहात, तुमच्या आशिर्वादाने पुढेही मायबोलिवर लिहित राहिन... कृपा असावी... Happy

Pages