अंबोली...एक निसर्गरम्य ठिकाण...

Submitted by फारुक सुतार on 22 August, 2014 - 06:14

नुकतेच अंबोली निसर्ग दर्शन घेउन आलो.. अफलातुन निसर्ग.. उनपावसाचा खेळ, हिरवळीने नटलेले डोंगर, दरी, खोरे आणि त्यातुन अलगद सरकणारे दाट धूके... कोसळणारे धबधबे. सोबतीला चहा, कांदाभजी, वडापाव आणि चक्क मैगी देखील...

मला आवडलेले काही प्रचि इथे टाकत आहे...

प्रचि १: सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन
1.jpg

प्रचि २: सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन
2.jpg

प्रचि ३: एम. टि. डी. सी. ग्रीन व्हेली रीसोर्ट प्रवेशद्वारामधून दिसणारे द्रुश्य.
3.jpg

प्रचि ४: नांगर्तास धबधबा
4.jpg

प्रचि ५: कावळेसाड पॉइन्ट
5.jpg

प्रचि ६: कावळेसाड पॉइन्ट टेपाड
6.jpg

प्रचि ७: अंबोली मुख्य धबधबा १
7.jpg

प्रचि ८: अंबोली मुख्य धबधबा २
8.jpg

प्रचि ९: अंबोली मुख्य धबधबा ३
9.jpg

प्रचि १०: अंबोली मुख्य धबधब्याच्या अवती भवती
10.jpg

प्रचि ११: अंबोली मुख्य धबधब्याच्या अवती भवती
11.jpg

प्रचि १२: एम. टि. डी. सी. ग्रीन व्हेली रीसोर्ट
0.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर ...आंम्ही पण मागच्या वर्षी गोव्याला जायच्या आधी १ दिवस मुक्काम केलेला अंबोलीला..निघवत नव्ह्त..

हे पाहिलं छान !कैमरा छान फोटोंचे कोन छान .
सुंदर आख्यान बेफिकीरीत वाचले तेही छान तेही इथेच लिहितो .

station is SAWANTWADI ROAD RAILWAY STATION

savantvadihun 10 km malavali gaavi he station aahe. tithun sawantvadi st stand laa yaayache 120-150 rupaye ghetaat rikshavaale. sawantwadi station ase mhatlyane ugich sawantwaditach railway station aahe asaa bhaas nirmaan hoto.

savantvadihun 10 km malavali gaavi ... >>> ... थोडी दुरुस्ती करतोय. रेल्वे-स्टेशन ज्या गावात आहे त्या गावाचं नाव 'मळेवाड' असे आहे... Happy

Railway station "Malgaon" ya gavi ahe, tethun Sawantwadi la janyasathi ST buses asatat, bus chi frequency pan jast ahe.Ambolit thod pudhe galya "Hiranyakeshi" mahnun chhotas gav ahe tithe Shankar Mandir asun garam panyachi kunde ahet

धन्यवाद! मंडळी प्रतिसादाबद्दल.

@साधना: तुमचे गाव खुपच सुंदर...तुम्ही खरेच भाग्यवान आहात.

@बेफिकीर, सीमा२७६, दिनेश, रश्मी..एस आर डी, झकासराव, विवेक, कंसराज, स्मिता: धन्यवाद! फोटो आवडल्याबद्दल आणि इतर महिती पुरवल्याबद्दल..त्याप्रमाणे मजकूरात बदल केला आहे..

आम्ही सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशनला सकाळी ६:१५ उतरुन सावंतवाडी एस टी स्टँड गाठले (८ किमी)..तेथुन पुढच्या एस टीने अंबोली (३०किमी)... सकाळी ८ च्या सुमारास एम. टि. डी. सी. ग्रीन व्हेली रीसोर्टला पोहचलोही होतो... सावंतवाडी हे शहरही सूंदर आहे...

अंबोलीमधे लाकडी खेळणी भेटली नाहित...स्टँड्समोर एक दुकान होते पण ते दोन दिवस बंद होते...

मस्त फोटो. फिल्टर वापरले आहेत का?

ते एम. टि. डी. सी. रेसॉर्ट फोटोत मस्त दिसतय पण प्रत्यक्षात खूप बेकार होते आम्ही गेलो होतो तेंव्हा.

धन्यवाद! जिप्सी, माधव...

एम. टि. डी. सी. रेसॉर्ट मधे बेसिक गोष्टी व्यवस्थित आहेत... मला तेच एकमेव चांगले वाटले...

फोटो मधे फिल्टर वापरलेले नाहीत... शार्पनेस आणि कलर बैलेन्स एड्जेस्ट केले आहेत..

छान प्रचि.
अंबोलीला बर्‍याच वेळां गेलों - अर्थात खूप आवडतं म्हणूनच. पण 'कावळेसाद'ला मात्र प्रथमच गेल्या वेळीं गेलो. फारच सुंदर देखावा ! तिथं जायचा रस्ता अजूनही तसाच खूपच कच्चा व अडचणीचा आहे का ? वाटेत दुतर्फा झुडपांवर छोटीं फुलं खच्चून आलेलीं दिसत होतीं. आमच्यापैकींच कुणींतरी त्या फुलाना ' कावळे फुलं' म्हणतात व त्यावरून ' कावळेसाद 'नांव पडल्याचं सामितलं. खरं कीं खोटं हें कुणीतरी आंबोलीकरच सांगतील.

oh sadhana's amboli
beautiful!!!

अंबोलीमधे लाकडी खेळणी भेटली नाहित...स्टँड्समोर एक दुकान होते पण ते दोन दिवस बंद होते...>>>... लाकडी खेळण्यांची मुख्य बाजारपेठ ही 'सावंतवाडी'च आहे. पुनः कधी तुमचे जाणे झालेच तर 'चितारआळी' लक्षात ठेवा. तिथे(च) तुम्हाला लाकडी खेळणी (भरपूर व्हरायटी सह) मिळू शकतील. (सावंतवाडीच्या 'मोती-तलावा'समोरचा रस्ता - श्रीराम वाचन मंदीराच्या शेजारून जाणारा, सरळ 'चितारआळी' मधेच जातो. चालत जायला जास्तीत-जास्त ५ खूप झाली...)
Happy

@भाऊकाका...
... आमच्यापैकींच कुणींतरी त्या फुलाना ' कावळे फुलं' म्हणतात व त्यावरून ' कावळेसाद 'नांव पडल्याचं सामितलं...>>>... खरां सांगाचां तर 'कावळे-साद' ह्यो पॉईन्ट म्हणजे निसर्गाचो चमत्कार आसा. दर्‍या-खोर्‍यातल्या घनदाट झाडी, जंगलांमुळे या परीसरात 'कावळ्यां'चा वास्तव्य खूप होतां. दिवस उजाडल्यावर एकादो कावळो 'काव-काव' करुन इतरांक जागो करी, आणि त्येच्या ओरडण्याक बाकीचे कावळे (आणि इतर पक्षी) 'कलकलाट' करुन 'प्रतिसाद' देत, म्हणान त्या परीसराचां नाव 'कावळे-साद'... ही पहीली (ऐकीव) गोष्ट
दुसरी गोष्ट... या परीसरात घनदाट जंगलामुळे 'हवेचो दाब' (समुद्र-सपाटी पासून ऊंचावर असान देखिल) बर्‍यापैकी जास्त असायचो. सहाजीकच कावळ्यांनि 'काव-काव' केल्यावर (किंवा इतर कुठल्याही पक्ष्यान, प्राण्यान आवाज केल्यावर) तेचो 'प्रतीध्वनी (एको)' आयकाक मिळायचो; म्हणून या जागेचां नांव 'कावळे-साद' पडला असण्याची शक्यता आसा... लेखी पुरावे काहीही नाय आसत...
माफ करा थोडं विषयांतर (मालवणी बोली-भाषेत) झालं... Happy

धन्यवाद! भाऊ, वर्षू नील, मनीष, रंगासेठ आणि विवेक देसाई यांचे विशेष आभार, चांगली माहिती दिल्याबद्दल... सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन वर सकाळी ६:३० च्या दरम्यान पोहोचल्याने व अंबोली गाठायचे होते म्हणून सावंतवाडी पहाता नाही आली आणि खेळणी देखिल घेऊ शकलो नाही... पुढच्या वेळेस तुम्ही सुचवले आहे तेथेच खेळणीसाठी जाईन... आभार!

सावंतवाडीच्या एका तलावाचा मी एस टी मधून, फोटो टिपला होता तो इथे टाकत आहे... हा तलाव कुठला आहे?

प्रचि (सावंतवाडीचा तलाव):

13.jpg

Pages