ज्या क्षणी मी थांबलो, ती थांबली .....

Submitted by जयदीप. on 20 August, 2014 - 13:00

ज्या क्षणी मी थांबलो, ती थांबली...
सावलीने साथ नाही सोडली

स्वप्न माझे जागलेले रात्रभर ...
अन् पहाटे झोप येऊ लागली

लोपल्या पाऊलवाटा शेवटी
का तुझी माझ्यात वर्दळ थांबली?

लागुदे जर ऊन आहे लागते ...
सावलीमध्ये हरवते सावली!

रोज आकाशात तारा जन्मतो...
काजव्याने कात असते टाकली!

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोज आकाशात तारा जन्मतो...
काजव्याने कात असते टाकली!<<< सुंदर

स्वप्न माझे जागलेले रात्रभर ...
अन् पहाटे झोप येऊ लागली

रोज आकाशात तारा जन्मतो...
काजव्याने कात असते टाकली

छान वाटली वाचायला. ब-याच दिवसांनी पद्याचा फील आला गझलेत.

छान

ज्या क्षणी मी थांबलो, ती थांबली...
सावलीने साथ नाही सोडली

वा वा आवडला हा सकारात्मक विचार .

स्केचेस आवडले.
आपण अनंत ढवळे, चित्तरंजन भट, आणि प्रसाद लिमये ह्यांचे लिखाण जरूर वाचावेत.
चित्रात्मकतेकडे आपली ओढ जाणवते.
शुभेच्छा.

छान.

लोपल्या पाऊलवाटा शेवटी
का तुझी माझ्यात वर्दळ थांबली? [...दुसर्‍या ओळीतून आशयाला मस्त हाईट मिळत आहे ती वाढवता येइल असे वै.म}

रोज आकाशात तारा जन्मतो...
काजव्याने कात असते टाकली!<<<,हे २ जास्त आवडले

ओळ आवडली >>.सावलीमध्ये हरवते सावली! <<,

दुसर्‍या शेरावरून माझा एक शेर आठवला

पहाटे पहाटेच झोपूनही....
सकाळी सहा वाजणे हे तुझे

धन्यवाद

अवांतर : प्रत्येक शेर चांगला करणे आणि एक अख्खी गझल चांगली करणे ह्यात बराच फरक असतो असे मला वाटते . आपणही आवश्यक वाटल्यास ह्या बाबीचा विचार करावा असे वाटते (तुमच्या ह्या गझलेवरून/इतर .. म्हणत नाही आहे मी... एकंदरच 'गझल' बाबत म्हणत आहे कृ. गै न )
धन्यवाद

सर्वांचे मनापासून आभार

वैभव सर : मला लक्षात येतंय बहुधा तुम्ही काय म्हणताय ते

या पुढे नक्की प्रयत्न करीन

__/\__

स्वप्न माझे जागलेले रात्रभर ...
अन् पहाटे झोप येऊ लागली

लोपल्या पाऊलवाटा शेवटी
का तुझी माझ्यात वर्दळ थांबली?

वा व्वा !