Submitted by मनिषा लिमये on 20 August, 2014 - 22:51
ठाण्यात मखराचं साहित्य कुठे मिळेल?
म्हणजे थर्माकोल पासून ते कागदांपर्यन्त सगळंच हवंय.
[हो दरवर्षी इकोफेंडलीच असतं पण यंदा लेकासाठी थर्माकोलचंच करायचंय. ]
तेव्हा प्लिज कोणाला माहीत असेल तर जरा शेअर कराल का?
तसं जांभळी नाक्याला बघणार आहे पण आणखीही कुठे चांगलं मिळत असेल मखराचं साहीत्य तर सांगा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खारकर आळीत 'विकम'. विकम बुक
खारकर आळीत 'विकम'. विकम बुक डेपो समोरच त्याचे मखर साहित्याचे दुकान आहे. थर्माकोल शीट्स, खांब कळस, जाळ्या, विविध प्रकारचे कागद, रंग असे सगळे मिळेल तिथे. बाहेर पेक्षा २-४ रुपये स्वस्त पण आहे.
माधव, मी पण ठाणे बाफ वर
माधव, मी पण ठाणे बाफ वर 'विकम'चंच नाव दिलंय तिला
मी गेले होते तिथे इकोफ्रेंडली रंग आणायला. तेवढे मात्रं तिथे नाही मिळाले. त्यांच्याकडे अॅक्रेलिक रंगच होते. जीवन ज्योती समोरच्या दुसर्याच एका खेळण्यांच्या दुकानात मिळाले.
शक्य असेल तर प्लीज थर्माकोल
शक्य असेल तर प्लीज थर्माकोल नका वापरु.
थर्माकोलच्या जेवणाच्या प्लेटस माझ्या डोक्यात जातात.
पर्यावरणाचा विचार करा.
आरती, तिने वर लिहिलंय की
आरती, तिने वर लिहिलंय की नेहमी ती इकोफ्रेंडलीच मखर करते. ह्या वर्षी थर्माकोलचंच करायचंय तिला म्हणजे काही कारण असेल.
केश्विने लिहिलंय ना उत्तर
केश्विने लिहिलंय ना उत्तर ठाणे बाफवर? नवा बाफ कशाला उगाच त्यासाठी?
मखराचं/ सजावटीचं साहित्य सध्या कुठल्याही स्टेशनरीच्या दुकानात मिळेल. विशेष शोधाशोध करायचीही गरज नाही. दुकानाबाहेरपर्यंत आलेला असतो सगळा पसारा. सहज कळतं त्यावरून की इकडे गणपतीचं सामान मिळेल.
विष्णूनगर जंक्शनला राजा स्टेशनरीकडे रास मांडून ठेवलेली असते.
@मंजुडी, केश्विने लिहिलंय ना
@मंजुडी,
केश्विने लिहिलंय ना उत्तर ठाणे बाफवर? नवा बाफ कशाला उगाच त्यासाठी?<<<<<मंजुडी आधी हा बाफ उघडला आणि त्यानंतर ठाणे बाफवर टाकलंय. आणि सगळेच जा ठाणे बाफ बघतातच असं नाही ना आणि तिथलम उत्त्तर काही वेळा भराभर इतर पोस्ट पडल्या तर वाहुन जातं त्यामुळे मला नाही जमलं लगेच बघायला तर.... म्हणून हा स्वतंत्र बाफ . चालेल ना?
की ठाणे बाफवर टाकलं की स्वतंत्र बाफ असू नये असा काही माबोचा नियम आहे . म्हणजे माझ्या माबोवरच्या 8 वर्ष 2 आठवडे या काळात असा काही नियम असल्यास माझ्या तरी ऐकिवात नाही.
दुसरं म्हणजे कुठल्याही स्टेशनरीमधे मिळेलंच पण मी मुद्दाम म्हटलंय की . "आणखीही कुठे चांगलं मिळत असेल मखराचं साहीत्य तर" ते वाच प्लिजच.......आणि त्य्याप्रमाणे माधव आणि अश्वीनीनी खारार आळी सांगितलं अगदी दुकानाच्या नावासकट.
धन्यवाद माधव आणि अश्वीनी
@आरती तुम्हाला अश्वीनीनी उत्तर दिलय वर , मला आणखी वेगळं सागायचं नाहीये कारा मी माझ्या पहिल्याच पोस्टमधे ते सांगितलंय
मुलुंडात पण चिकार सामान आले
मुलुंडात पण चिकार सामान आले आहे. मखरे फुलांची व मेटल बेस वर इतर शोभिवंत वस्तू, फुले ऑर्किड्स, कुंदन कापड आणि काय काय लावलेली अशी आहेत. स्टेशन रोड वर किंवा पाच रस्त्यात फार ऑपशन्स मिळतील. मुलास शाळेत प्रॉजेक्ट वगिअरे आहे का?
घरी काही नवे इले. सामान आणले असल्यास जसे टीव्ही फ्रिज पीसी प्रिंटर त्याच्या पॅकिंग मध्ये थर्माकोल मिळेल व काही नाविन्य पूर्ण आकार सुचतील. ट्रॅडिशनल पेक्षा निराळे. आणि रिसायकल ही होईल. तो पर्याय तपासून बघा. एशिअन पेंटचे सोनेरी रंग पण आले आहेत. बाप्पा बसवायचे त्याच्या मागील भिंतीस देण्यासाठी.
धन्स अमा. मुलुंडमधेही बघते.
धन्स अमा. मुलुंडमधेही बघते.
अश्विनी, मनिषा लिमये, हो ते
अश्विनी, मनिषा लिमये, हो ते वाचल होत मी.
खरतर थर्माकॉलसाठी वेगळा धागा काढायची इच्छा होती आणि इथेच टाईप केल त्याबद्दल सॉरी.
मनिषा, किती दिवसांनी दिसलीस
मनिषा, किती दिवसांनी दिसलीस मायबोलीवर (मला..... नायतर म्हणशील की मी त्या अमुक अमुक किंवा अबक बाफांवर असते की!)
खरेतर मी तुला चमचातून 'थर्माकॉल कशाला उगीच वापरणार आहेस' असा 5ml उपदेश घेऊन आलो होतो. पण तुझे वरच्या पोस्टीतले कारण वाचले.
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा! मायबोलीवरच्या गणेशोत्सवातही भाग घे!
आरती! साक्षात गजाननाकडून
आरती!
साक्षात गजाननाकडून आवताण
अरे मी दिसतच नाही , कारण नसतेच मी हल्ली. खरंच खुप दिवसांनी आले आज.
मनी आली आणि ठराविक
मनी आली आणि ठराविक बाफंच्याशिवाय दुसरीकडेही गेली... मायबोली धन्य झाली..
घेशीलच...
मने
नी दिवे घेतलेच. आता गणपतीत तर
नी दिवे घेतलेच. आता गणपतीत तर लागतीलच
विपु बंद का ठेवलीयेस?
विपु बंद का ठेवलीयेस?
उघडली
उघडली