पोश्टर बॉईज

Submitted by Sanjeev.B on 5 August, 2014 - 05:34

फार दिवसांनी मराठी चित्रपट पाह्ण्याचा योग आला. दिप्ती आणि श्रेयस तळपदे निर्मित पोश्टर बॉईज हा चित्रपट ग्रामिण भागात सार्वजनिक आरोग्य खात्याचे गलथान काराभारा मुळे, तीन वेग वेगळ्या वयोगटातील व स्तरातील पुरुषां वर ओढवणारे प्रसंग हे विनोदी रित्या फार छान मांडले आहे. चित्रपटाचा शेवट जरा तार्किक असायला हवे होते असे मला वाटते.

विनोदी अभिनयात वाकबगार असणारे दिलीप प्रभावळकर, यांना तेव्हढीच तोलामोलाची साथ ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव यांनी दिले आहे. नेहा जोशी यांच्या वाटेला जे ३-४ सीन्स आले आहेत त्यात त्यांनी धमाल उडवुन दिली आहे. पुरुष नसबंदी हा विषय कमरे खालच्या विनोदा साठी भरपुर वाव असुनही, विनोदा मध्ये अश्लिलता आले नाही. अनिकेत विश्वासराव ने रांगडा पण प्रेमळ आशिक चे व्यक्तिमत्व एकदम झोकात साकारलेली आहे, he will be definitely remembered for this role, not to miss, लेस्ली लुविस चे रॉक म्युझिक पुढच्या वर्षीच्या सर्व मराठी अवॉर्ड्स पटकावतील एव्हढे जोरदार झाले आहे. समिर पाटिल च्या डायलॉग्स वर सिनेगृहात प्रेक्षक टाळ्या, शिट्ट्या वाजवुन मनमुराद दाद देतात. ह्या पुर्वी असे दृश्य दादा कोंडके च्या सिनेमा च्या वेळी पाहण्यास मिळत.

चित्रपटात जेव्हा शेवटी ला तिन्ही नायकांना नागडे उपोषण करण्याचे वेळ येते, तेव्हा अनिकेत विश्वासराव व पुजा सावंत ह्यांचे मोबाईल वरील संभाषण व ऋषिकेश जोशी व नेहा जोशी ह्यांचे संभाषण, ऋषिकेश जोशी वर लाईन मारणारी मास्तरीण, हे सीन्स एकदम अफलातुन जमुन आले आहेत.

लग्ना आधीच आई बाप होणे आणि त्यासाठी नियोजीत वरास शुभेच्छा मिळणे आणि त्याचे समर्थन करणारे डायलॉग, "आजची पिढी आहे साहेब, लायसन मिळायच्या आधिच ही पोरं गाडी पळिवतात", जेव्हा येतं, तेव्हा सारे सिनेमागृह अक्षरशः शिट्ट्य, टाळ्या व हसण्याने दुमदुमुन जाते.

सनसिटी (विले पार्ले पुर्व) येथे हा चित्रपट हाऊसफुल्ल गर्दित चालु आहे, बहार सिनेमागृहात ही अ‍ॅडव्हँस बुकिंग करावं लागतं. किक हा हिंदी सिनेमा चा टिकीट सहजा सहजी उपलब्ध आहे, पण पोश्टर बॉईज साठी अ‍ॅडव्हँस बुकिंग करावं लागतं.

All in all, its definitely a one time watch movie.

Poshter Boyz.jpg

धन्स. Happy

- संजीव बुलबुले / ०५.ऑगस्ट.२०१४

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघीतला मस्त धमाल, फुल्टू मजा

सलमाच्या किक पेक्षा कितीतरी पटीने चांगला

संजीव धन्यवाद मराठी सिनेमाचं परीक्षण लिहिल्या बद्द्दल

मी कालच पाहिला हा सिनेमा. आवडला.
अश्लील विनोद अजिबात नाही. उगाच ओढुन- ताणून घातलेला मसाला पण नाही. निव्वळ मनोरंजन.

काल पाहिला..फारच मस्त आहे Happy लय भारी सारखा भंपक सिनेमा पाहिल्यानंतर जरा भीती वाटत होती कसा असेल ह्याबद्दल पण पूर्ण पैसा वसूल... हृषीकेश जोशीने फार छान काम केले आहे. कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. नक्कीच बघावा असा Happy

@नितीनचंद्र , आम्ही पाहिला तुमच काय ? >> Wink

पाहिला ,आवडला पण थोडा अतिशयोक्ती वाटला .

पण धमाल आहे .... कुलकर्णी मास्तर मस्तच Happy

" साहेब , जन्ता नाही जनता " जाम हसले .

आजच बघितला .खूप खूप मजा येणार आहे अशा अपेक्षेनी गेले होते .
पण तेवढी मजा काही आली नाही. पण एकंदरीत चांगला आहे. आवडला Happy

सर्वात सॉलीड शॉट >> चॅनल गेट च्या तिथुन ८ दिवसंची मुदत घेवुन ते तिघ (६ खरे तर) माग फिरतात आणि गॉगल लावुन मास्तर निघतो तेव्हा त्याचा attitude एक नंबर ..

मस्तंय असे ऐकून होतोच. इथले एकंदरीत प्रतिसाद वाचून आता बघायला हरकत नसावी. आधी महेश कोठारे दिग्दर्शित आणि मग भरत जाधव यांच्या अभिनयाने नटलेल्या अचरट विनोदी चित्रपटांपेक्षा वेगळे असेल अशी आशा करतो.

टीना .. नक्कीच, माझाही बोलण्याचा रोख तोच होता. हा त्यातला नाहीये, नक्कीच बघेन Happy

मस्स्त आहे सिनेमा... खूप दिवसांनी निखळ विनोदी आणि चांगला संदेश देणारा सिनेमा पाहायला मिळाला.

कुटुंब नियोजनापेक्षाही मायबोलीवर नेहमीच वादग्रस्त ठरलेला प्रताधिकार जपणुकीचा संदेश या सिनेम्यातून व्यवस्थितरित्या पोचतो.

एकदम झकास पिक्चर.. बर्‍याच दिवसांनी डोकं न दुखता थिएटर मधून बाहेर पडलो पिक्चर बघितल्यावर..

कुटुंब नियोजनापेक्षाही मायबोलीवर नेहमीच वादग्रस्त ठरलेला प्रताधिकार जपणुकीचा संदेश या सिनेम्यातून व्यवस्थितरित्या पोचतो. +१११११

मी पण कालच पाहिला. अप्रतिम सिनेमा. सर्वांचंच काम अतिशय सुरेख.
मास्तरची बायको ठसकेबाज. अनिकेत विश्वासरावची हिरविण अगदीच पिचकवणी.

खटकलेल्या गोष्टी :

दोन्ही हिरविणींचे कपडे आणि मेकप . शहरातल्या मुलींसारखे वाटतात .
भाषा : मध्येच ग्रामिण मध्येच शहरी वाटते .
आणखी एक , जेव्हा कोर्टाच्या तारखा पडतात , खटला लांबतो ते दाखवण्यासाठी कॅलेंडर दाखवतात .
ईंग्रजी महीना ऑगस्ट दाखवतात आणि तिथी पौष द्वितीया वगैरे असते .

फर्स्ट हाफ फारच बोअर झाला.. सेकंड हाफ ला जरातरी वेग असल्यानं सुसह्य झाला..

ज्या देशात पौरुषाच्या मूर्ख कल्पनांमुळे आधीच बायकांना सहन करावं लागतं, ज्या देशात कुटुंबनियोजनाची जवाबदारी आधीच बायकांवर आहे, त्या देशात असले गैरसमज पसरवणारा चित्रपट काढू नये.. (चित्रपटात लढ्याची कारणं वेगळी असती तरी ठीक होतं)

त्यांचं ऑपरेशन झाल्याचं खोटं छापलं, म्हणून लढ्याला सुरुवात होत नाही - ते लढतात कारण पुरुषानं कुटुंबनियोजनासाठी ऑपरेशन करणं हा सोशियल स्टिग्मा आहे, त्यानं पुरुषाला कलंक लागतो वगैरे - पहिला अर्धा भाग ह्यातच खर्ची पडलाय.
म्हणजे, त्यांनी खरच ऑपरेशन केलं असतं, तर गावातल्या लोकांचं हसणं, एसटी तल्या लोकांनी टिंगल करणं, मुलीचं ठरलेलं लग्न मोडणं वगैरे जस्टिफाय होतं असा अर्थ निघतो त्यातून.

शेवटच्या सीन मधे सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला आहे, पण कुटुंबनियोजनाच्या ऑपरेशनामुळे पुरुषाला कसलाही प्रॉब्लेम येत नाही, ह्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण कुठेही दिलेलं नाही.

भारतात - किती घरांमधे बायकांनीच ऑपरेशन करून घ्यावं, गोळ्या घ्याव्यात असा सूर असतो आणि किती घरात पुरुष ऑपरेशन करून घेतात? अधिक माहिती साठी आपल्या फॅमिली डॉक्टर शी बोलावं.

फर्स्ट हाफ फारच बोअर झाला.. सेकंड हाफ ला जरातरी वेग असल्यानं सुसह्य झाला..

ज्या देशात पौरुषाच्या मूर्ख कल्पनांमुळे आधीच बायकांना सहन करावं लागतं, ज्या देशात कुटुंबनियोजनाची जवाबदारी आधीच बायकांवर आहे, त्या देशात असले गैरसमज पसरवणारा चित्रपट काढू नये.. (चित्रपटात लढ्याची कारणं वेगळी असती तरी ठीक होतं)

त्यांचं ऑपरेशन झाल्याचं खोटं छापलं, म्हणून लढ्याला सुरुवात होत नाही - ते लढतात कारण पुरुषानं कुटुंबनियोजनासाठी ऑपरेशन करणं हा सोशियल स्टिग्मा आहे, त्यानं पुरुषाला कलंक लागतो वगैरे - पहिला अर्धा भाग ह्यातच खर्ची पडलाय.
म्हणजे, त्यांनी खरच ऑपरेशन केलं असतं, तर गावातल्या लोकांचं हसणं, एसटी तल्या लोकांनी टिंगल करणं, मुलीचं ठरलेलं लग्न मोडणं वगैरे जस्टिफाय होतं असा अर्थ निघतो त्यातून.

शेवटच्या सीन मधे सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला आहे, पण कुटुंबनियोजनाच्या ऑपरेशनामुळे पुरुषाला कसलाही प्रॉब्लेम येत नाही, ह्याचं शास्त्रीय स्पष्टीकरण कुठेही दिलेलं नाही.

भारतात - किती घरांमधे बायकांनीच ऑपरेशन करून घ्यावं, गोळ्या घ्याव्यात असा सूर असतो आणि किती घरात पुरुष ऑपरेशन करून घेतात? अधिक माहिती साठी आपल्या फॅमिली डॉक्टर शी बोलावं.

-------
नटांविषयी
दिलीप प्रभावळकर पण वरवर अ‍ॅक्टिंग करतोय असं वाटतं.. भूमिका सापडलीच नाहीये त्याला.
दिलीप प्रभावळकर, हृशिकेष जोशी - ह्यांच्याकडनं बर्‍याच अपेक्षा होत्या.. अपेक्षाभंग झाला चांगलाच.

अनिकेत विश्वासरावकडून काहीच अपेक्षा नव्हत्या, पण ह्या तिघांच्यात तोच चांगला वाटला

------
कॅरेक्टर्सः
तिथेही गोंधळ आहेच..
मुख्यमंत्र्यांना स्टेज वर करेक्ट करणार्‍या माणसाच्या सक्ख्या बायकोचं बोलणं ऐकलं का!
बहुतेक ज्याला त्याला आपली बोली भाषा बोलायची मुभा दिलेली दिग्दर्शकानं..

लगेच पाहून टाकला Happy

नानबाशी बऱ्याच अंशी सहमत. काही काही पंचेस भारी जमले असले तरी बऱ्याच गोष्टी खटकतात! Over केलंय काही ठिकाणी..जेवढी अफाट स्तुती ऐकली होती त्या मानाने निराशा झाली! आजकाल किती उगीच हाईप करतात सिनेमे असं वाटतं.

जेवढी अफाट स्तुती ऐकली होती त्या मानाने निराशा झाली>> सहमत! खळखळुन हसु यावे असे प.न्चेस नाहित.
काही अ.न्शी नानबा म्हणते तेही पटल.
तरी वेगळा विषय सिनेमा काढल्याबद्दल श्रेयस आणी दिप्ती च अभि.न्नद्न!

आजकाल किती उगीच हाईप करतात सिनेमे असं वाटतं.>>> +१ मला तर हे हाईप प्रकरण नटरंग पासुन जाणवत आहे. बालगंधर्व अजून एक उदाहरण... असो.

आपली मराठी वर पहिला. ठीक आहे. विषय वेगळा आहे. शेवट थोडा गुंडाळल्या सारखा वाटतो. श्रेयस तळपदे मुख्यमंत्री शोभत नाही. (घरचा चित्रपट आहे म्हणून काम केलं का )

Pages