-: बुद्धी व ज्ञान याचा संबंध .................एक अध्यात्मिक चर्चा

Submitted by विनायक. दि.पत्की. on 14 August, 2014 - 05:21

-: बुद्धी व ज्ञान याचा संबंध ........................................................... भक्तीशी आहे :-

ज्ञान हे बुद्धी असेल तरच ग्रहण करता येते, आणी कधी कधी तर ग्रहण केलेले बुद्धी नसेल तर मांडता सुद्धा येत नाही. तेव्हा बुद्धी व ज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या मध्ये बुद्धी हे ज्ञान ग्रहण करण्याचे व प्रगट करण्याचे माध्यम आहे. सृष्टीत ज्ञान प्रचंड आहे, ज्याची या मानवी मेंदूने कल्पना करवत नाही.फार तर एवढे म्हणता येईल कि सृष्टीतले सारे ज्ञान व अज्ञान हे सृष्टीतील घटकातच सामावले असल्यामुळे ज्ञानी होण्याची अपेक्षा असणाऱ्या माणसाने कोणालाही कमी समजू नये व स्वत:ला सर्व श्रेष्ठ समजू नये. जो भेटेल त्याचा कडून काय शिकता येईल ते पाहत असावे स्व:ताचे सर्वार्थाने कल्याण साधावे. व अज्ञान ही कल्पना असते व ज्ञानाने त्याची जागा घेतली कि ते नष्टच होत असते

मात्र ज्ञान हे लवचीक असते बुद्धीजीवी ते आपल्या बुद्धी प्रमाणे आकार मान देण्यात तरबेज असतात त्यामुळे बुद्धी कशी प्रगट करेल त्यावर ज्ञानाचे महत्व ठरते त्यामुळे ज्ञानाचे २ प्रकार चे म्हणता येईल

१) सज्ञान ....सज्ञान म्हणजे सदुपयोगी पडणारे ज्ञान ज्याला आपण constructive किंवा मानसिकता भक्कम करणारे म्हणू या हे मनाला आनंद देणारे असते ज्याला याचा हव्यास असतो हाव असते त्याची बुद्धी जागृत आहे असे समजावे तोच या जन्माचा सदुपयोग करू शकतो . जगाला आनंदी दृष्टीने पाहून स्व:त ही आयुष्यात आनंदी राहू शकतो

२) अज्ञान ...अज्ञान म्हणजे उदासीनता बुडाशी ठेऊन मी त्यातला नाही असे वर्तन करणे व सत्य शोधण्याचा कधीही मनातून प्रयत्न न करणे व मागे राहण्यात धन्यता मानणे यालाच आपण बुद्धी गहाण ठेवली असे म्हणतो आणी ज्याला हे आयुष्य भर कळालेच नाही त्याचा जन्म वायाच गेला नाही काय ? मात्र यांना बुद्धीला चालना देणारा भेटला (व्यक्ती अथवा ग्रंथ) तर मात्र अज्ञानी सज्ञानी होऊ शकतो म्हणून बुद्धी जास्त महत्वाची आहे तेव्हा अशी बुद्धी व्हावी म्हणून बुद्धी ची पूजा करता आली कि ज्ञान येतेच हे लोक सुद्धा आनंदी जीवन जगू शकतात फक्त इच्छा हवी अज्ञानाची जागा सज्ञानाला घेऊ दिली तरच हे साधेल म्हणजे अज्ञान हे कायमचे नाही ते फक्त ज्ञान होई पर्यंतच असते नंतर ते नष्टच होत असते म्हणून याच प्रकारे बुद्धी सुद्धा २ रूपे धारण करू शकते

१) सुबुद्धी .......मनाला सतत चांगले वळण लावावे या विचारला सुबुद्धी म्हणतात ही मनाची एकाग्रता असेल तर अतिशय प्रभावी असते

मनाची एकाग्रता म्हणजे जेथे शरीर तेथे मन आणी हेच सर्वात मोठे अवघड काम असल्यानेच सुबुद्धीचा अभाव असतो ज्याची सु बुद्धी जेवढी प्रभावी तेवढी ज्ञान मिळवण्याची व ते आकलन करण्याची क्षमता अधिक असते व मिळवलेले ज्ञान योग्य वेळी वापर करण्याकडेच त्या व्यक्तीचा कल असतो त्या मुळे अशी व्यक्ती प्रभावी असते अशी व्यक्ती अज्ञानाला सुद्धा प्रभावी पणे प्रगट करू शकते यालाच आपण अमुक एक व्यक्ती फार चालू आहे असे म्हणतो पण चालू पणा जास्त काळ चालत नसल्यामुळे सुबुद्धी व्यक्ती फक्त एखाद्याचे भले व्हावे त्यात आपले अज्ञान दिसु नये व आज जे माझे अज्ञान आहे ते मी ज्ञान घेऊन दूर करावे या भावनेतून जर प्रभावी उपयोग करत असेल तर परमेश्वर देखील त्याला मदतीला तयार असतोच

२) कुबुद्धी .......अजिबातच ज्ञान नसणे किंवा असलेल्या प्रचंड ज्ञानाचा दुरुपयोग करणे अशी लक्षणे कुबुद्धी ची असतात अशी व्यक्ती प्रथम दर्शनी प्रभाव पडू शकते पण तेथे परमात्म्याचे अधिष्ठान नसल्यामुळे त्याचा प्रभाव हळू हळू ओस पडून नंतर दयनीय अवस्थेत रुपांतर होते महाभारतातील शकुनी व दुर्योधन ही दोन याची उत्तम उदाहरणे आहेत आणी आजकाल ची अतिरेकी सुद्धा याच प्रकारात येतील . अणुतंत्राचे प्रचंड ज्ञान आहे पण त्याचा विनाशासाठी उपयोग हा केवळ कुबुद्धीमुळेच होतो.अशी व्यक्ती अतिशय चंचल मनाची असते एकाग्रता अजीबात नसते आणी आयुष्यभर यांना खऱ्या अर्थाने समाधान मिळत नसते

तेव्हा जीवन चक्राची मुक्ती ही तर भगवंताची दासी आहे. तेव्हा परमेश्वराला भक्ती मागावी तो ती क्वचितच देत असतो आणी बुद्धी व ज्ञान हे दोन्ही भक्ती असेल तरच प्राप्त होत असते त्यामुळे बुद्धी व ज्ञान यांचा संबंध फक्त भक्तीशी आहे भक्ती ज्या प्रकारची असेल तसे ज्ञान व बुद्धी होईल.

( इच्छुकांना विनंती कि हि चर्चा चालु ठेवावी)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>बुद्धी व ज्ञान यांचा संबंध फक्त भक्तीशी आहे <<< हे समजले नाही किंवा पटले नाही.

तसेच शेवटचा पॅराच समजला नाही किंवा पटला नाही.

ह्या प्रतिसादातील 'न समजणे' ह्याचा अर्थ 'आधीच्या लेखनाशी नेमका संबंध कसा लागला' हे न समजणे असा आहे.

Happy

आणी बुद्धी व ज्ञान हे दोन्ही भक्ती असेल तरच प्राप्त होत असते
भक्ती म्हणजे नक्की काय? पूजा करणे? प्रार्थना म्हणणे? हे असे सतत करायचे की थोडा वेळ करायचे?
ज्ञान म्हणजे कशाचे ज्ञान? आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे, सुख दु:ख, संपत्ति इ. गोष्टी अशाश्वत आहेत हे ज्ञान?

बाकी सुबुद्धि, एकाग्रता असणे अत्यंत महत्वाचे हे पटले! इथे कुठे श्रद्धा असणे याचा उल्लेख कसा नाही?

त्यांनी केलेली सुबुद्धी आणि स(सु?)ज्ञानाची व्याख्या पाहिली तर 'बुद्धी व ज्ञान यांचा संबंध फक्त भक्तीशी आहे' याचा अर्थ 'अप्लाय युअरसेल्फ' असा लागतो आहे मला. भक्ती म्हटलं असलं तरी देवाशीच त्याचा संबंध असेल असं नाही. कोणतीही गोष्ट - मग ती डिग्री असेल, नोकरी असेल, मनःशांती असेल, आरोग्य असेल किंवा अन्य काही - त्याचा ध्यास लागला की बुद्धी त्याकडे एकाग्र होईल, योग्य ते ज्ञान प्राप्त करणं सोपं होईल, मिळालेल्या ज्ञानाचा ध्येयप्राप्तीसाठी योग्य उपयोगही करायचं समजेल आणि प्राप्य गोष्ट प्राप्त होईल. पण मुळात सुरुवात त्याचा ध्यास/भक्ती मनात उत्पन्न झाल्यामुळे झाली - असं असावं.

कट्यार ,बेफ़िकीर , झक्की ,स्वाती _आंबोळे ..नमस्कार .

तुमच्या साठी मी थोडे विस्तृत करतो पण स्वाती_आंबोळे ताई यांनी जो मतितार्थ काढला आहे तेच मी म्हणत आहे.

कुठल्याही विषयाचे ज्ञान हे आवड असेल तरच प्राप्त होते कारण आवड असल्याशिवाय मन एकाग्र होत नाही .मन एकाग्र असल्याशिवाय कुठलीही गोष्ट डोक्यात शिरतच नाही आणि मन एकाग्र करण्यासाठी जी कला आहे तिला मी भक्ती म्हणतो .येथे आपण भक्तीला त्याविषयाची आपली असणारी ओढ म्हणू या. हि ओढ निर्माण होते ती केवळ श्रद्धा असेल तरच. आणि श्रद्धा हि आलेल्या अनुभवातून वाढत जाते. जसे कि आपण शरीराच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जातो मग ते ओळखीचे नसले ,त्यांनी दिलेल्या औषधाचे आपल्याल्या ज्ञान जरी नसले तरी आपण त्यांचे म्हणणे तंतोतंत पाळतो ते त्यांच्यावर त्यांच्यावर श्रद्धा निर्माण झाली म्हणून .तसे ज्ञान बुद्धी या गोष्टींची थोडी जरी ओढ निर्माण झाली कि वाढीला लागते .मग या ओढी मुळे कोणी त्याची आपापल्या परीने पूजा करेल कोणी प्रार्थना म्हणून आळवणी करून आपली ओढ तीव्र करून मनाची शांतता करेल मन शांत झाले कि एकाग्र होतेच ना ? आणि अशी खात्री झाली कि तो त्याचे समाधान होई पर्यंत असे करीतच राहील.म्हणजे तो त्याचा अनुभव वाढवत रहिल तेव्हा पर्यायाने त्याचा त्या विषयाचा अभ्यास (अनुभव ) वाढून ज्ञान वाढेल कि नाही ?
शेवट असा आहे कि शेवटी ज्ञान व बुद्धी पाहिजे कशाला असाही विचार असू शकतो तर त्याचे उत्तर असे आहे कि प्रत्येक जीव हा समाधान मिळावे म्हणून जगण्याची धडपड करत असतो आणि अध्यात्म हे सांगते कि मानवी जन्म हा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी जी साधना करावी लागते त्या साठीच असतो कारण साधना हि फक्त मनुष्य देहाव्दारेच होऊ शकते म्हणून साधना करावयाची असेल तर देव सुद्द्धा मनुष्य देह धारण करतात म्हणजेच अवतार घेतात मग या मनुष्य देहाचे अंतिम उदिष्ठ ज्यांना गाठावयाचे आहे त्यांच्या साठी ज्ञान व बुद्धी आवशक आहेच.आणी मुक्ती जर भक्ती मुळे मिळत असेल तर भक्ती हिच मुक्ती पेक्षा श्रेष्ठ आहे म्हणुन ज्ञान व बुद्धि पाहिजे असेल तर भगवंताला भक्तीच मागीतली पाहिजे

अध्यात्म हे सांगते कि मानवी जन्म हा या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी जी साधना करावी लागते त्या साठीच असतो कारण साधना हि फक्त मनुष्य देहाव्दारेच होऊ शकते म्हणून साधना करावयाची असेल तर देव सुद्द्धा मनुष्य देह धारण करतात म्हणजेच अवतार घेतात मग या मनुष्य देहाचे अंतिम उदिष्ठ ज्यांना गाठावयाचे आहे त्यांच्या साठी ज्ञान व बुद्धी आवशक आहेच.आणी मुक्ती जर भक्ती मुळे मिळत असेल तर भक्ती हिच मुक्ती पेक्षा श्रेष्ठ आहे म्हणुन ज्ञान व बुद्धि पाहिजे असेल तर भगवंताला भक्तीच मागीतली पाहिजे >>>
अगदी अगदी .
पण ज्ञान आणि बुद्धी मध्ये मला हि confusion आहे . कारण कर्मभोग भोगायचे असतात तेव्हा 'बुद्धी कार्मानुसारिणी ' होते. असा मनुष्य ज्ञानी नसतो . आणि मग ज्ञानी झाला कि 'कर्म बुद्धीनुसार' होतं. बुद्धी असणारा ज्ञानी असू शकेलच असं नाही. पण ज्ञानी मनुष्य मात्र बुद्धिमान असतो . बुद्धी हि ज्ञानासाठीची prerequisite आहे

मोहिनि३३३. नमस्कार .
ज्ञानी मनुष्य मात्र बुद्धिमान असतो.बुद्धी हि ज्ञानासाठीची prerequisite आहे . आणी असलेले ज्ञान बुद्धी नसेल तर योग्य प्रकारे मांडता सुद्धा येत नाही. हेच माझे मत आहे. त्यामुळे सुज्ञ लोकांनी तरी याचा तरुण पिढीत प्रचार करावा कारण आज ज्ञानाच्या प्राप्तीची अनेक साधने उपलब्ध असताना केवळ कुबुद्धी पाई पाहिजे तशी प्रगती होत नाही याला योग्य वळण मिळावे ही प्रांजळ इच्छा

पत्की साहेब,

"सृष्टीतले सारे ज्ञान व अज्ञान हे सृष्टीतील घटकातच सामावले असल्यामुळे ज्ञानी होण्याची अपेक्षा असणाऱ्या माणसाने कोणालाही कमी समजू नये व स्वत:ला सर्व श्रेष्ठ समजू नये. "

या वाक्यातला कारण-संबंध अस्तित्वात नसल्याने, व "बुद्धी-ज्ञानाची सांगड भक्ती-[अंध-]श्रद्धा, "परमात्म्याचे अधिष्ठान",
इ. पुरावारहित भंपक थोतांडाशी घातल्याने, एका चांगल्या विषयाचा पचका झाला आहे!
[कल्पित] देव कुणाच्या मदतीला धावल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही!
आपण कल्पित दैवतांचे देव्हारे माजविण्यासाठी विज्ञान युगाने उपलब्ध केलेल्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग [गैरवापर] का करता?!

वेदांत असाही एक मंत्र आहे:
"कुकर्मी ना भजामि । "

"कु" कुठल्याही अशास्त्रीय बाता मारणाऱ्या भोंदूंपासून
"क" कशावरही विश्वास ठेवणाऱ्या विचारशून्य भोळसटांचे
"र" रक्षण, कल्पित देव तर राहोच दूर, खरा सूर्य तारा तरी कसे तारण करणार?
"मी" मी विचार केला तर मला शंका येईल व भोंदूंचे पितळ उघडे पडेल
"ना" नाहीतर माझे काही खरे नाही, आयुष्य अंधश्रद्धेत वाया जाईल !
"भ" भलत्या बाष्कळ बुवाबाजी-थापांवर विश्वास ठेवणे हे मूर्खत्व,
"जा" जादा बे-अक्कलपणा म्हणजे त्याचा मूढतेने प्रसार-प्रचार करणे !
"मी" मी असा बावळटपणा यापुढे करणार नाही, जीवना-शपथ!

अध्यात्मी बगळे कर्ती 'पांढऱ्यावर काळे'!

विश्वसंसार भार पेलण्या असमर्थ दुबळे
ऐसे विज्ञानमूढ 'ढ' बावळे, मूर्ख, गबाळे
‘अतींद्रिय, पारलौकिक, अध्यात्मी’ बगळे
वरून ढवळे परी अंतरंगी हे कावळे काळे

भंपक ‘गुरु’ निरर्थ बरळे, करितो बावळे चाळे
लंपट 'बाबा' एकांती कोवळ्या चेलियां कवळे!
निर्बुद्ध भाविक भगत चेला तत्त्तंगड्या चोळे!
भोंदू वाचाळे वोकिती गरळें, कर्ती 'पांढऱ्यावर काळे'!

व्यर्थ वळवळे अज्ञान-कर्दमी अंधश्रद्ध गांडुळे
गुंगल्या भ्रमित 'बंद' भक्तांचे कैसे उघडतील डोळे?!
इन्द्रियें रस भोगिती पऱ्या, जिज्ञासू विज्ञानसागरी खेळे
स्वच्छंद भ्रमर लुटती मधु, उमलता सत्यज्ञान कमळे!

स्वामी विज्ञानानंद / विश्वाणु

पत्की साहेब,

आपल्याच व्याख्यांनुसार आपले दैवी, पारमार्थिक, विरक्ती-भक्ती-विषयक विचार "अज्ञान" व "कुबुद्धी" या सदरात मोडतात असे वाटते.
सूचना:
लेखणी [कळपटा]ला विश्रांती द्या.
बायको [असल्यास] ला घरकामात मदत करा.
मुले-नातवंडे [असल्यास] यांचे बरोबर बोला, खेळा.
बागेला, कुण्ड्याना [असल्यास] पाणी घाला.
२ घास कमी जेवा.
२ तास जास्त झोपा.
औषधे वेळेवर प्या / गिळा.
येणे-करून होतांच
मायबोली वाचकांवर सर्व देवी-देवतांपेक्षा जास्त कृपा केल्याची ही लेखी पावती समजावी!

हा वाद विवादाचा विषय नसुन अनुभवायचा विषय आहे एवढे ज्यांना समजले त्यांना सर्व समजले.