शेतीसाठी ट्रक्टर घ्यायचे आहे.

Submitted by हतोडावाला on 11 August, 2014 - 03:32

गावाकडे वडलोपर्जित शेती असून ट्रक्टर घेण्याचा विचार आहे. नेटवर सर्च करुन पाहिले तर २० एच. पी. ते ८० एच. पी. पर्यंतचे वेगवेगळे मोडेल दिसत आहेत. मला खालील प्रश्न पडले आहेत. कृपया मार्गदर्शन करावे

१) शेतीसाठी नेमके किती एच. पी. चे ट्र्क्टर घ्यावे?
२) सेकंड हँड घ्यावे का? ( इंजीनची खात्री कशी करावी)
३) सबसिडी किती मिळते व त्याची प्रोसेस काय आहे?
४) लोनची एकूण प्रोसेस काय असते?
५) शेतकरी म्हणून लोन घेतल्यास हप्ता वर्षातून दोनदा असतो असे ऐकिवात आहे.
६) भातशेतीसाठी ट्रक्टर सोबत कोणती उपकरणे घघ्यावीत?
७) मी नोकरी(प्रायव्हेट) करत असल्यामुळे शेतीलोन मिळण्यात काही अडचण होईल का?
८) अजुन काही माहिती असल्यास ती हवी आहे.

माहिती देणा-यांचे आधीच आभार मानतो!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) शेतीसाठी नेमके किती एच. पी. चे ट्र्क्टर घ्यावे?

शेत किती एकर आहे त्यावर अवलंबून आहे. जर शेत ४ एकरांपेक्षा जास्त असेल, तर ट्रॅक्टर घ्यायला हरकत नाही, अन्यथा मिनी ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरने काम चालून जाईल.

२) सेकंड हँड घ्यावे का? ( इंजीनची खात्री कशी करावी)

सेकंडहँड घेण्याने पुढे त्रास होऊ शकतो. कारण मला तसा मनस्ताप झाला आहेच.

३) सबसिडी किती मिळते व त्याची प्रोसेस काय आहे?

विक्रेता सबसिडीबद्दल जास्त माहिती देऊ शकतो.

४) लोनची एकूण प्रोसेस काय असते?

माहित नाही.

६) भातशेतीसाठी ट्रक्टर सोबत कोणती उपकरणे घघ्यावीत?

ट्रॅक्टरसोबत नविन उपकरणे घेण्यापेक्षा एक-दोन लाख घालून खाली दिलेल्या अटॅचमेंट्स घ्याव्यातः

- Reaper attachment
- Thresher machine

तसेच ट्रॅक्टरसोबत बर्‍याच अटॅचमेंट असतात, त्या बघून घ्याव्यात.

७) मी नोकरी(प्रायव्हेट) करत असल्यामुळे शेतीलोन मिळण्यात काही अडचण होईल का?

मी स्वतः शेतीसाठी लोन घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. तेव्हा त्याबद्दल जास्त माहिती नाही.

८) अजुन काही माहिती असल्यास ती हवी आहे.

भातशेती बद्दल आणखी माहिती हवी असल्यास संपर्क करु शकता..

आजूबाजूला इतर जणांची शेती असेल तर सहकारी तत्वावर घेता येईल. पतसंस्था पण असतात गावात.
किंवा कामाच्या दिवसापुरता भाड्याने घेता येईल. ( अर्थात ऐकीव माहिती. )

पिंगू > माहिती बद्दल आभार
=====

दिनेशदा,
माझ्या गावात एकच ट्रक्टर आहे, त्यानी रोख पैसे मोजून आणली होती. त्यामुळे त्याला लोनचं फारसं माहीत नाही. दुसरं म्हणजे कंपिटीटर नको म्हणून त्यानी काड्या करण्याची शक्यताही आहेच.

माझ्या शेतात तर चालेलच पण आसपासच्या शेतक-याना ट्रक्टरनी नांगरण्याची सोय होईल आणि मलाही दोन पैसे मिळतील असं एकूण गणीत आहे.

सगळ्या पतसंस्था तालूक्याच्या पातळीवर असल्यामुळे व त्या लेवलवर आपलं वजन शुन्य ही परिस्थीती पाहता तिकडून काही मिळेल असे वाटत नाही. म्हणून मी आपला बँक लोनचा विचार करतो आहे.

सहकारी तत्वावर हा विचार आला होता पण नको म्हटलं. आपण हवंतर पगारातून हप्ता भरु पण भागिदार नको.

कुठलेही कर्ज घ्यायचे तर तारण लागणारच. याकामी सातबाराचा उतारा वगैरे लागेल. ( त्यावर तूमचे नाव आहे का ? ) एखाद्या महिंद्रासारख्या मोठ्या कंपनीच्या विक्रेत्याला गाठा. त्यांच्याकडे अद्यावत माहिती असते. पण निर्णय लवकर घेऊ नका. दुसर्‍या कंपनीच्या विक्रेत्यालाही विचारा. त्यापैकी ज्याच्या शर्ती तूम्हाला पसंत पडतील त्या दुसर्‍याला सांगा... तो पण आणखी सवलती देईल.

दुसरे कुणी शेतकरी जर ते मॉडेल वापरत असतील तर त्यांना अनुभव विचारा. मला कल्पना नाही पण कदाचित ऋषि विद्यापिठ देखील सल्ला देऊ शकेल.

दिनेशदा,
कार घ्यायला तारण लागत नाही, मग ट्रक्टर घ्यायला का?
अन हो, शेती वडलाच्या नावे होती, ते गेल्यावर आई व आम्हा भावंडांची नावं चढलीत. मी सर्वात मोठा असल्यामुळे माझे नाव सर्वात आधी आहे. एक-दोघांचा सल्ला घेतला तेंव्हा त्यानी एच.यू. एफ. ची नोंद केल्यास सर्वात मोठ्याला कर्ता म्हणून सगळे अधिकार (व्यवहाराचे) मिळतात व त्याच्या नावे लोन होईल असेही कळले. तुम्ही म्हणता तसे एखादे डिलर गाठून सगळं विचारतोच आता.

कारसाठी तूमची सॅलरी स्लीप चालते, पण ती तूमच्या वैयक्तीक नावावर असणार.
एच. यू. एफ. चा कर्ता तूम्ही असणार,, तर त्याचे आयकराचे नियम नीट बघून घ्या. कदाचित नवे खाते देखील उघडावे लागेल.
व्होल्टासचे आहेत का ट्रॅक्टर बाजारात आता ? त्यांना पण विचारा.

दिनेशदा,
काही नाही चालले तर ट्रक्टरसाठी सॅलरी स्लीप चालविण्याचा विचार आहे.

व्होल्टासचे पहावे लागतील. काही खास आहे का वोल्टासच्या मॉडलमध्ये?

महिंद्रा, जॉन डिअर व स्वराज ही तीनच नावं ऐकून होतो. आता जरा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल.

तुमच्याकडे काही माहीती आलीच तर ईथे शेअर करा.

माझे वडील व्होल्टास मधे होते त्या काळात होते पण नंतरचे माहीत नाही.
कर्ज वैयक्तीक घेणार कि कर्ता म्हणून ते बघा.. त्यानुसार कर्जावरच्या व्याजाची वजावट मिळवता येईल.

शिवाय कुठलेही वहान कायम चालवत राहिले तरच फायद्यात असते. शेतीची कामे काही काळापुरतीच असतात. त्यामूळे वर्षभर वाहतुकीसाठी तो वापरता येईल का ? याचा पण विचार करा. कर्जाचे हप्ते वर्षभर चालूच राहणार.

मी तर म्हणतो की ट्रॅक्टर घेताना खालील गोष्टी नक्की घ्याचः

- Reaper attachment
- Thresher machine

कारण कापणी आणि मळणी जर कमीत कमी वेळात तुम्ही करु शकलात तर तुम्ही दोन महिने तरी ट्रॅक्टर भाड्याने देऊन कापणी-मळणीच्या कामामध्ये बर्‍यापैकी पैसे रिकव्हर करु शकता..

John Deere is really good
You will get High power tractor from Mahindra with lower cost compare to john deere
but Quality is good for john deere.
If many people are going to use it then better to go for john deere
if you only are going to use & take care of tractor then go for mahindra
you will save some money

Tractor implements which are connected to hitch of tractor are available with dealer.
Visit john deere website for more information.

I am big fan of John deere.

दिनेश व्होल्टास कंपनीचे ट्रॅक्टरस आता नाहीत.
हातोडावाला तुम्ही कोणत्या प्रकारचे शेतकरी आहात
१. शेतावरच रहाता आणि बाहेर नोकरी करता
२. शहरात रहाता आणि शेती गावाकड आहे पण आठवड्यातुन फ्रीक्वेंटली शेतावर जाता
३. शेतावर फक्त शनिवार रविवार / तुमच्या सुट्टीच्या दिवशी जाता
४. १-२ महिन्यातुन येखादवे़ळस जाता
आणि वरच्या सगळ्या पर्यायात तुमचा कोणताच येक भाऊ किंवा आई शेतावर रहात नाहीये अस मी ग्रुहीत धरतोय.
जर पर्याय १ आणि २ असेल तरच आणि ट्रॅक्टरसाठी तुम्हाला चांगला विश्वासातला ड्रायव्हर मिळत असेल तरच ट्रॅक्टर घेण्याचा विचार करा. कारण स्वतःची शेती करणे , त्यासाठी ट्रॅक्टर वापरणे , आणि उरलेल्या वेळात तो ट्रॅक्टर भाड्याने देऊन पैसा मिलवणे ह्या तिनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
तुमच्या गावात फक्त येकच ट्रॅक्टर आहे यावरुन मी लावलेला अंदाज असा आहे की येकतर तुमच गाव फारच छोट आहे किंवा बरच अडवळणी आहे. हे चुक पण असु शकत.
तुम्हाला पुर्ण्वेळ शेती करायची असेल तरच ट्रॅक्टर घेण्याचा विचार करा.
शेती पडीक राहु नये म्हनुन करणार असाल तर सध्या बिलकुल विचार करु नका.
ट्रॅकटरच आर्थिक बाजु पण पहा
राष्ट्रीयकृत बँका यासाठी लोन देतात. नोकरदारांना लवकर देतात. व्यवस्थीत हफ्ते भरले तर व्याजावर सुट पण मिळते. महीन्याला / त्र्ययमासिक / सहा महिन्याला येकदा / वार्षिक असे हफ्ते भरु शकता.
तुमचा वार्षिक कीती खर्च होतो बाहेरचा ट्रॅक्टर वापरला तर हे पण पहा.
शेतात कुठलीही गुंतवणुक करताना रेटर्न ऑन इंन्व्हेस्टमेंट हा फॅक्टर नेहमीच पहात जा.
इंन्व्हेस्टमेंट कॅलक्युलेट करताना मिळणारी सबसिडी धरु नका आणि येणार्‍या उत्पन्नासाठी कमीत कमी ईल्ड आणि कमीत कमी भाव धरा.

ट्रॅक्टर घेण्याच ठरलच तर ज्या कंपनीची आफ्टर मार्केट / सर्व्हीस तुमच्या भागात चांगली आहे तोच घ्या. जवळच्या डीलरला गाठा तो योग्य मॉडेल आणि अ‍ॅट्याचमेंट्स सांगेल.

मी ६ महीन्यांपुर्वी पर्याय २ प्रमाणे शेती करत होतो. मार्चच्या गारपीटीत पुर्णपणे झोपलो. आता परत शेती चालु केलीये. सध्या कांदा आणि गहु आहे शेतात. वरच्या पदध्तीने कॅलक्युलेशन करुन सध्या मी फक्त २०% शेती करतोय बाकीची फक्त वहीताखाली ठेवली आहे. व्यवहारीक पद्धतीने शेती केली तर फायद्यात रहाते हा माझा स्वानुभव आहे.
आम्ही २००४ साली ट्रॅक्टर घेतला होता. आर्थिक गणित वडीलांना समजाऊन सांगितल्यावर लगेचच २००५ साली विकला. थोडासाच तोटा झाला.

सिरियसली शेती करत / करणार असाल तरच ट्रक्टर घ्या.

१) शेतीसाठी नेमके किती एच. पी. चे ट्र्क्टर घ्यावे?
कमीत कमी ४० एच पी तरी घ्या
२) सेकंड हँड घ्यावे का? ( इंजीनची खात्री कशी करावी)
सेकंड हँड अजिबात घेउ नका.
३) सबसिडी किती मिळते व त्याची प्रोसेस काय आहे?
तुमच्या निर्णयप्रक्रीयेतुन सबसीडी हा मुद्दा पूर्ण पणे बाजुला काढा. जे काही गणीत करत असाल ते सबसीडी मिळणार नाही असे धरुन करा. सबसीडी मिळाली तर ती बोनस असे समजा.
४) लोनची एकूण प्रोसेस काय असते?
बँका लोन देतात पण शेताचा काही भाग तारण ठेवायला लागेल.

५) शेतकरी म्हणून लोन घेतल्यास हप्ता वर्षातून दोनदा असतो असे ऐकिवात आहे.
वर्षात २ वेळेला किंवा १२ वेळेला. तुमचा निर्णय ह्या गोष्टीवर अवलंबुन नसावा.

६) भातशेतीसाठी ट्रक्टर सोबत कोणती उपकरणे घघ्यावीत?
पास.

७) मी नोकरी(प्रायव्हेट) करत असल्यामुळे शेतीलोन मिळण्यात काही अडचण होईल का?
शेतीलोन साठी नोकरीचा उपयोग नाही. शेतीलोन शेत तारण ठेवुन मिळेल. रेट पण कमी असतो.

जो सर्वात जास्त खपतो तो घ्या ( महिंद्रा )

जाताजाता पण महत्वाचे. : तुमची जमिन असुन सुद्धा, तुम्ही असा बेसिक प्रश्न विचारला आहे म्हणजे तुम्हाला शेतीचा काहीच अनुभव दिसत नाही. जर तुम्ही आत्ता सिरीयसली शेती करत नसाल तर ट्रक्टर घेउ नका. त्यापेक्षा २ वर्ष शेती करायचा प्रयत्न करा ( पाहीजे तर भाड्याने ट्रक्टर घेउन ), कीती जमते आहे ते बघा. मग गुंतवणुक करण्याचा विचार करा.
हल्ली शेती करायला गावात पण वट लागतो हे विसरु नका.