Submitted by सुप्रिया जाधव. on 5 August, 2014 - 22:13
जरी फाटली चोळी नाही
एक पुरेसा !....टोळी नाही
अजब तिच्या स्वप्नांचे जळणे
कुठे राख-रांगोळी नाही
आयुष्याचा शिमगा झाला
जरी पेटली होळी नाही
दयायचाच तर असा रोग दे
ज्यावर औषध-गोळी नाही
डांव जाणते तुझा नशीबा
इतकीही मी भोळी नाही
भरभरून दे दु:ख, यातना
दुबळी माझी झोळी नाही
-सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
supriya.... as usual powerful
supriya.... as usual powerful expression
मस्त
मस्त
अजब तिच्या स्वप्नांचे
अजब तिच्या स्वप्नांचे जळणे
कुठे राख-रांगोळी नाही<<< सुंदर शेर!
गझल आवडली.
सुप्रिया खूप आवडली. मतला आणि
सुप्रिया खूप आवडली.
मतला आणि पहिला शेर केवळ अप्रतिम. मतला अंगावर आला.
छानच आवडली
छानच
आवडली
supriya.... as usual powerful
supriya.... as usual powerful expression >>>> +१०
मतला अंगावर आला >>>> अगदीच
मतला अंगावर आला >>>>
अगदीच मान्य !
धन्यवाद मित्र हो !!
जरी फाटली चोळी नाही एक पुरेसा
जरी फाटली चोळी नाही
एक पुरेसा !....टोळी नाही
अजब तिच्या स्वप्नांचे जळणे
कुठे राख-रांगोळी नाही
भरभरून दे दु:ख, यातना
दुबळी माझी झोळी नाही >>> खूप छान, सुंदर
अजब तिच्या स्वप्नांचे
अजब तिच्या स्वप्नांचे जळणे
कुठे राख-रांगोळी नाही
छान.
अजब तिच्या स्वप्नांचे जळणे
अजब तिच्या स्वप्नांचे जळणे
कुठे राख-रांगोळी नाही>>>
Kya baat!!!!़
अजब तिच्या स्वप्नांचे
अजब तिच्या स्वप्नांचे जळणे
कुठे राख-रांगोळी नाही
व्वा….
वाह वा!!
वाह वा!!
छानच
छानच
खूपच सुंदर. मतला खरच अंगावर
खूपच सुंदर. मतला खरच अंगावर आला