आमचा घडा पालथाच

Submitted by विनायक. दि.पत्की. on 2 August, 2014 - 05:06

सत्व गुणी हिवाळा,
तमोगुणी उन्हाळा.
रजगुणी पावसाळा,
त्याच्या अंगी नाना कळा.

भाविकला गंगाजल हवे,
बळीराजाला कर्ज नवे.
कंत्राटदाराला नवी कामे,
कारखान्दाराला उत्पन्न व्हावे.

म्हणून ,सुरुंग लावून डोंगर फोडणार,
झाडी तोडून बोडखे करणार.
पाण्याचे ही राजकारण करणार,
बळी मात्र अधिकाऱ्याचा देणार.

निसर्गचक्र बिघडल्याने,
अल निनो बिथरला.
रजोगुणी पावसाचा,
भाव मात्र वधारला.

पावसाने पाहिजे तसे वळवले,
सर्वांचे मनसुबे धुळीस मिळवले.
बिळातले झाले बेघर,
बाहेर चे वहावले रस्त्यावर.

भांडून तंडून छावणी उभारली,
तरी हि गुराढोरे मेली.
धंदेवाईकांनी हात धुतले,
नौकारदारानि मनसोक्त लुटले.

दु:खाने गरीबा चे हाल झाले,
त्यातच ते संपून गेले.
नद्याची जोडणी आहे प्रगती,
त्याची राजकारणाने झाली अधोगती.

वाळवंटाची तहान भागलीच नाही,
दर्याला पावसाचे महत्व नाही.
पाऊस आला पाऊस वाहिला,
पालथा घडा रिकामाच राहिला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला असंं वाटतंय का की हे सगळं चाललंय ते निसर्गनियमानुसारच चाललंय.
माणसाचा अस्तक्षेप मूर्खपणा आहे,पण त्यानेच त्याचं अस्थित्व लवकर संपेल आणि पृथ्वीची या सगळ्यातून सुटका होईल.
कितीही शाश्वत विकास व्हावयाचा असेल तरी तो किती जणांना मान्य आहे,त्यातून किती जणांना तो करण्यासाठी श्रम करण्याची इच्छा असेल? Happy
तेव्हा हे चाललंय ते चालू द्या.भावना मोकळ्या करण्याकरता कविता लिहायची असते,काही बदल होईल ही अपेक्षा ठेऊन लिहीलं की त्याची खिल्ली उडते.

पाऊस,ऊन्,थंडी यांना नावं ठेवाअयचं आपण थांबवूयात का?

होय विज्ञानदास जी कविता ही .भावना मोकळ्या करण्याकरताच जरुर लिहली आहे .परंतु कविताच बदल करू शकते हे ही खरे आहे . अपेक्षा नाही.