मायबोली गणेशोत्सव २०१४ साठी स्वयंसेवक हवेत

Submitted by admin on 8 July, 2014 - 23:24

मायबोली गणेशोत्सव २०१४ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.

गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.

मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.

पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजुडी, आमच्या अनेक गोष्टी तेंव्हाच लक्षात आल्या होत्या..... आम्ही लक्षात आणुनही दिल्या होत्या.... पण.... असोच! Wink
अ‍ॅडमिन, आता तरी नाव टाका हो आमचं.... लोकं नावं ठेवायला लागलीयेत पार Proud

ऑन सिरिअस नोट,
जर नवी लोकं तयार होतं नसतील तर जे आत्ता मदत करायला तयार आहेत त्यांना घेऊन टाका अ‍ॅडमिन,

दिवाळी अंकासाठी उत्सुक असलेले पण संधी न मिळालेले कोणी इथे मदत करण्यात इंटरेस्टेड असतील तर ते ही बघा.

साती/रिया/सानी,

पुन्हा एकदा लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद आणि उशीराबद्दल क्षमस्व. आता बदल केला आहे.

उदयन.., पराग, रीया, जाई., गजानन, चैतन्य दीक्षित, आशूडी, स्नेहश्री,
धन्यवाद. तुमची नावे संयोजक मंडळात सहभागी केली आहेत.

Happy

चला... गणपती बाप्पा मोरया.!

वेळ कमी आहे आणि माबोकरांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे Happy

उदयन.., पराग, रीया, जाई., गजानन, चैतन्य दीक्षित, आशूडी, स्नेहश्री>> अभिनंदन!! Happy
आणि मनःपूर्वक शुभेच्छा!! गणपती बाप्पा मोरया!

सर्वांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद! सहकार्य आणि सहभागाची अपेक्शा आहे. Happy चला तयारीला लागा.. लेखण्यांना धार करा, जुने आल्बम चाळून घ्या, नवनव्या पाकृ ट्राय करा, बच्चेकंपनीकडून गाणीगोष्टी तयार करा... आम्ही येतोय लवकरच! Happy

उदयन.., पराग, रीया, जाई., गजानन, चैतन्य दीक्षित, आशूडी, स्नेहश्री>> अभिनंदन!!

माझ्याकडुन कसलीही मदत लागली तर हक्काने कळवा. Happy

धन्यवाद admin,
नवीन संयोजक मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा Happy

मामे- तू दरवर्षीचं सल्लागर पद घेऊन टाक की गं गणेशोत्सवाचं...>>+११११ मामीने खुप पॉझिटिव्ह इनपुट्स दिले होते मागच्या वर्षी Happy

Pages