मायबोलीवर भूत, पिशाच्च ,अमानवीय शक्तीच्या अनुभवांवर आधारित अनेक धागे किंवा अनुभवकथनं आहेत .ह्या धाग्यांवर प्रचंड रोमांचकारी अनुभव अनेकांनी कथन केले आहेत .इंग्रजी ,मराठी नेटविश्वातमध्येही पॅरानॉर्मल, गुढ अनुभवांवर आधारित बरेच लेखन आहे. हे सर्व लेखन भयावह अनुभवांवर आधारीत असते .
खुद्द मायबोलीवर 'अमानवीय' ,'भुते असतात का?' वगैरे याविषयाला वाहिलेले अनेक धागे आहेत. मायबोलीवर परमेश्वराच्या आलेल्या अनुभवावर अगदी थोडे लेखन आहे. हा धागा मी उघडला कारण अनेकांच्या तोंडी आपण परमेश्वराच्या प्रचीतीच्या कथा ऐकतो .तुम्हाला तुमच्या आयुष्यातील असे घटना ,प्रसंग अनुभव आठवतात का जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सर्वव्यापी अस्तित्वाची, सामर्थ्याची अनुभती घेतलीत .तुमचे असे विलक्षण अनुभव असतील तर ते या धाग्यावर लिहावेत.
सुचना:-ह्या धाग्यावर चांगले वर्तन ठेवावे. विषयाशी संबंधीत प्रतिसाद असावेत.
प्रत्येकच मुलाचे आपल्या आईवर
प्रत्येकच मुलाचे आपल्या आईवर असलेले प्रेम हे जगात देव असल्याचेच उदाहरण आहे.
मनात येणारी भावना, कल्पना, विचार.. हे सारे कुठून येतात, काय प्रेरणा असते त्यामागे, कुठे लपलाय त्याचा स्त्रोत. एक दैवी शक्ती नाही तर काय आहे ते.
जग चाललेय, प्रवास करतेय, ते या विचारांमुळेच. ते थांबले तर आपण थांबू, जग थांबेल. पृथ्वीगोल तेवढा नाममात्र फिरत राहील.
आपण त्याच विचारांच्या बळावर यंत्रमानव बनवू शकतो, आपल्या विचारांनुसार त्याला वागायला भाग पाडू शकतो, मात्र स्वताचे विचार करणारा मानव बनवणारा जर कोणी आहे तर तो देवच आहे. मग त्याला कोणत्याही रुपात बघा. फक्त त्यासाठी मीच तो सर्वश्रेष्ठ या भावनेचा त्याग करायची गरज !
अग्निपंख, मूळ उद्धरण चेस्टर
अग्निपंख, मूळ उद्धरण चेस्टर बोल्स या अमेरिकन राजदूताचं आहे. भारताबद्दलचंच.>>
वरदा, माहितीबद्द्ल धन्यवाद, चेस्टर बोल्स बद्द्ल माहिती नव्हतं, मला जे वाटलं ते लिहिलं.
रच्याकने, लिंक मिळेल का ह्या उद्धरणाची?
पुलंचही एक वाक्य आहे देवाबद्द्ल, भेसळ, क्षणात होत्याचा नव्हता करणारी औषधे आणि इंजेक्षणं असुनही ते जिवंत राहीले ते देव असल्याशिवाय काय?
Pages