नाव सुचवा

Submitted by चिखलु on 18 July, 2014 - 12:45

माझ्या घरात एका पिटुकलीचा जन्म होणार आहे, चांगली नावे सुचवा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या घरात एका पिटुकलीचा जन्म होणार आहे, चांगली नावे सुचवा===

तुम्हाला पिटुकलीचा च जन्म होणार आहे, हे आधीच कळले का .
स्वरा
स्नेहा

अभिनन्दन

माझया ट्विन्स मुली आहेत, त्यांची नावे आम्ही "राधा" आणि "इरा" अशी ठेवली आहेत. नावे शोधताना आम्ही हे क्राइटीरिया ठेवले होते
1) 2 अक्षरी असावे.
2) उच्चारायला एकदम सोपे असावे (स्पेशली भारताबाहेर असेल तर हे खूप महत्वाचे वाटते.
3) अर्थ सुंदर असावा.
इरा चा अर्थ "स्वरस्वती / भूमी" असा होतो आणि "राधा" चा अर्थ "रा म्हणजे श्री विष्णू आणि धा म्हणजे मोक्ष प्राप्ती, तर "राधा" चा अर्थ विष्णू जवळ मोक्ष प्राप्ती असा होतो" हे दोन्हे अर्थ मनाला भावले, म्हणून ही नावे.. Happy

आणि "र" किंवा कोणत्याही अक्षराशी आमचे वाकडे नव्हते..आणि "र" चा उच्चार म्हटले तर, माझया दोघी 2 वर्षाच्या मुली "र" चा उच्चार खूप चांगला करतात. मी तर असे ऐकले होते की, "र" चा उच्चार खूप वेळा असलेली "रामरक्षा" रोज म्हणावी, त्यामुळे
त्याचा vocal कॉर्ड साठी खूप चांगला उपयोग होतो.

2) उच्चारायला एकदम सोपे असावे (स्पेशली भारताबाहेर असेल तर हे खूप महत्वाचे वाटते.>> भारताबाहेर लोक 'ध' (उच्चार ड करतात), 'त' (उच्चार ट करतात) , 'भ' (उच्चार ब करतात),, 'द' (उच्चार ड करतात),अशा अक्षरांची वाट लावतात.
इला, इरा, आर्या, किरा अस काहीतरी ठेवा.

इंग्लिश लोकांसाठी आपण आपली नाव का बदलायचीत ??????????? Uhoh
त्यांना ऋग्वेद नाव वाचायला कठीण जात असेल तर त्यांनी शिकुन घ्यावे..

इंग्लिश लोकांसाठी आपण आपली नाव का बदलायची>>>>> बदलायचं कुठे, ठेवतानाच जरा निवडून ठेवायचं नाही तर राधा नाव असेल तर आयुष्यभर "राडा" ऐकायला लागेल Sad

सामंतिनी अजिबात नाही.... माझे देखील सरळ सोप्पे नाव ज्याला कानामात्रावेलांटीउकार काहीच नाही "उदय" याचा उच्चार "वूड्डय" असाच करत होते.... शेवटी शिकवावे लागले Happy

इंग्रजांचं राहू द्यात. लेकीचं साधंसोपंसूटसुटीत सुनिधी तमिळ्यांना म्हणता येत नाही.

सुनिती, सुन्निदी, सुन्नीत्ता. सुन्यंदा, अशी रोज एकेक रूपं ऐकावी लागतात. तीपण तिच्याच मास्तरणीकडून. सुनिधी म्हणताच येत नाही.

पलाक्षी

अभिनंदन Happy

एक आगाऊ सल्ला Wink - पर्याय निवडून ठेवा पण फायनल करू नका. मुलीचा जन्म होऊ द्या, तिला छानपैकी डोळेभरून बघून घ्या आणि मग बघा एखादे नाव खास तिच्यासाठीच बनलेय असे वाटेल.

>>एक आगाऊ सल्ला

अहो तिकडे अमेरिकेत बहुतेक जन्माच्या आधीच नाव तयार ठेवावे लागते बहुतेक.
पण या बाहेरच्या देशांमधे हे असे आधी का सांगतात काय होणार आहे ते ?
जरा उत्सुकता राहू द्यायची ना. Happy

पण या बाहेरच्या देशांमधे हे असे आधी का सांगतात काय होणार आहे ते ?>>> नाही जर ़जाणुन घ्यायचे असेल तरच..हव असेल तर सिक्रेटही ठेवता येते.

बर्याच आई-वडिलांना त्यानुसार तयारी करायची असते उदा: मुलांच्या बेडरूमला सहसा कुणी गुलाबी रंग लावत नाहीत, मुलीच्या बेडरूमला लावतात. आता लिंगनिरपेक्ष स्वागत कराव ही 'आयडियल' गोष्ट झाली. पण सांगणार कोण? Happy

क्षिप्रा, साक्षी, शुक्ति, ऊर्वी, ऊर्मी, मुक्ति, शची,शरयू, रीवा, रेवा,वितस्ता,कालिंदी (लिंडा म्हणायला बरे.) सखी, साकी, परा, वैखरी, वैदेही, वरदा, मिथिला,शुभ्रा, शबरी,श्रिया, श्रेया,लीना, विलीना, नीता, विनीता, विनता, नम्या, सौम्या,शमा, क्षिती, पुनीता, तेजल, नेहा, स्नेहा, सनेहा, बरखा, उत्पला,रिया-पिया-सिया-हया, भद्रा,शलाका,मधुरिमा, परी,संज्ञा(सन्ज्ना ), कांची, सांची,कुंतला, कुंती,कैरवी, पर्णा-अपर्णा, धात्री,जाह्नवी,मैथिली, जानकी,तन्वी,तनया, तन्मया, शरीवा (म्हणजे काय ते माहीत नाही), विज्ञा,क्रिया,(किरीया,कराया, करियाना,kiyaaraa,) अरिया, अरियाना, कृती, आकृती, मेहा-मेघा-मेधा, अनुशा, अनुश्का, निकीता, नताशा,अनिशा. वल्लरी,मंजिरी, साजिरी,सलोनी,श्यामली,बन्सी,बन्सरी,चेतसी, राजसी, तेजसी, ओजसी, मिताली,अवंती, नालंदा, किमया, चिन्मया, चिन्मयी,वीथी, वीथिका, अनन्या, अन्शुल्, आह्ना,राधी, राही,राधिका,कार्तिकी, राशी, आशी,

जितकी नावं झालीत तितके कन्यारत्न इश्वर तुमच्या झोळीत भरभरून देवो, अशी सदिच्छा! Happy

Pages