नाव सुचवा

Submitted by चिखलु on 18 July, 2014 - 12:45

माझ्या घरात एका पिटुकलीचा जन्म होणार आहे, चांगली नावे सुचवा. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धात्री
वीथी
अन्शुल्
शुक्ति
वितस्ता

>>> हीरा, माहित असेल तर या नावांचे अर्थ सांगू शकाल का? उत्सुकता म्हणून विचारत आहे.

अंशुल एका बाप्या मित्राचे नाव आहे. मुलीचे पण नाव असते का?

नंदिनी,

धात्री म्हणजे दाई किंवा (आईला दुध नसल्यास) मुलाला दूध पाजणारी. महाभारतात कुंतीबरोबर असलेली सेविका धात्री जी कर्णाला नदीपात्रात सोडून देते असा उल्लेख मृत्युंजय मध्ये वाचला आहे. धात्री चा दुसरा अर्थ धरित्री किंवा धरती... पृथ्वी.

अंशुल म्हणजे चमकदार. चाणक्यचं हे ही एक नाव होतं म्हणे. मुलींचं ऐकलं नाही. तसंही पंजाबी लोकांमध्ये मुलाचं नाव मुलीसाठी ठेवण्याचा प्रघात आहे. संतोष, प्रकाश इ.

चिखल्या अभिनंदन. नाव ठरवलंत तर इथे लिहायला विसरू नका.

हीरा, मला आधी वाटलं माबोकर आयडीज दिलेत Happy

शुक्ति (स्त्री.) म्हणजे मोत्याचा शिंपला : " तोयाचे परि नावही न उरते संतप्त लोहावरी |
ते भासे नलिनी दलावरि पहा, सन्मौक्तिकाचे परी||
जे स्वातीच्या अब्धिशुक्तिपुटकी मोती घडे नेटके|
जाणा उत्तम मध्यमाधमदशा संसर्गयोगे टिके ||
वीथि अथवा वीथिका म्हणजे १)पायवाट; विशेषतः रानावनांतून मीअँडर करीत गेलेली. २) काल,(टाइम) क्षण.
वितस्ता : झेलम नदीचे संस्कृत नाव. 'वितस्ति' म्हणजे वीतभर खोलीच्या खड्ड्यातून शंकराने पाताळात लुप्त झेलमला पार्वतीसाठी बाहेर काढले, म्हणून ती वितस्ता, अशी काहीशी आख्यायिका आहे.
धात्री म्हणजे दाई असे कर्णावरच्या एका कादंबरीत आहे खरे, पण अधिककरून धरणी, धरित्री याच अर्थाने हा शब्द वापरला गेलेला वाचला आहे.

अंशुल मुलीचे नावसुद्धा ऐकले आहे. अंशु म्हणजे किरण. खरे तर पुंलिंगी. अंशुमान,सितांशु, चण्डांशु, तिग्मांशु (हे पत्रकार स्वतःच्या नावाचे स्पेलिंग तिग्मान्ग्शु असे करतात.) वगैरे. पण शीतल, हेतल, सेजल, कुंतल प्रमाणे वापरतात. संस्कृत नियमांप्रमाणे 'अ'कारान्त नामे-विशेषणांची स्त्रीलिंगी रूपे 'आ' किंवा 'ई" ने अन्त होणारी पाहिजेत. सिंह-सिंही, व्याघ्र-व्याघ्री, हरिण-हरिणी, नद-नदी, बाल-बाला, कान्त-कान्ता , मुग्ध-मुग्धा वगैरे. पन जिथे रश्मि, अञ्जलि, सविता अशी पुंलिंगी नावे कोणताही फेरफार न करता मुलींसाठी वापरली गेली तिथे अंशुल क्षम्य आहे आणि ते प्रचारातही आहे. अंशुल म्हणजे किरणमयी/ किरणमय, तेजोमय.

'धात्री' हे आदिमातेचं नाव आहे.

"जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते"

dhaatree patra mhaNaje aavaLyaache paansuddhaa. poojechyaa patreet he laagate.

जितकी नावं झालीत तितके कन्यारत्न इश्वर तुमच्या झोळीत भरभरून देवो, अशी सदिच्छा!
>>
सध्या तरी एकच खूप आहे Happy

जरा उत्सुकता राहू द्यायची ना.
>> मुलगा आहे की मुलगी हे कळले तर त्यादृष्टीने तयारी करता येते. गुलाबी स्वेटर की निळे, फ्रॉक की शर्ट आणि बरेच काही. आई-बाबा भारतातूनही काही आणणार आहेत, मुलगी आहे म्हणून तिच्यासाठी पैंजण आणतील. likewise...

मग कोणत नाव फायनल केल ते कळवाव...
>>
नक्की कळवेल

मला "सत्व" नाव ठेवायचं होतं.. पण त्याचा उच्चार "सटवा" असा होईल म्हणुन टाळलं!>>>आम्ही माझ्या भाचीचे नाव अनुष्का याच स्पेलिंगच्या घोळामुळे बदलून अनया केले

दि

याज्ञी

न आणि य दोन्ही अक्षरे मस्त आहेत आणि त्यात मुलीचं नाव हवं आहे तर बरीच छान छान मिळतील. लॉग आऊट केलं की शोधते.

नीलांगी, नेहा तशी थोडी जुनी आहेत पण छान आहेत. देवीची आहेत की नाही माहिती नाही.

योगिनी पण देवीचे पण फार जुने आहे.

अभिनन्दन. शक्यतो मराठी नावे ठेवा. मुस्लिम नावे नका ठेऊ. पहिली बेटी ही धनाची पेटी अशी म्हण आहे. तुमची मुलगी तुमच्या इच्छा पुर्या करो ही सदिच्छा. जीवेत शरदः शतम.

Pages